४८ नाट्यमंडळे२०० नाटकांचे लिखाण
६२ नाट्यलेखक४०० कलावंत१०० स्त्री कलावंत
मराठी भाषिक प्रदेशातील पूर्वेकडील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा
भूभाग म्हणजे झाडीपट्टी. पूर्वी त्याला ङ्कझाडीमंडळङ्क नावाने ओळखले जायचे. या प्रदेशात
बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ङ्कझाडीबोलीङ्क या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय
या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा
काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा
काही भाग यांचा झाडीभाषक प्रदेश म्हणून समावेश होतो. या भागात गेल्या दीडशे वर्षांपासून
लोककलावंत मनाटकङ्क हा कलाप्रकार सादर करीत आहेत. दिवाळीनंतर शेतातील पीक हाती आले
की, येथील नाटकांना
प्रारंभ होतो. यापूर्वी लोककथा, लोकगीत, दशावतार, लळीत, खडीगंमत, दंडार, दंडीगान, गोंधळ, कळसूत्री बाहुल्यांचे खेळ, कीर्तन, भारुड, वासुदेव, तमाशा, वग, विविध नृत्यप्रकार, चित्र-शिल्प यासारख्या अनेक
लोककलांच्या माध्यमातून लोकरंजनाचे कार्य सुरू आहे. qभगीसोंग, दंडार, राधा, दंडीगान, खडीगंमत, डाहाका, कथासार गोंधळ, बैठकीचे पोवाडे यातूनच नाटकाची
उत्क्रांती झाली आहे.
झाडीपट्टी रंगभूमीची शतकोत्तर वाटचाल
झाडीपट्टीत ङ्कार पूर्वीपासून दंडार आणि विविध लोककला सादर व्हायच्या. १८८६ मध्ये
नागपूरला सांगलीकर नाटक मंडळी आली होती. पुण्या-मुंबईतील नाटके पाहण्यासाठी झाडीपट्टीचे
कलावंत नागपुरात जात असत. त्यांच्या नाटकांमध्ये वेगळेपणा जाणवत होता. त्यामुळे येथील
दंडारकर्मींनी तिथून धडे घेणे सुरू केले आणि दंडारीचे रूपांतर नाटकात होऊ लागले. नवरगाव
येथील स्व. बालाजी पाटील बोरकर यांनी वयाच्या आठव्या वर्षी १९०९ मध्ये चिलिया बाळाची
भूमिका केली होती. झाडीपट्टी रंगभूमीवर नाट्यकला रुजविण्यात कोहळी समाजाचे योगदान आहे.
हा समाज जमीनदारी आणि मालगुजारी करायचा. त्यांना दंडारी पाहण्याचा छंद होता. त्यांनी
स्वत:चे दंडारमंडळ आणि त्यानंतर नाट्यमंडळ गावोगावी सुरू केले. नाट्य नेपथ्यासाठी पडदे,
सिनसिनेरी,
संगीताचे साहित्य तयार
केले. तीन-तीन महिने तालीम करून नाटक बसवीत असत. पेटीमास्टर,
दिग्दर्शकाकडून गाणी
बसवून घेत. सर्वधर्मसमभाव रुजविण्यासाठी अठरापगड जातींतील कलावंतांना स्थान दिले जायचे.
