वाडीत केव्हा धावणार विकासगाडी
उपराजधानीतून राजधानीकडे जाणाऱ्या महामार्गावर येणारे पहिले गाव म्हणजे वाडी. पूर्वीच्या शेतमळ्यांमुळे या गावाला वाडी असे नाव पडले. 1 मार्च 1958 रोजी येथे ग्रामपंचायतीची स्थापना झाली. दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या आणि सीमा विस्तारामुळे 25 ऑगस्ट 2014 रोजी वाडीला नगर परिषदेचा दर्जा मिळाला. ट्रान्सपोर्टिंगमुळे येथे वाहन, चालकाची मोठी संख्या अधिक आहे. या गावाने अनेक बदल अनुभवले. मात्र, विकासाची गाडी अद्याप पोहोचली नाही. नव्या नगरपरिषदेच्या माध्यमातून विकासगाडी धावेल, अशी अपेक्षा आहे.
गावाची ओळख
नागपूरपासून अगदी जवळ असलेले वाडी हे गाव वाहतुकदारांशिवाय औद्योगिक क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे. अंबाझरी आयुध निर्माणी आणि एमआयडीसी हे येथील लोकसंख्यावाढीचे मुख्य कारण.
60 वर्षांपूर्वी टेकडीवाडी प्रसिद्ध होती. लाव्हा येथील चोखांद्रे, टेकडीवाडी येथील इखनकर, लिचडे, गौडखैरी येथील क्षीरसागर यांची शेती सध्या वाडीत होती. शेतकऱ्यांच्या प्रत्येक शेतात विहीर होती. त्यामुळे बागायती शेती व्हायची. त्यावरूनच गावाला वाडी असे नाव पडले. पूर्वीचे 150 घरांचे गाव आता दीड हजारांवर गेले आहे. त्यामुळे लोकसंख्या 80 हजारांपेक्षा अधिक आहे.
---------------- आकडे--------
80 हजार : लोकसंख्या
6 : वॉर्ड, 17 नगरसेवक
725.66 हेक्टर : भौगोलिक क्षेत्र
3102 : वीजखांब
5 : राष्ट्रीयकृत बॅंका
4 : सहकारी बॅंक
13 : पतसंस्था
ग्रामपंचायत कर्मचारी
3 लिपिक, 2 वरिष्ठ लिपिक, एक तांत्रिक सहायक, तीन वीजतंत्री, एक संगणक चालक, 13 पाणीपुरवठा कर्मचारी, तीन परिचारक, 43 सफाई मजूर, एक ट्रॅक्टर चालक, दोन स्वीपर
155 उद्योग
पाच : जिल्हा परिषद शाळा
एक मातासंगोपन केंद्र
75किलोमीटर गावातील रस्त्यांची लांबी
33 : अंगणवाडी
50 : बचतगट, एक पोस्ट ऑफीस, 17 सार्वजनिक विहिरी, 71 हातपंप,
-----------
फोटो : वाडी एसपी 2
प्रमुख समस्या
आधार कार्ड काढण्याकरिता प्रत्येक वॉर्डात स्वतंत्र यंत्रणा तयार करणे, नागनदीचे उगमस्थान असलेल्या नाल्यांच्या बांधकामासाठी जागेची मोजणी तसेच नाला बांधकामासाठी जिल्हा नियोजन विकास निधी अंतर्गत निधी उपलब्ध करणे. आदर्शनगर येथील एनआयटीने सांधलेले सेफ्टी टॅंक ओव्हरफ्लो होत असल्यामुळे महानगरपालिकेतर्फे नियमित उपसा करणे, टेकडीवाडी येथील आबादी प्लॉटमधील गोविंदराव चोखांद्रे यांना वाटप केलेला भूखंड बऱ्याच दिवसांपासून रिकामा असल्याने हा भूखंड सरकारजमा करून रस्ता वहिवाटीकरिता नगरपरिषदेला हस्तांतरित करणे, गजानन सोसायटीमध्ये क्रीडा मैदानाकरिता 3 हजार चौरस फूट खुले मैदान असून, त्यावर खेळण्याचे साहित्य उपलब्ध करून देणे.
