সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, June 20, 2015

खुले पत्र

    दिनांक 20 जून 2015 चे विविध वर्तमान पत्रातील बातम्यावरून चंद्रपूर जिल्हा वाईन शाॅप असोशिएशनचे सल्लागार दिपक जैस्वाल यांनी आयोजीत केलेल्या पत्रकार परीषदेची माहीती समजली. सदर पत्रकार परीषदेत मुंबई येथील मालाडच्या मालवण परीसरात दारूबंदी असल्याचा दावा श्री. दिपक जैस्वाल यांनी केल्याचे समजते. एवढे मोठे लिकर असोशिएशनचे सल्लागार असुनही मुंबईत कोठेही दारूबंदी नाही याची साधी माहीती नसल्याचे दिसून आले. सदर पत्रकार परीषदेत चंद्रपूर जिल्हयातील दारूवाल्यांनी मालाड- मालवणीच्या परीसरात विषारी दारू पिऊन मृत्यमुखी पडलेल्या 53 लोकांचे मृत्युचे भांडवल करून चंद्रपूर जिल्हयातील दारूबंदीच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी करीत आहे ही बाब अत्यंत निषेधार्ह आहे. जे मुंबईत कुठेही दारूबंदी नाही. याउलट या महानगरीत सगळीकडे परवानाधारक बियरबार, वाईन शाॅप, दशी दारू दुकाने आहेत. परवानाधारक दुकानासोबतच अवैदय दारूचे पण मुबलक विक्री होते हे या घटनेतुन पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. 
     1 एप्रिल 2015 च्या आधी चंद्रपूर जिल्हयात सुध्दा हीच परीस्थिती सगळीकडे होती हे विसरता कामा नये. चंद्रपूर जिल्हयात 550चे वर परवानाधारक दारूचे व जिल्हाभर हजारोच्या संख्येनी अवैद्य दारूविक्री करणारे धंदेवाले असेच चित्र होते. 1 एप्रिल नंतर या जिल्हयातील सर्व परवानाधारक दुकाने बंद झाले व अवैदय दारूविक्री करणारे बोटावर मोजण्या इतपत राहीले आणि कधी नव्हे एवढे धाडसत्र पोलीसंानी अवैदय दारूविक्रेत्यांच्या विरोधात सुरू केले आहे. उदा. मागील 20-30 वर्षापासुन चंद्रपूरातील खंजर मोहल्यात सर्रास अवैदय दारू मिळते हे सर्वसामान्य जनतेला माहीत असुनही त्याठिकाणी पोलीसांनी कारवाई केली नव्हती. 1 एप्रिल 2015 अर्थात दारूबंदी लागू झाल्यानंतर खंजर मोहल्ला पोलीसंाचे रडारवर आला व सगळीकडे छापे, रेड तसेच कोंबिग आॅपरेशन करून अवैदय धंदयावर मात करण्याचा ठोस प्रयत्न केला. तसेच भद्रावतीच्या चकबरांज तांडा येथे मागील 25-30 वर्षापासुन अवैदय दारूची विक्री होती परंतू तिथेसुध्दा यापूर्वी ठोस पावले उचलले गेले नव्हते आता मात्र पोलीसांनी महीलांच्या मागणीला प्रतिसाद देत भद्रावती पोलीसांनी कडक कारवाईचा पवित्रा घेतला आहे. दारूबंदीपूर्वीचे चित्र म्हणजे अवैदय धंदयावर आळा बसविण्याची संपूर्ण जबाबदारी महीला व नागरीकांवर होती. महीला अवैदय दारू पकडुन पोलीसांना फोन करायचे व माल त्यांच्या स्वाधीन करायचे आज तसे चित्र बदलले आहे. अवैदय दारू रोखण्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाने स्विकारली असुन बरेच ठिकाणी महीला व युवकांचे सहकार्याने जबाबदारी पार पाडीत आहे. ग्रामिण भागात मोठया प्रमाणावर महिला व युवक अवैदय दारूच्या विरोधात कार्य करीत असुन काही अपवाद वगळता सगळीकडे पोलीसांचा सहकार्य मिळत आहे.
    दारूबंदीमुळे ‘दारू’ हा विषय जनता, मिडीया व पशासनासाठी महत्वाचा बनला आहे. मुंबईमध्ये दारूबंदी नसल्यामुळे विषारी दारू हा पोलीस पशासनासमोर महत्वाचा व तातडीचा विषय नव्हता आणि म्हणुन तिथे 53 लोकांचा जीव गमवावा लागला. मुंबईत दारूबंदी राहीली असती तर अवैदय दारूच्या विषयाकडे पोलीस अधिक सतर्कता बाळगली असती आणि कदाचित मालवड - मालवण सारखी घटना घडली नसती.
चंद्रपूर जिल्हा दारूबंदीनंतर सकारात्मक बदल दारू विके्रत्यांना दिसत नसला तरी असा बदल दारूने पिढीत राहीलेल्या महिला, युवक, नागरीक, कामगार अनुभवत आहेत.
चंद्रपूरच्या दारूबंदीवर पूनर्विचार करण्यापेक्षा मुंबईतील घटना विचारात घेता मुंबईसह संपूर्ण राज्यात दारूबंदीचा विचार करावा.


आपली विश्वासू
अॅड. पारोमिता गोस्वामी
संयोजिका, वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चंद्रपूर जिल्हा दारूमुक्ती अभियान

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.