मग नाटकाच्या मुहूर्तासाठी गावोगावी होणारे शंकरपट निवडले जायचे. शंकरपटाच्या निमित्ताने
गावोगावची मंडळी एखाद्या गावात यायची. त्या माध्यमातून प्रेक्षकवर्ग मिळायचा. दिवसा
बैलांचा पट आणि रात्रीला नाटक हे समीकरणच येथे रुजले. पुढे मंडई, जत्रेच्या निमित्ताने नाटके
होऊ लागली. झाडीपट्टी रंगभूमीच्या प्रारंभीच्या अवस्थेत धानपीक निघाल्यानंतर पोळ्यापासून
नाटकांसाठी तालिमा सुरू होत. नाटकातील प्रत्येक पात्रातील संवाद आणि गिते पाठ करून
घेतली जायची. स्थानिक कलावंतांना बाहेरून आलेले दिग्दर्शक मार्गदर्शन करीत. दिवाळीचा
पाडवा, भाऊबीज,
कार्तिक पौंर्णिमा,
गावातील मंडई,
तिळसंक्रांत,
होळी या सणांना आवर्जून
नाट्यप्रयोग व्हायचे. सुरुवातीच्या काळात दंडारीसाठी वापरण्यात येणारी सिनसिनेरी आणि
पडदे नाटकासाठी वापरली जायची. जवळचे पैसे खर्च करून पौराणिक, ऐतिहासिक प्रसंगानुरूप पडदे
तयार केले जायचे. त्यातून नदी, जंगल, बगीचा, गाव, आकाश दाखविले जायचे. प्रकाशयोजनेसाठी रॉकेलच्या चार-सहा गॅसबत्या
लावल्या जायच्या. रंगमंचासमोर तबला आणि हार्मोनियम वादकासाठी बसण्याची विशेष
व्यवस्था केली जायची. रंगभूमीवर पेटीमास्टरला मानाचे स्थान असायचे. तो दिग्दर्शक म्हणूनही
कलावंतांना मार्गदर्शन करीत असे. झाडीपट्टीत १९६० पर्यंत सादर झालेली नाटके विनातिकीट
होती. नाट्यप्रयोग पाहायला येणारे रसिक नाट्यमंडळाला आपल्या खुशीने पैसे द्यायचे. ही
नाटके रात्रभर चालतात. त्यामुळे प्रेक्षकांना विश्रांती म्हणून दोनदा मइंटरवलङ्क व्हायचे.
त्यामुळे मतीन अंकीङ्क नाट्यपुष्प संगीत.....(नाटकाचे नाव) अशी प्रचाराची प्रथा होती.
प्रत्येक अंकानंतर देणगी देणाèया प्रेक्षकांची नावे घोषित
केली जायची. नाट्यमंडळाचे प्रमुख ही रक्कम स्वीकारल्यानंतर
देणगी देणाèयाचे नाव घेऊन मआम्ही ऋणी
आहोतङ्क अशा पद्धतीने आभार मानीत असे. कुणी पाच, तर कुणी दहा रुपयांची देणगी द्यायचे.
प्रारंभी नाट्यप्रयोगाचा उद्घाटन सोहळा होतो. त्यासाठी आलेल्या पाहुण्यांकडूनही देणगी
घेण्याची प्रथा आहे. पाहुणे म्हणून विशेषत: राजकीय नेतेच येतात. त्यामुळे मतदारांना
खूश ठेवण्यासाठी ते मोठी रक्कम देतात. गावातील मोठ्या धनिक आणि प्रतिष्ठांना
मानपत्र दिले जायचे. यातूनही देणगी मिळत असते. या संपूर्ण रकमेतून नाट्यप्रयोगाच्या
सादरीकरणासाठी येणारा खर्च भागविला जायचा. काही प्रेक्षक एखाद्या कलावंतांची भूमिका
आवडल्याबद्दलही पैशाच्या रूपात बक्षीस देत असत.
प्रेक्षकांची गर्दी वाढावी म्हणून प्रचारासाठी पॉम्प्लेट छापायचे. त्यावर रंगदेवता
प्रसन्न, मोङ्कत....मोङ्कत....ङ्कक्त
एकच प्रयोग, खास.....सणानिमित्त....तीन अंकी नाट्यपुष्प.....संगीत......आदी शब्द कायम असत.
स्वातंत्र्यानंतर ग्रामीण भागातही वीज आली. त्यामुळे रंगमंचावर अनेक बदल झालेत. वीज
गेली की जनरेटर लावले जाऊ लागले. १९६० पर्यंत नाटकांमध्ये स्त्री पात्र पुरुषच करायचे.