कंट्रोलवाडी, शिवाजीनगरमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात गोडावून असल्यामुळे अंतर्गत रस्ते सिमेंट कॉंक्रिटचे असावे. खडगाव मार्गावर गिट्टीचे कारखाने असल्यामुळे या रस्त्यावर जड वाहतूक सुरू असते. त्यामुळे खडगाव मार्गाचे कॉंकीटीकरण करणे गरजेचे आहे. 80 हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या वाडीत एकही शासकीय रुगणालय नाही ते अत्यावश्यक आहे. याशिवाय आठवडी बाजाराची समस्या, अंतर्गत रस्ते, महामार्गावरील पथदिव्यांची संख्या वाढविणे आदी समस्या आहेत. टेकडी वाडीयेथील आबादी प्लॉटमधील गोविंदराव चोखांद्रे यांना वाटप केलेला भूखंड अनेकवर्षांपासून रिकामा असल्याने सदर भूखंड सरकारजमा करून रस्ता वहिवाटीकरिता नगरपरिषदेला हस्तांतरीत करून देणे, गजानन सोसायटीमध्ये क्रीडा मैदानाकरिता तीन हजार चौ. फूट खुले मैदान असून, त्यावर खेळण्याचे साहित्य उपबल्ध करून देणे, कंट्रोलवाडी, शिवाजीनगरमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात गोडावून असल्यामुळे अंतर्गत रस्ते सिमेंट क्रॉकिटचे असावे. खडगाव मार्गावर गिट्टीचे कारखाने असल्यामुळे या रस्त्यावर जड वाहतूक सुरू असते.
शासकीय रुग्णालय, आठवडी बाजार,
------------------------------ ------------------------------ --------
दुकान गाळे हवे
लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. व्यवसाय करण्यासाठी दुकान विकत घेणे किंवा भांड्यासाठी मोठी पगडी देणे, यासाठी येथील व्यावसायिक आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत. त्यामुळे छोट्या छोट्या दुकानदारांनी महामार्गाला लागून आपला व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे अपघाताला निमंत्रण दिले जात आहे. त्यामुळे कमी वर्दळीच्या किंवा खाली असलेल्या भूखंडावर सारखे गाळे देऊन अतिक्रमण धारकांचे स्थायी पुनर्वसन करता येऊ शकते.
शाळेजवळील दारु दुकान हटावा
येथील प्रत्येक शाळेच्या जवळपास पानटपरी असून, विश्वनाथ बाबा हायस्कूल व कला विज्ञान महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ दारुचे दुकान आहे. या प्रकारामुळे परिसरात असमाजिक तत्वाचा अड्डा असून,शालेय विद्यार्थ्यांनानाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मटनविक्री महामार्गावर
दत्तवाडीतील महामार्गाला लागूनच उघड्यावर मटन विकी सुरू आहे. विक्रीनंतर टाकाऊ मांस बाजूलाच फेकला जात असून, परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यांना स्थायी ओट्याची आवश्यकता आहे. महामार्गापासून वेगळ्या ठिकाणी त्यांच्या व्यवसायाला संरक्षण द्यावे.
कोंडवाडा तसेच पशूवैद्यकीय दवाखान्याची गरज
द्रुगधामना, सोनेगाव निपाणी, आठवा मैल, लाव्हा आदी गावे वाडी परिसरात असून, येथे मोठ्या प्रमाणात दूधदुपत्याचा धंदा आहे. या गावांत गुरांचे प्रमाण अधिक असल्याने मोकाट जनावरे महामार्गावर ठाण मांडून बसतात. त्यामुळे येथे नेहमीच अपघात होत आहे. यावर आळा बसावा, यासाठी कोंडवाड्याची गरज आहे. परिसरात गुरांची संख्या अधिक असल्याने पशूवैद्यकीय रुग्णालयाची गरज आहे.
