चंद्रपूर/प्रतिनिधी:
दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात सत्ताधारी भाजप पक्षाचेच कार्येकर्ते दारू तस्करी करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. असगर खान असे या दारू विक्री करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे.याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल १ लाख २० हजार रुपयांची देशीदारू जप्त करण्यात आली आहे.
राज्याचे अर्थ, वने व नियोजनमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. मात्र जिल्ह्यात दारू बंदी असतांना अनेक छुप्या मार्गाने जिल्ह्यात दारू आणली जात आहे.या छुप्या पद्धतीने आणल्या जात असलेली दारू ४ पट पैसे ठेऊन विकली जात आहे. या संपूर्ण प्रकारात आता सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते देखील असेल्याचे लक्षात आले आहे.
असगर खान हा घुग्घुस येथील भाजपचा कार्यकर्ता आहे. शनिवारी रात्री( एमएच-२९ झेड-७०७०) स्कॉर्पिओ वाहनाने सहकारी सुशील रॉबर्ट यांच्यासह दारू घेऊन चंद्रपूरकडे निघालाअसल्याची गुप्त माहिती गस्तीवर असलेल्या पडोली पोलिसांना मिळाली. गाडीचा पाठलाग करण्यात करून एमआयडीसी परिसरात ही गाडी पकडण्यात आली. गाडीची तपासणी केली असता, गाडीत १ लाख २० रुपयांची दारू आढळून आली. यानंतर दारू जप्त व आरीपोंना अटक करण्यात आली.सदर कारवाई लक्ष्मण रामटेके स्वप्नील बुरेले, गणेश जोगदंडयांनी केली.