नाटकात महिला असावी, असे प्रत्येकाला वाटायचे. मग मानधन देऊन स्त्री कलावंतांना बोलविले जायचे. यात
पुण्याहून qसधू खोले, कान्होपात्रा, मधुवंती दांडेकर, विमल कर्नाटकी, जयश्री शेजवलकर, नीलम, जयमाला शिदेदार झाडीपट्टीत येऊ लागल्या. स्त्री पात्रासाठी मानधन मोजावे लागत असल्याने
नाट्यमंडळींचा खर्च वाढला. देणगीतून नाटक सादर करणे परवडत नव्हते. त्यामुळे तिकिटांच्या
प्रयोगाला प्रारंभ झाला. साहित्यिकांच्या संशोधनानुसार आणि लिखित ठेव्यानुसार तिकिटांचा
पहिला प्रयोग २६ ङ्केब्रुवारी १९६० रोजी दत्त प्रसारक नाट्यमंडळाने महात्मा गांधी विद्यालय,
आरमोरी येथे गोqवदराव मुनघाटे लिखित मखेड्यातील
माणसंङ्क हा झाला. तो विद्यालयाच्या मदतीकरिता घेण्यात आला होता. त्यापाठोपाठ नाट्यमंडळांची
नाटके तिकिटांची, तर हौसेखातर स्थानिक कलावंतांची नाटके नि:शुल्क होऊ लागली. १९६५ नंतर नागपुरातील
नाटकांमध्ये काम करणाèया पुष्पा पवार, सुमन मार्तंड, इंदुमती खोले, शोभा गोरे, अश्विनी गोरे, मीना देशपांडे, वत्सला पोलकमवार आदी कलावंत
गावोगावी येत असत. कालांतराने झाडीपट्टीच्या मातीतीलच स्त्री कलावंत पुढे आल्या. गीताचंद्र,
शशिकला भाग्यवंत,
भूमाला कुंभारे,
ललिता qपगळे यांचे नाव गावोगावी
प्रेक्षकांच्या तोंडपाठ झाले. पुढे स्त्रियांनी
अनेक नाटके साकारतील. यात प्रीती संगम, स्वर्गावर स्वारी, गोकूळचा चोर, हिरवा चुडा, वहिनीच्या बांगड्या,
दिल्या घरी तू सुखी
रहा, वनवास,
दिवा जळू दे सारी रात
आदी नाटकांचा उल्लेख आहे. भंडारा येथील अॅड. सुधीर गुप्ते आणि विशाखा गुप्ते यांनी
एकत्रित नाटकात काम केले. याशिवाय आयुधनिर्माणी जवाहरनगर येथे रत्नाकर सालकडे
आणि त्यांच्या पत्नी, गोंडqपपरी
तालुक्यातील चेक पारगाव येथील शिक्षक यादवराव गिरसावळे यांनी पत्नी शांताबार्इंना सोबत
घेऊन मशेतकरीदादाङ्क या नाटकात काम केले.
