महावितरणची पोलखोल
मॉन्सूनपूर्व तयारीचा दावा करणाऱ्या मंडळाचे अकराशे वीजखांब जमीनदोस्त
महावितरणला तब्बल 62 लाखांचा फटका, शासनाकडून मिळालेला निधी गेला कुठे?
चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे महावितरणची पोलखोल झाली आहे. वादळामुळे पूर्व विदर्भातील उच्च आणि लघुदाबाचे तब्बल एक हजार 191 वीजखांब जमीनदोस्त झाल्याने महावितरणचे 62 लाखांचे नुकसान झाले. यावरून मॉन्सूनपूर्व तयारीसाठी मिळालेला लाखोंचा निधी पाण्यात गेल्याचे स्पष्ट दिसत आहे.
नागपूर जिल्ह्यासह चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा आणि भंडारा जिल्ह्यांत गेल्या दोन दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. पूर्व विदर्भातील उच्चदाबाचे 255, तर लघुदाबाचे 936 वीजखांब जमीनदोस्त झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील उच्चदाबाचे 65, तर लघुदाबाचे 128 वीजखांब कोसळले. गडचिरोली जिल्ह्यातील उच्चदाबाचे 108, तर लघुदाबाचे 309, गोंदिया जिल्ह्यातील उच्चदाबाचे 19, लघुदाबाचे 309, वर्धा जिल्ह्यात 34 उच्चदाबाचे, तर लघुदाबाचे 288 वीजखांब जमीनदोस्त झाले. भंडारा जिल्ह्यात 29 उच्चदाबाचे, तर 73 लघुदाबाचे खांब कोसळले. अनेक ठिकाणी वीजखांब कोसळून पडल्याने वीजपुरवठाही खंडित झाला आहे. यावरून मॉन्सूनपूर्व तयारी केल्याने उत्तम सेवा देण्याचा दावा करणा-या महावितरणची चांगलीच पोलखोल झाली. अनेक गावात विजपुरवठा नाही. असे असतानाही अधिकारी मात्र विजेवर चालणा-या उपकरणात मस्त झोपा काढत आहेत.
- देवनाथ गंडाटे