चिमूर/रोहित रामटेके:
चिमूर क्रांती जिल्हा निर्माण करण्यात यावा या मागणी करीता आज(5जानेवारी)रोजी तहसीलदार संजय नागतीळक यांचे मार्फतीने मुख्यमंत्र्यांना ईशारापत्र (निवेदन) सादर करण्यात आले
चिमूर जिल्हा निर्माण व्हावा यासाठी सण 1983 पासून अनेक आंदोलने, निवेदन पत्रव्यवहार आदी विविध पद्धतीने मागणी करण्यात आली, मात्र शासनाने या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आंदोलन दरम्यान 5 जानेवारी 2002 मधे तहसील कार्यालयाची इमारत जाळण्यात आली होती, 5 जानेवारी हा चिमूरकरणांसाठी काळा दिवस असल्याचे मानल्या जाते, आज या काळ्या दिवसाचे औचित्य साधून निवेदन सादर करण्यात आले.
चिमूर जिल्हा निर्माण व्हावा ही मागणी प्रथमतः स्वातंत्र संग्राम सेनानी स्व. दामोदरराव काळे गुरुजी यांनी केली होती त्यानंतर सर्व पक्षीय नेते व कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी एकत्र येऊन चिमूर क्रांती जिल्हा कृतीसमितीची स्थापना करून या मागणीचा पाठपुरावा करीत आहेत
चिमूर जिल्हा निर्माण व्हावा या मागणीसाठी सध्या सत्तेत असलेल्या सत्ताधारी हे विरोधी पक्ष म्हणून कार्यरत असताना या मागणीचे समर्थन केले होते, मात्र ते आता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप समितीचे निवेदनात केला आहे
या मागणिसंदर्भात प्रस्तुत प्रतिनिधी सोबत बोलताना चिमूर क्रांती जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष नरेंद्र राजूरकर(बंडे) म्हणाले, चिमूर जिल्हा भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून तथा ऐतिहासिक भावना लक्षात घेऊन दिनांक 1 मे 2019 पर्यंत चिमूर जिल्हा घोषित करण्यात यावा, अन्यथा 5 जानेवारी रोजी 2002 मध्ये झालेल्या तहसिल कार्यालय ईमारत जाळपोळ प्रकरणाच्या ईतिहासाची पुनरावृत्ती झाल्यास शासन जवाबदार राहील असे सांगितले
सण 1981 ला तत्कालीन चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करतांना नवीन जिल्हा निर्माण करतेवेळी आदिवासी व गैरआदिवासी क्षेत्र असा चुकीचा विचार करून विभाजनाला दूरदृष्टी न ठेवता दिनांक 26 ऑगस्ट 1982 ला गढचिरोली जिल्हा निर्माण करण्यात आला, या जिल्हा निर्मितीच्या वेळी सर्व प्रशासकीय समितीचे अहवाल चिमूर जिल्हा निर्मितीच्या बाजूच्याच होते, तेव्हाही सर्व नियम धाब्यावर बसवून चिमूर जिल्हा निर्मिती पासून डावलण्यात आले अशी माहिती प्रा. संजय पिठाडे यांनी दिली
आज 5 जानेवारी रोजी निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात चिमूर क्रांती जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष नरेंद्र राजूरकर यांचे नेतृत्वात प्रा. संजय पिठाडे, माधव बिरजे,मनीष नंदेश्वर, सुरेश डांगे, भरत बंडे, रामदास हेमके, राजू हिंगणकर,राजेंद्र लोणारे, सौ सिंधुताई रामटेके, अनिल डगवार,प्रा.राम राऊत, प्रकाश बोकारे, अरुण लोहकरे, अतुल लोथे, गणपत खोबरे, विलास डांगे, उमेश शंभरकर, अभय धोपटे, रामकृष्ण राऊत, प्रवीण वरगंटीवार,शांताराम शेलवटकर,हरिदास सोरदे,बाळू बोभाटे,आशिष कावरे, डॉ हेमंत जांभुळे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते, चिमूर प्रशासकीय भवन परिसरात या मागणिसंदर्भात गगनभेदी घोषणा देण्यात आल्या .