१९७५ पासून झाडीपट्टीत लावणीप्रधान, तमाशाप्रधान, नाटके होऊ लागली. तेव्हा शोभा जोगदेव,
संगीता भोसले,
लता धुळधुळे,
गीतांजली, पौर्णिमा काळे, माधुरी कोंकण, शोभा कोंकण आदी कलावंत मराठी
सिनेमात गाजलेल्या लावण्यांच्या चालीवर दिलखेचक नृत्य सादर करायच्या. नट्यांची क्रेझ
सुरू झाल्यानंतरही विरली (ता. लाखांदूर) येथील मंगल मेश्राम, गोंडqपपरी (जि. चंद्रपूर)चा अर्जुन
आलाम स्त्री पात्र साकारत होता. ला. कृ. आयरे, गणेश हिर्लेकर, रमाकांत पायाजी, कमलाकर बोरकर, आबासाहेब आचरेकर,
के. डी. पाटील हे जुन्या
काळातील लेखकमंडळी होती. १९९० ते २०१२ पर्यंत नाट्यप्रयोगात बदल झालेत. ऐतिहासिक आणि
पौराणिक विषयांऐवजी सामाजिक, सत्य घटनेवर आधारित नाटके आलीत. नवरगाव येथील सदानंद बोरकर यांचे
ममाझं कुंकू मीच पुसलंङ्क आणि मआत्महत्याङ्क ही नाटके गाजली आहेत. त्याचे दोनशेहून
अधिक प्रयोग झाले आहेत. मआत्महत्याङ्क नाटकाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयोग झाले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील विठ्ठल पाकलवारांच्या ममरीमाईचा भूत्याङ्क या नाटकाने १९८८ मध्ये
पहिल्यांदाच ४५० प्रयोग केलेत. गडचिरोली येथील चुडाराम बल्लारपुरे यांचे ममहामृत्युंजय
मार्कंडेश्वरङ्क या नाटकाचे २००४ पासून १५० प्रयोग झालेत. यात ५१ कलावंत आहेत. झाडीपट्टीच्या
रंगभूमीत आज ध्वनी व प्रकाशयोजनेसह वेशभूषा, नेपथ्य, रसिकांना बसण्यासाठी खुच्र्या,
गाद्या, बिछायत उपलब्ध आहे. १९८१
मध्ये नवरगावचे डॉ. सुधाकर जोशी यांनी ङ्किरत्या रंगमंचाचा आराखडा तयार केला. त्यावर
व्यंकटेश नाट्यमंडळ नाट्यप्रयोग सादर करीत आहे. नाटकांत संवादाशिवाय संगीताला महत्त्व
आहे. त्यामुळे गाण्यांशिवाय प्रेक्षक खूश होत नाही.
-----------------------------
दंडार
झाडीपट्टीतील ग्रामीण भागात मदंडारङ्क हा लोककला प्रकार प्रसिद्ध आहे. स्थानिक
कलावंत यात भूमिका वठवितात. या लोककला प्रकारात पुरुषच स्त्री पात्र रंगवितात. मदंडारङ्क
या शब्दाचा नेमका अर्थ डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या मझाडीपट्टीची दंडारङ्क या ग्रंथात
सांगितलेला आहे. झाडीपट्टीत शेताला दंड, तर झाडाच्या ङ्कांदीला डार म्हटले जाते. शेतातील पिकलेला
शेतमाल घरी आल्यानंतर शेतकरी आनंद व्यक्त करण्यासाठी समूहनृत्य करीत असावेत. यातून
दंडार अवतरली असावी, असे सांगितले आहे. दंडारीत संवादासोबत गाणीसुद्धा असतात. या गाण्यांतून कथेतील
भावना व्यक्त करतात. त्याला ढोलकी, टाळ यांचे संगीत असते. दंडार हा प्रकार रात्रभर चालतो. शिवाय
हिवाळ्याच्या दिवसांतच प्रयोग सादर होतात. पूर्वी शेतमाल निघाल्यानंतर रिकाम्या झालेल्या
शेतीच्या बांध्यामध्ये प्रयोग सादर व्हायचे. कालांतराने प्रेक्षकसंख्या वाढू लागली.
त्यामुळे उंच जागा, देवळाचा ओटा, वडाचे पार हे दंडारीचे रंगमंच झाले.
नेपथ्य- रंगमंचावर वेगवेगळे स्थळ आणि प्रसंग दाखविण्यासाठी पडदे लावलेले असतात.
त्यावर घर, घराचे दार, जंगल दाखविले जाते. प्रसंग बदल करण्यासाठी पडदा दोरीच्या साह्याने वरती उचलला जातो.
