- दारूबंदीनंतर दारू व्यवसायिकांकडुन पुरवठा होण्याची श्रमिक एल्गारला शंका
मुंबई येथील मालवणी येथे 97 व्यक्ती विषारी दारू पिऊन मरण पावले आहे. चंद्रपूर जिल्हा दारू असोशिएशनचे सल्लागार दिपक जैस्वाल यांनी दिनांक 19 जून रोजी पत्रकार परीशद घेऊन मुंबई येथे विषारी दारू पिऊन ज्या पध्दतीने लोक मेले तशीच परीस्थिती चंद्रपूर जिल्हयातही होणार आहे, असे भाकीत केले व तशा आशयांच्या बातम्या सर्व वर्तमानपत्रात प्रसिध्द झाल्या. चंद्रपूर जिल्हयात दारूबंदी होण्यापूर्वी व दारूबंदी झाल्यानंतरही शासनाने दारूबंदीचा निर्णय घेऊ नये यासाठी दिपक जैस्वालसह या व्यवसायातील व्यावसायीकांनी विविध स्तरावर प्रयत्न केले. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही व शासनाने जिल्हयातील सर्वसामान्य नागरीकांच्या हिताच्या दृश्टीने दारूबंदी जाहीर केली. चंद्रपूर जिल्हयातील दारूबंदी यषस्वी होण्याच्या दृश्टीने पोलीस प्रषासन प्रयत्न करीत आहे. षासनाकडे आणि न्यायालयात सुध्दा दारूची दुकाने पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न फसल्याने या दारूविक्रेत्यांनी पत्रकार परीशदेत जिल्हयात दारू पिऊन लोक मरतील असे सांगीतले आहे व दारूबंदी उठविण्याची मागणी केली आहे.
दिपक जैस्वाल यांचे पत्रकार परिशदेनंतर लोकांमध्ये विषेशतः महीलांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. चंद्रपूर जिल्हयातील दारूवाले मुद्याम विशारी दारू पाजून लोकांचे बळी घेतील व स्वतःचे दुकाने पुनः सुरू करण्यासाठी सरकारकडे दारूबंदी उठविण्याची मागणी करतील. खुद्द दिपक जैस्वाल व त्यांचे व्यवसायीक मित्र यांनी पत्रकार परीशदेत असली व नकली दारू दाखवून जिल्हयात अवैदय दारू तस्करी करू षकतात हे दाखवून दिले आहे. वर्धा व गडचिरोली जिल्हयात षासनाने दारूबंदी केल्यानंतर विशारी दारू पिऊन मरण पावल्याची अजुनपर्यंत घटना घडली नाही. ही वस्तुस्थिती असतांना चंद्रपूर जिल्हयातील दारूविक्रेते ज्या आत्मविष्वासाने चंद्रपूर जिल्हयात मुंबई मालवणी सारखी विषारी दारू पिऊन मरण्याची घटना घडू षकते हे सांगत आहे त्यावरून दारू समर्थकच अषी घटना घडवून आणू षकतात याची आम्हाला भिती आहे.
जिल्हयातील दारूविक्रेते विषारी दारू पुरवठा करण्याचे षडयंत्र करीत आहेत काय? याचा शोध आपण घ्यावा. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी तसेच त्यांचे घर व प्रतिश्ठानावर पोलीसांनी कडक निगराणी ठेवावी, चंद्रपूर जिल्हयात अवैदय दारूचा पुरवठा करणा-यांवर मोक्का अंतर्गत करवाई करावी व पोलीस तसेच नागरीकांना सतर्क राहण्याबाबत जनजागृती करावी. ही विनंती.
आपली विष्वासू
(अॅड. पारोमिता गोस्वामी)
संयोजिका
आपली विष्वासू
(अॅड. पारोमिता गोस्वामी)
संयोजिका