----------------
फोटो वाडी 3
बगिचा मरणासन्न
वाडी 572 व 1900 ले-आउट नागपूर सुधार प्रन्यासअंतर्गत येतात. येथे नासुप्रतर्फे दत्तवाडीत एक बगिचा व लहान मुलांसाठी प्ले ग्राउंड तयार केले आहे. परंतु खेळण्याचे साहित्य भंगार सामान झाले आहे. देखभाल, दुरुस्तीअभावी बगिचात मोठमोठे गवत वाढले असून, निसर्गसौंदर्य येथे शोधूनही सापडत नाही.
....
डॉ. आंबेडकरनगराला अस्वच्छतेचा विळखा
डॉ. आंबेडकरनगरमधील स्मशानभूमीजवळ घाणीचे साम्राज्य आहे. दोन वर्षांपूर्वी डेंग्यूमुळे येथे दोन मुलांचा मृत्यू झाला होता. सध्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले असताना परिसरातील घाण मात्र जशीच्या तशी आहे. त्यामुळे येथे डासांचा उपद्रव वाढला आहे.
......
सांडपाणी घरात
आदर्शवाडीमधील खुल्या जागेवर बांधलेली सेफ्टी टॅंक नेहमीच ओव्हरफ्लो होते. त्यामुळे टॅंकमधील घाण पाणी घरात शिरण्याचा प्रकार नित्याचाच झाला आहे. पावसाळ्याच्या दिवसांत नाले ओव्हरफ्लो झाल्यामुळे हा त्रास अधिक असतो.
.....
फोटो : वाडी चार
बौद्धविहार शहराचे श्रद्धास्थान
धम्मकीर्तीनगरातील बौद्ध विहार शहराचे श्रद्धास्थान बनले आहे. 20 वर्षांपूर्वी टेकडीवाडीयेथील मधुकर चोखांद्रे आणि सुधाकर चोखांद्रे यांनी विहार बांधण्यासाठी अडीच एकर जागा दान दिली. त्या जागेवर आज बौद्ध विहार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि बौद्ध पौर्णिमेला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. येथे विपश्यना केंद्रही आहे. परदेशातील उपासक-उपासिका या स्थळाला भेट देतात. बौद्ध धम्माचा प्रसार येथूनच होत आहे. काही भिक्खूंचे येथे वास्तव्यही आहे.
.....
महामार्गावरच भरते गुजरी
सर्वसामान्य नागरिकांना कितीही त्रास झाला तरी चालेल, परंतु महामार्गावर रोज भरणारी गुजरी हटणार नाही, अशी हेकेखोर भूमिका काही किरकोळ व्यापाऱ्यांनी घेतल्यामुळे आजही मुख्य रस्त्यावर बाजार भरतो. इंदिरानगरातील जमीन रिकामी असूनही तेथे आठवडी बाजार तसेच गुजरी भरविण्यासाठी एकही स्थानिक प्रतिनिधी पुढाकार घेत नाही. मुख्य रस्त्यावर बाजार भरत असल्यामुळे वाहतुकीला प्रचंड अडथळा होतो. अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
...
अग्निशमन वाहनाची प्रतीक्षा
येथे मोठ-मोठे गोडावून असल्यामुळे आग लागण्याच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. परंतु, आगीवरील नियंत्रणासाठी एकही अग्निशमन वाहनाची व्यवस्था नाही. आग लागून गोडावूनमधील माल जळून खाक झाल्यावर बाहेरून अग्निशमन वाहन येते.
....
वाहतुकीची कोंडी
शहर राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे दिवसभरात अनेकदा वाहनांची कोंडी होते. त्याचा त्रास येथील नागरिक, विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो. येथून नागपूरला ये-जा करणाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी वाहतूक कोंडी ठरलेली असते.
....