स्त्री पात्र साकारणाèया पुरुषांना केस,
गजरा, हातात बांगड्या, मंगळसूत्र, नऊवारी साडी नेसवून सजविले
जाते. अधिक सुंदर दिसण्यासाठी चेहèयावर जाडदार मेकअप करून ओंठाना
रंगविले जाते.
प्रकाशयोजना- ग्रामीण भागात पूर्वी विजेची सोय नव्हती. तेव्हा कापडाच्या qचध्या गुंडाळून दिवा तयार
केला जायचा. स्पीकरची व्यवस्था नसल्यामुळे कलावंतांना मोठ्याने ओरडून संभाषण करावे
लागे. आता विजेची सोय झाली आहे. त्यामुळे रंगमंचावर प्रसंगानुरूप रंगीत वीजदिवे लावले
जाते. भांडणाचा प्रसंग दाखविण्यासाठी वीजदिवे, ट्यूबलाईट बंद- चालू करून प्रेक्षकांना
खिळवून ठेवले जाते.
बैठी दंडार
गायक, शाहीर, ढोलक्या, तुणतुणेवाला, झांजवाला आणि एक-दोन सहकाèयांनी सामूहिक रूपात सादर
केलेल्या प्रकाराला बैठी दंडार म्हटले जाते. यात पोवाडे, लावण्या, पौराणिक कथा गायन करतात.
खडी दंडार
या प्रकारात विनोद असतो. पुराण आणि ऐतिहासिक विषयांवर आधारित गद्य-पद्यात्मक पद्धतीने
सादरीकरण केले जाते. यातूनच पुढे खडी गंमत किेवा खडा तमाशा हे लोकनृत्य प्रकार अस्तित्वात
आले असावेत.
प्रसंगी दंडार
या प्रकारात गायक हा सूत्रधार असतो. त्याच्या सोबतीला टाळ, ढोलके, तुणतुणे आदी वादक असतात.
यातील कथा पौराणिक आख्यायिकेवर आधारित असतात. यात झडत्या आणि लावण्याही गायल्या जातात.
राधा
मराधाङ्क लोकनाट्याने दलित रंगभूमीचा उदय झाला. रंजल्या गांजल्यांचे रंजन करण्यात
कृतार्थता मानत ही लोककला सादर होत असे. तरुण मुलाला भडक रंगाचे चमकदार लुगडे नेसवून,
अंगावर नकली दागिने
लावून लोकांचे मनोरंजन केले जायचे.
डरामा
इंग्रजीतील ड्रामा या शब्दाचा अपभ्रqशत शब्द म्हणजे डरामा. गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील qहदी भाषिक नाट्यप्रकाराला
डरामा म्हणायचे. छत्तीसगडमध्ये नौटंकी हा कलाप्रकार सादर करतात. त्यालाच डरामा म्हटले
जायचे. हार्मोनियम, तबला, व्हायोलिन, टाळ आदी वादकांच्या सोबतीने ऐतिहासिक आणि काल्पनिक प्रसंग सादर केले जातात.
