সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, June 21, 2015

साम्राज्य फेसबुकचे

नचिकेत प्रकाशन नागपुर ने “साम्राज्य फेसबुकचे” हे पुस्तक नुकतेच प्रकाशित केले, या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. या पुस्तकातून लेखक सुनील पाठक, अमरावती यांनी एकून तेरा प्रकरणातुन फेसबुक या जगप्रसिद्ध वेबसाईटला मध्यवर्ती ठेउन सोशल मीडिया बद्दल उत्तम माहिती दिली आहे. 

पुस्तकाचा उद्देश या सर्व प्रकारच्या नव-माध्यमांशी अपरिचित असलेल्या कोणालाही सोशल नेटवर्क वा सोशल मीडिया म्हणजे काय व त्याचे जीवनाच्या विविध पैलूंवर कसे परिणाम होत आहेत या बद्दल रंजक माहिती दिली आहे. पुस्तकाच्या सुरवातीला सोशल नेटवर्क ची माहिती फेसबुक ची विकास वाटचाल व त्याच्या विकास मार्गातील गमती-जमती दिल्या आहेत. फेसबुककर्ता मार्क झकरबर्ग याच्याबद्दल विस्तृत प्रकरणात त्याच्या व्यक्तिमत्वा बद्दल व सम्पूर्ण जग खुले व् कनेक्टड करण्याच्या या मार्कच्या स्वप्नाबद्दल खुप माहिती दिली आहे. सोशल नेट्वर्किंग चा राजा असणाऱ्या फेसबुकच्यायशा मध्ये व कमीत कमी कर्मचारी संखे मध्ये प्रचंड मिळकत या बाबी मध्ये त्याच्या प्ल्याटफॉर्म या संकल्पनेचा कसा वाटा आहे वा फेसबुकने जगभरातील अब्जावधी लोकांना कामाला लाऊन स्वता कशी प्रचंड मिळकत मिळवली हे वाचून आश्चर्य वाटते. कोणतेही सोशल नेटवर्क वापरतांना ते कसे सुरक्षित नाही वा प्रत्येकाची माहिती कशी केव्हाही उघड होऊ शकते वा फेसबुक सारख्या वेबसाईट वरुन एखाद्या व्यक्तिमात्वाचे वा राष्ट्रातील स्थितीचे विश्लेषण-आकलन केले जाऊ शकते या बद्दल सोप्या उदाहरणावरुण माहिती दिली आहे. सुनील पाठक यानी प्रस्तावनेतच सोशल नेट्वर्किंग हे प्रकरण इतके वाढत जाइल व ते एक जीवनाचे साधन होइल असे म्हंटले आहे परन्तु याची व्याप्ति व् नाजुकता पाहता सोशल नेटवर्क चे राष्ट्रीयकरण करण्याची वेळ येऊ शकते असे सूतोवाच केले आहे. यूजर प्रायव्हसी व आजच्या पालकांसाठी असलेले विशेष प्रकरण हे या पुस्ताकास उपयुक्त बनवते. सामाजिक सम्पदा वृद्धिन्गत करण्यासाठी या मंचाचा वापर कसा होत आहे व खोडकर वापर कसा केला जातो याचे विवेचन जागोजागी केले आहे. शिक्षण क्षेत्रावर परिणाम या प्रकरणात सतत शोशल नेटवर्क च्या कट्ट्यावर पडीक असणारया तरुण पिढी मुळे शिक्षण क्षेत्रावर कसा परिणाम होत आहे याचा उहापोह केला आहे. शिक्षणात रचनात्मक उपयोग केल्यास सहाय्यभूत साधन वा शैक्षणिक साहित्य म्हणून केल्यास आजचे शिक्षण जास्त परस्पर संवादी करता येईल या बद्दल काही कल्पना मांडल्या आहेत. फेसबुक चे सामाजिक व राजकीय परिणाम कसे व का होत आहेत यावर दोन प्रकारणे आहेत. सोशल नेट्वर्किंग चा व्यावसायिक उपयोग सुद्धा होऊ शकतो या बद्दल एक प्रकरण छान आहे. भविष्यात कोणत्या योजनांकडे फेसबुकची वाटचाल आहे व ५ अब्ज लोकांना जोडणारे जाळे निर्माण करण्याचा मानस मार्क झकरबर्ग चा आहे व जग जिंकण्याचे स्वप्न अलेक्झांडर पूर्ण करू शकला नाही, मात्र कोणतेही शस्त्र न वापरता मार्क कसा जगजेता झाला आहे या बद्दल माहिती दिली आहे.

हे पुस्तक इ-बुक व छापील दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. या पुस्तकाच्या इ-बुक चे विमोचन महाराष्ट्र राज्याचे मुखमंत्री श्री देवेंद्र फडणवीस ( एक वर्षा पूर्वी- विरोधो पक्षात असताना) केले आहे. ए-बुक आवृत्ती बुकगंगा, न्यूजहंट, गुगल इत्यादी साईट वर उपलब्ध आहे तर छापील आवृत्ती शहरातील विविध पुस्तक भांडारात उपलब्ध आहे. छापील आवृत्ती लवकरच अमाझोन, फ्लिपकार्ट आदी वेब साईटवर लवकरच उपलब्ध होणार आहे. १८० पाने असणाऱ्या पुस्तकाचे मुखपृष्ठ श्री संजय अकोलीकर यांनी अत्यंत सुरेख व आशयपूर्ण असे तयार केले आहे. सदर पुस्तक नचिकेत प्रकाशन नागपूर याचे कडून nachiketprakashan.com या वेब साईट वरून मागविता येईल

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.