फोटो वाडी 2
गोडावून मालकाचे चांगभलं
उपराजधानीचा 40 टक्के व्यवहार वाडीवरून चालतो. येथे 2500 गोडावून आहेत. प्रत्येक वॉर्डात गोडावूनची फॅशन झाली आहे. परंतु यामुळे रहदारीची समस्या निर्माण झाली. ज्या मालकांनी गोडावून बांधून भाड्याने दिले त्यांची चांगली कमाई होते. परंतु अरुंद रस्त्यांवरून गोडावूनमध्ये मोठमोठे ट्रक येत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. वाहन वळविताना अनेक घरांच्या संरक्षण भिंतीही पडल्यात. मात्र, उपाययोजना करण्यात आली नाही. 40 वर्षांपासून ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू असल्यामुळे येथील 80 टक्के लोक या व्यवसायात आहेत. ओव्हरलोडेड वाहतुकीमुळे रस्त्यांची पार वाट लागली आहे. अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. वाडी ट्रान्सपोर्टिंग हब झाल्यामुळे येथील वाहनांच्या पार्किंगसाठी दुसरी जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
-------
खाणीत आणखी किती बळी
जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या मार्गावर 60 फूट खोल असणाऱ्या खाणीला संरक्षक भिंत नसल्यामुळे आजवर अनेकांना प्राण गमवावे लागले. याच मार्गावर जवाहरलाल नेहरू कला व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालय आहे. संरक्षक भिंत बांधण्याची मागणी गेल्या 15 वर्षांपासून सुरू आहे. खाणीत आतानर्यंत एक ट्रक कोसळला असून, तो अद्यापही निघालेला नाही. भिंतीअभावी 10 नागरिकांना प्राण गमवावे लागले. एकदा ऑटोसह चालक कोसळला होता. तेव्हा ऑटोचालकांनी आंदोलन केले होते. मात्र, येथे संरक्षक भिंत बांधण्यात आली नाही.
नवनीत नगरात जुन्याच समस्या
नवनीतनगर हा वाडीतील एक भाग असून, येथे वाडीतील प्रत्येक वॉर्डातील जमा केलेला कचरा येथील मोकळ्या जागेत टाकला जातो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. अंतर्गत रस्त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने वाट बिकट झाली आहे.
-----------
प्रतिक्रिया
रुग्णालय अत्यावश्यक
हा परिसर पाच किलोमीटरचा असून, येथे कामागारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने येथे मोठे रुग्णालय होणे गरजेचे आहे. माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी पुढाकार घेऊन शासकीय रुग्णालयाचे भूमिपूजन केले. परंतु अद्याप रुग्णालयाचे काम पूर्ण झालेले नाही. स्थानिक लोकप्रतिनिधीचे दुर्लक्षित धोरण त्यासाठी कारणीभूत आहे.
- संतोष नरवाडे
-----------
क्रीडांगणाकडे दुर्लक्ष
एक लाख लोकसंख्येच्या वाडीत मुलांसाठी क्रीडांगण नसणे, ही दुर्दैवी बाब आहे. जागा उपलब्ध असताना लोकप्रतिनिधींच्या उदासीन भूमिकेमुळे मुले मैदानी खेळापासून वंचित आहेत. आंबेडकरनगरमधील स्मशानभूमीत सुविधांचा अभाव आहे.
- गोविंद रोडे
..........
रस्त्यांची दूरवस्था
ट्रान्सपोटिंग हब, असे बिरुद मिळविलेल्या वाडीत प्राथमिक सुविधांचा अभाव आहे. ग्रामपंचायतीला कोट्यवधी रुपयांचा कर मिळूनही येथील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे आहेत. जड वाहतुकीच्या समस्येचे कारण पुढे करून रस्त्यांची डागडुजी केली जात नाही. पावसाळ्यात नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
- हर्षल काकडे
लोकप्रतिनिधींची उदासीनता
स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासीन भूमिकेमुळे शहराचा विकास खुंटला आहे. नागपूर शहरातील ट्रान्सपोर्टिंगचे मुख्य काम येथून चालत असल्यामुळे येथे मूलभूत सुविधा असणे गरजेचे आहे.