नाट्यलेखक
गो. ना. मुनघाटे गुरुजी, डॉ. हरिश्चंद्र बोरकर, मनोहर पोलकमवार, न. सी. खंडाईत, पांडुरंग भेलावे,
बा. ल. मेश्राम,
प्रा. विनोद मोरांडे,
ग. रा. वडपल्लीवार
विठ्ठल पाकलवार, चुडाराम बल्लारपुरे, प्राचार्य सदानंद बोरकर, शेख बाबू
के. आत्माराम, दिलीप वढे, संजय ठवरे, भास्कर शेंडे, प्रदीप बिडकर, किशोर मेश्राम, सिद्धार्थ गोवर्धन, रमेश बोरकर, अनिरुद्ध वनकर, प्रेमकुमार खोब्रागडे, यश निकोडे, प्रा. राम दोनाडकर,
राजू माटे,
देवेंद्र लुटे,
राजेश चिटणीस
अमर मसराम, खुशाल मदनकर, विशालकुमार, गणपतराव वडल्लीवार, उद्धवराव qशगाडे, माधव बुल्ले, सत्यवान मस्की, जयदेव सोमनाथे, मारोतराव बुल्ले,
भास्कर शेंडे,
संतोष बारसागडे,
सुरेश लांजे,
रामचंद्र डोंगरवार,
बाबूराव मेश्राम,
राजेंद्र बनसोड,
अशोक उदासी,
मिqलद खोब्रागडे, सिद्धार्थ खोब्रागडे,
देवा बांबोळे,
तारकेश्वर मिसार,
प्रेमकुमार मलोडे,
बाजीराव रामटेके,
सरङ्कराझ भाई,
चंद्रशेखर गोंधळी,
संजय ठवरे,
पुंडलिक भांडेकर,
हरिदास वैद्य,
प्रशांत दुर्योधन,
आनंद भिमटे,
चंदू नैताम,
विनोद मोरांडे,
सूर्यलाल मेश्राम,
प्रमोद नागमोती,
मिqलद रंगारी, यशवंत ढोर, श्री. शेंडे, वत्सला पोलकमवार,
रागिणी बिडकर.
-----------------
झाडीपट्टीची ङ्कॅक्टरी
नाटकांच्या प्रचारासाठी पॉम्प्लेट आणि तिकिटांची बुqकग करण्यासाठी पावती बुक छपाईसाठी
पूर्वी नागपूरला जावे लागे. १९६५ च्या आसपास कोकोडी (वडसा) येथील अजित भय्या पटेल यांनी
भारत प्रिqटग प्रेसची स्थापना केली. अजित भय्यांनी धर्मवीर संभाजी आणि उमाजी नाईक हे नायक
पात्र वठविले. मुद्रणालयातून नाटकांचे पॉम्प्लेट छपाई करण्यासोबतच नागपूर, पुणे, मुंबईच्या स्त्री कलावंतांच्या
तारखा घेऊन त्यांना मानधनावर नाटकात पाठविण्याचा व्यवसाय सुरू केला. अजित भय्यांचे
जावई बब्बूभाई यांनी महाराष्ट्र ललित रंगभूमी देसाईगंज या नावाचे मुद्रणालय सुरू केले.
त्यानंतर नाकाडे प्रिqटग प्रेस, महालक्ष्मी प्रिqटग प्रेस आणि qसदेवाही येथील लक्ष्मी मुद्रणालय येथूनही नाटकांच्या पॉम्प्लेट छपाईचे काम सुरू
आहे.
---------
नाट्यमंडळे
महाराष्ट्र ललित रंगभूमी, व्यकंटेश नाट्यमंडळ, धनंजय स्मृती रंगभूमी,
भारत नाट्य रंगभूमी, राजसा रंगभूमी, गणराज कलामंदिर, महालक्ष्मी नाट्य रंगभूमी,
चंद्रकमल थिएटर्स,
एकता कला रंगभूमी,
लोकजागृती नाट्य रंगभूमी,
अभिनव नाट्यसंपदा,
अवतार रंगभूमी,
आराधना नाट्य कलामंदिर,
आशीर्वाद रंगभूमी,
एकता रंगभूमी,
ओम शिव
ओम साई रंगभूमी, कलाधिपती रंगभूमी, कलाविष्कार रंगभूमी, कलादर्पण रंगभूमी, कल्पतरू रंगभूमी, जयदुर्गा रंगभूमी,
झाडीपट्टी रंगभूमी,
तारांगण रंगभूमी,
देव थिएटर्स,
नटसम्राट रंगभूमी,
नटसम्राट नाट्यकला,
नटेश्वर नाट्यकला,
नटराज निकेतन,
नवनिर्माण झाडीपट्टी रंगभूमी, नाट्य केदार, नाट्यश्री साहित्य कलामंच,
प्रशांत स्मृती झाडीपट्टी
रंगभूमी, प्रल्हाद
नाट्य रंगभूमी, भारत ललित कला रंगभूमी, महालक्ष्मी रंगभूमी,
युवा रंगमंच,
रसिक रंजन रंगभूमी,
रसिका तुजसाठी रंगभूमी,
रंगसाधना रंगभूमी,
लावण्य रंगभूमी,
विद्यार्षण रंगभूमी,
शारदा रंगभूमी,
शिवराज नाट्य रंगभूमी,
गुरुदेव रंगसाधना,
गौरीशंकर नाट्यमंडळ,
शंकर प्रासादिक नाट्यमंडळ,
साई रंगभूमी,
संमिश्र कला रंगभूमी,
साहेबा रंगभूमी,
स्वरानंद झाडीपट्टी
रंगभूमी, हौशी
नाट्य रंगभूमी.
