नागपूर - ट्रक, बस आणि अन्य मालवाहू वाहनांच्या मागच्या बाजूला अनेक संदेश लिहिलेले असतात. काही संदेशांतून जनजागृती होते, तर काहींतून विनोद. मात्र, "हॉर्न ओके प्लीज‘ असा संदेश लिहिलेल्या वाहनांवर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी सर्व ठाणेदारांना तपासणीच्या सूचना दिल्या.
जनजागृती आणि वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी मालवाहू किंवा प्रवासी वाहनांच्या मागच्या बाजूला काही तरी संदेश लिहिलेला असतो. बूरी नजरवाले तेरा मूह काला, फिर मिलेंगे, आई-बाबांचा आशीर्वाद, बाबा जल्दी आना यासह "हॉर्न ओके प्लीज‘ असा संदेश वाहनांच्या मागे हमखास दिसतो. मात्र, "हॉर्न ओके प्लीज‘ या संदेशातून हॉर्न केव्हाही वाजविणे योग्य असल्याबाबत अत्यंत चुकीचा संदेश जनमानसात जातो. असा संदेश प्रदर्शित करणे हे महाराष्ट्र मोटर वाहन अधिनियमाच्या तरतुदींचा भंग करणारे आहे. वाहनावरील हॉर्न व सायरनच्या अनावश्यक वापराबाबत कारवाई करण्याचे शासनाचे आदेश आहेत. याकरिता महाराष्ट्र राज्य शासनाला राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ व राष्ट्रीय हरित न्यायालयाने वेळोवेळी सूचनाही दिल्या होत्या. यावरूनच नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी जिल्ह्यात वाहनांची तपासणी करून कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.