श्याम मंडपे, माजी उपसरपंच
.....
एमआयडीसीला जीवदान मिळावे
वाडी परिसराच्या एमआयडीसीतील 25 टक्के कारखाने बंद आहेत. वाढत्या यांत्रिकीकरणामुळे बऱ्याच कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याने बंद कारखाने सुरू होणे गरजेचे आहे. काही कारखान्यांमध्ये कमी मजुरी मिळत असल्याने मजुरांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे एकसमान वेतन मिळावे.
दिलीप चौधरी, ग्रामपंचायत सदस्य
........
औषधालयाची गरज
ऑर्डनन्स फॅक्टरीमधून सेवानिवृत्त झालेले अनेक कर्मचारी वाडीत स्थायिक झाले. केंद्रातील सेवानिवृत्तांना डॉक्टर तसेच औषधांची सुविधा पुरविली जाते. परंतु सर्वच चौदाही औषधालय नागपूर शहरात आहे. त्यामुळे वाडीसाठी एक औषधालय मिळावे.
- भारती पाटील, पंचायत समिती सदस्य
...
वळण मार्गाची गरज
वाडी नाका ते आठवा मैलदरम्यान वळण मार्ग नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. जुन्या पांदण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. महामार्गाच्या बाजूला रस्त्यावर ट्रक उभे राहतात. त्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते.
- संजय अनासाने
...
नागनदीवर अतिक्रमण
नागनदीचा उगम, हे वाडीचे वैशिष्ट्य आहे. परंतु या उगमस्थानीच स्थानिक रहिवाशांनी अतिक्रमण केले आहे. नागनदीला संरक्षण भिंत बांधणे, हे पालिकेचे कर्तव्य आहे. नदीत मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले जाते. त्यामुळे स्थानिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
- प्रेम झाडे
....
मालकी पट्टे कधी मिळणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील रहिवाशांना मालकी पट्टे देण्याचा निर्णय 35 वर्षांपर्वी घेण्यात आला. परंतु त्यावर अंमलबजावणीच झाली नाही. येथील 80 टक्के रहिवाशांचे घर त्यांच्या नावावर नाही. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
रूपेश झाडे, माजी उपसभापती
...
पोलिसांची संख्या वाढवावी
फुटाळा ते धामणा असा 20 किमीचा परिसर वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो. वाडीपोलिस ठाण्यात अधिकारी व कर्मचारी मिळून 40 जण आहेत. यातील 20 जण दिवसा आणि 20 रात्री असतात. नागपुरात व्हीआयपी आल्यास बंदोबस्तासाठी येथील पोलिसांची कुमक पाठविली जाते. अशा परिस्थितीत एखादी घटना घडल्यास मोठी अडचण होते.
- मोहन ठाकरे
...
स्वच्छतागृहाची व्यवस्था व्हावी
वाडीत सार्वजनिक शौचालय आणि मूत्रीघरांचा अभाव आहे. ट्रान्सपोर्ट हब असल्यामुळे येथे वाहतूकदार, कामगारांची संख्या अधिक आहे. परंतु, त्यांच्यासाठी शौचालयाची पुरेशी व्यवस्था नाही. राष्ट्रीय महामार्गालगत असूनही प्रवासी निवारा नसणे, ही फार मोठी शोकांतिका आहे.
- संतोष केचे
........
बेरोजगारीची समस्या
एकेकाळी शेतीची वाडी असणाऱ्या या भागात आता शेती शिल्लक नाही. त्यामुळे अनेक तरुण बेरोजगार आहेत. बाहेरून येणाऱ्या कामगारांमुळे स्थानिकांना रोजगार मिळत नाही.
- प्रा. मधुमाणके पाटील (अध्यक्ष, तंटामुक्त गाव समिती)
-----------
समस्या यांना सांगा
आमदार विजय घोडमारे 9370315080
तहसीलदार शोभराज मोटघरे 9422132461
पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे 9870298870
ग्रामविकास अधिकारी इंद्रजित ढोकणे 9422815531

------------------------------