महिला कलावंत
गीताचंद, सेरिता ठाकरे, वत्सला पोलकमवार, ललिता qपपळे, भूमाला कुंभरे, शशिकला भाग्यवंत, छाया टेंभुर्णे, कमल आगलावे, विजया देवळीकर, शबाना खान, रागिणी बिडकर, पद्मा जयस्वाल, ज्ञानेश्वरी कापगते, सपना मोटघरे, नंदा बिके, शुभलक्ष्मी, करिश्मा भाग्यवंत, कुसुम आलाम, उषा गणवीर, गीता काळे, रूपाली बिरे, प्रियंका गायधने,
वनश्री आनंदे,
विद्या खुणे,
संगीता बागडे,
अनुराधा कांबळे,
आसावरी पोलकमवार,
आसावरी तिडके,
विद्या रॉय,
सीमा कुळकर्णी,
आशा तारे, अंजली जाखडे, पल्लवी, रश्मी भोसले, विद्या भागवत, राजश्री आठवले, कविता टिकेकर, वंदना गांगुर्डे,
शकिला बाबू कुन्वी,
हेमा जाधव,
मेघा कारेबोरे,
वर्षा संगमनेरकर,
मृणाल पेंढारकर,
मनीषा वाघमारे,
मंगला नाशिककर,
अनिता सातारकर,
मंगला दंढारे,
सोनाली तळवीकर,
मीनल, qपकी, सुषमा.
---------
ख्यातनाम कलावंत
डॉ. परशुराम खुणे, प्रा. शेखर डोंगरे, प्रा. राम दोनाडकर, सदानंद बोरकर, प्रा. डॉ. ईश्वर मोहुर्ले,
कमलाकर बोरकर,
के. आत्माराम,
अरqवद झाडे, हिरालाल पेंटर, शेखर पटले, राजन खुणे, शेख बाबू, विनायक डोंगरवार,
अमर मसराम,
अंबादास कामडी,
संतोष वरपल्लीवार,
मधू जोशी, अनिरुद्ध वनकर, प्रभाकर आंबोणे, राजेश चिटणीस, देवेंद्र दोडके, देवेंद्र लुटे, डॉ. नरेश गडेकर, प्रा. विनोद मोरांडे,
प्रकाश सोमलकर,
चुडाराम बल्लारपुरे,
डॉ. किन्नाके,
नीलकंठ पर्वते,
देवाजी नरुले,
यशवंत बोरकर,
सागर पिठाले,
सुनील चुडगुलवार,
गभणे बाबू,
गिरिधर गजपुरे,
वसंत रोकडे,
धनंजय पुस्तोडे,
नारायण मेश्राम,
गजानन परशुरामकर,
दिनेश ठाकरे,
स्व. उन्मेश जवळे,
स्व. शेषराव मोहुर्ले,
विलास वट्टी,
मनोहर खापरे,
ढोणे बाबू,
प्रल्हाद मेश्राम,
अनिल नागतोडे,
उत्तम झाडे,
विजय मुळे,
यशवंत भुते,
श्रीधर लोधे,
रवी धकाते,
भास्कर शेंडे.
