चंद्रपुर – समाजसेवक बाबा आमटे यांच्या वर आज टपाल तिकीटाचे प्रकाशन आज राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले,चंद्रपुरात बाबांच्या स्मृतीत दोन कोटी खर्चुन अभ्यासिका उभारणार या अभ्यासिकेच्या माध्यमातून युपीएससी एमपीएससी अशा अनेक स्पर्धा परीक्षा मध्ये भाग घेण्यासाठी आणि स्पर्धेत टिकण्यासाठी या अभ्यासिकेचा वापर होईल अशी घोषणा आज राज्याचे अर्थ व् नियोजन व् वने मंत्री तथा चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यानी केली ते आज कै. बाबा आमटे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रकाशीत टपाल तिकीटांचा सादरीकरण समारंभा प्रसंगी बोलत होते आज चंद्रपुर येथील प्रियदर्शीनी नाटयगृह, येथे हां कार्यक्रम पार पडला या वेळी राज्याचे अर्थ नियोजन व् वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या टपाल टिकिटाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले लहानपणापासुन डायरी लिहीण्याची मला सवय आहे आजचा दिवस डायरी लिहीण्यासारख आहे कारण बाबावरच्या तिकीटाच सादरीकरण करण्यात माझ खारीचा वाटा आहे तसेच जनसेवा करणा-यांची तीन तीन पिढया आमटे कुटूंबियाच्या रुपाने समाजाची सेवा करत आहे हे दुर्मिळ वास्तव आहे स्वर्गीय बाबानी देशात चंद्रपुर जिल्हयाच नाव उभ केल अशा बाबांचा समाजातल्या वंचितासाठी काम करण्याचा वसा सर्वानी पुढे चालवायला हवा बाबाच जन्म हिंगणघाट तर कर्मभूमी चंद्रपुर बाबाच जन्मगाव असलेल्या वर्धा आणि चंद्रपुर जिल्हयाच पालकमंञी म्हणून काम करायला मिळाले ही माझ्या साठी खुप मोठी अभिमानाची गोष्ट आहे असे ही मुनगंटीवार आपल्या भाषणात म्हणाले