----------
मझाडीपट्टी रंगभूमीची शतकोत्तर वाटचालङ्क या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवार (ता. १५)
रोजी होत आहे. यानिमित्त लेखक डॉ. श्याम मोहरकर यांच्याशी केलेली
ही बातचीत.
झाडीपट्टी रंगभूमीवर पुस्तक ही कल्पना कशी सुचली?
गेल्या शंभर वर्षांपासून झाडीपट्टीत लोककला सादर करणाèया रंगभूमीत आज अनेक बदल झालेत. मी स्वत: आजवर सुमारे ४० नाटकांत काम केले.
यादरम्यान त्यांना अनेक नाट्यमंडळे, कलावंत, संगीतवादक, लेखक, नेपथ्यकार यांच्याशी जवळून संबंध आला. शिवाय पडद्यामागे
काम करणाèया कलावंतांची भूमिका कळली.
या सर्वांचे अनुभव मांडण्यासाठी मशतकोत्तर वाटचालीची गाथाङ्क हे पुस्तक लिहिले.
नाट्यचळवळीशी संबंध कसा आला?
भंडारा जिल्ह्यातील जुनोना (ता. पवनी) हे माझे जन्म गाव. मी १९८९ पासून येथील
चंद्रपूर येथील एङ्कईएस गल्र्स महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. बालपणापासून
नाटकाची आवड होती. भंडारा येथील लालबहादूर शास्त्री उच्च माध्यमिक विद्यालयात शिकत
असताना नाटकात काम केले. पुढे ब्रह्मपुरीच्या नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात
शिकत असताना डॉ. श्रीराम लागू यांचे नाटक बघितल्यानंतर नाटकात
कला सादर कशी करावी, याचा अनुभव घेता आला. त्यानंतर नाटकातही काम केले.
पुस्तकाचे वैशिष्ट्य काय आहे?
झाडीपट्टी रंगभूमीची गाथा मांडताना प्रारंभीच मराठी नागर रंगभूमीची मुहूर्तमेढ,
आधुनिक संगीत नाटके,
स्वातंत्र्यानंतरची
नाटके, कामगार
रंगभूमी, दलित
नाटके, बालनाट्य
यावर सविस्तर विवेचन केले आहे. झाडीपट्टी लोककलेतील दंडार, बैठी दंडार, खडी दंडार, प्रसंगी दंडार, राधा, खडी गंमत, डाहाका, qभगीसोंग, दंडीगान, डरामा, कथासार गोंधळ, बैठकीचे पोवाडे यांचे बदलते
स्वरूप मांडले आहेत. १९१० ते २०१२ या काळात तयार झालेली नाट्यमंडळे, कलावंत, नाट्यप्रयोग, लेखक यांचीही दखल या पुस्तकात
घेतली आहे. झाडीपट्टी रंगभूमीतील नाट्यशीर्षक, अभिनय, तांत्रिक, संगीत, रंगमंच यात झालेले बदल आणि भविष्यातील
अपेक्षाही मांडलेल्या आहेत. याशिवाय डॉ. परशुराम खुणे, गीताचंद्र चंद्रगिरीवार,
प्रा. शेखर डोंगरे,
प्राचार्य सदानंद बोरकर
यांच्या नाट्यजीवनावर मुलाखती घेतलेल्या आहेत. या पुस्तकाचे विशेष म्हणजे आजवरच्या
नाटकांची यादी, नाट्यलेखक, कलावंत यांची सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यामुळे हे पुस्तक झाडीपट्टीच्या रंगभूमीसाठी
संदर्भग्रंथच आहे.
माहिती संकलन : देवनाथ गंडाटे