चंद्रपूरः बनावट नोटा चलनात आणणारे रॅकेट राज्यव्यापी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आता अटकेत असलेल्या आरोपींची संख्या नऊ झाली आहे. पुण्याचा प्रमोण मोहकार, अहमदनगरच्या प्रकाश वडीटाके , अकोल्याचा अभिजीत म्हैसकर , चंद्रपूरचा नागेश अहिरे , मूलचा सचिन कोटपल्लीवार , मुख्य सूत्रधार नाशिकचा बाबा जाधव , अकोल्याचा राजेश दंदेकर ,गडचिरोलीचा त्रिदेव मुझुमदार आणि पानगडे यांना अटक करण्यात आली आहे. यातील बाबा जाधव हा नोटा स्कॅनिंग करीत होता. सर्व आरोपींना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. चंद्रपुरातील बसस्थानक परिसरातील सुशिल्का हॉटेलमध्ये थांबलेल्या तीन व्यक्तींना
तब्बल ३२ लाख रुपयांच्या नकली नोटांसह चंद्रपूर आणि गडचिरोली पोलिसांनी संयुक्त कारवाईत
अटक केली. या तिघांसह चंद्रपुरातील एकाला या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
या नोटांचा वापर नक्षलवाद्यांसाठी शस्त्र खरेदीसाठी केला जाण्याचीही शक्यता पोलिसांनी
व्यक्त केल्यानं या प्रकरणाचं गांभीर्या वाढलं आहे. या प्रकरणातील मास्टर माइंडहा नाशिक इथं असल्यानं त्यालाही अटक होण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर पोलिसांनी प्रदर्शनात मांडलेल्या या हजार रुपयांच्या नोटा
असली नसून बनावट आहेत. तब्बल ३२ लाख रुपयांच्या बनावट नोटा चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली
जिल्ह्यात जाणार होत्या. मात्र, गडचिरोली पोलिसांना याची माहिती मिळाली आणि चंद्रपूर पोलिसांच्या
मदतीनं बनावट नोटांचा व्यापार करणाèया टोळीला अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रमोद दत्तात्रय मोहरकर, पुणे, प्रकाश चांगदेव वडितके, रा. qपपळगाव (अहमदनगर),
अविजित धर्मराज म्हैसकर,
अकोला आणि नागेश प्रभाकर
अहिरे, चंद्रपूर
यांचा समावेश आहे. या प्रकरणातील मास्टर माइंड प्रमोद जाधव हा नाशिक इथला रहिवासी असून,
त्याच्या अटकेसाठी
पोलिस पथक रवाना झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथून काही व्यक्ती स्कार्पिओ
या गाडीनं तीन एप्रिलला चंद्रपुरात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ते हॉटेल
सुशिल्का इथं थांबणार असून त्यांच्याकडे नकली नोटा आहेत. नकली नोटा देऊन त्या बदल्यात
काही व्यक्तींकडून खèया नोटा घेणार आहेत,
अशी मटीपङ्क गडचिरोली
येथील सहायक पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांना मिळाली होती. त्यानंतर बावकर आपल्या पथकासह चंद्रपुरात दाखल झाले. पोलिस अधीक्षक राजीव
जैन यांनी लगेच चंद्रपूर आणि गडचिरोली पोलिसांचं संयुक्त पथक तयार केलं आणि रात्री
हॉटेल सुशिल्का इथं छापा टाकला. तेव्हा हॉटेलमध्ये प्रमोद मोहरकर, अविजित म्हैसकर आणि प्रकाश
वडितके आढळले. त्यांना ताब्यात घेऊन गाडीची झडती घेतली, तेव्हा हजार आणि पाचशे रुपयांच्या
एकूण ३२ लाख तीन हजार रुपयांच्या नोटा आढळून आल्या. सोबतच एक लाख २८ हजार रुपयांच्या
खèया नोटाही पोलिसांना मिळाल्या. आरोपींनी
आपल्या वाहनावर ममहाराष्ट्र पोलिसङ्क असं लिहिलं होतं. गंमत म्हणजे ज्या हॉटेलमध्ये
हे आरोपी थांबले, ते हॉटेल पोलिस मुख्यालयाच्या अगदी समोर आहे. आरोपींकडून पोलिसांनी या तिघांसह लॅपटॉप, पाच मोबाईल ङ्कोन जप्त केले. या आरोपींकडून
मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपुरातील मध्यस्थ नागेश अहिरे यालाही पोलिसांनी ताब्यात
घेतलं. त्याच्याही घरून हजार रुपयांच्या २४ व पाचशे रुपयांच्या दोन नकली नोटा तसंच
एक लाख २६ हजार ५०० रुपयांच्या खèया नोटा पोलिसांनी जप्त केल्या.
चंद्रपुरातील नागेश अहिरे हा मध्यस्थाचे कामकरीत होता. या प्रकरणात सचिन
कोटपल्लीवार या आणखी एका मध्यस्थाचं नाव समोर आलं आहे. तो मूल येथील असला तरी सध्या
तो गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी इथला रहिवासी आहे. नकली नोटा छपाईचं कामनाशिक
इथं चालत होतं. पोलिस तपासात काही खळबळजनक बाबीही समोर आल्या. या नकली नोटा शस्त्रसाठा
खरेदीसाठी वापरल्या जाणार असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. तसंच या
प्रकरणाचे तार गडचिरोली जिल्ह्याशी जुळले असल्यानं नक्षली कारवायांत हा पैसा वापरला
जाणार होता का, या दिशेनेही तपास सुरू आहे. तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी या प्रकरणात गोपनीयता बाळगली आहे. येत्या
दोन-तीन दिवसांत नकली नोटा छापणारे मोठे रॅकेट हाती लागण्याची शक्यता असून,
त्याचा वापर यापूर्वी
कधी केला आणि कुठे केला जाणार होता, यावरून पडदा उठण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गडचिरोलीचा
संबंध असल्यानं प्रकरण गंभीर झालं आहे.
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
१५ फेब्रुवारी रोजी पुण्यात वितरण ढोलकीफड तमाशा महोत्सवाचे आयोजन मुंबई, दि. ६ : राज्य शासनातर्फे दरवर्षी देण्यात येणारा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लोकशाहीर बशीर कमरोद्दीन मोमीन (कवठेकर) यांना जाहीर झाला असून, १५ फेब्रुवारी रोजी पुणे येथे होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तमाशा क्षेत्रात विठाबाई नारायणगावकर यांनी केलेली प्रदीर्घ सेवा विचारात घेता त्यांच्या नावे तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकारास राज्य सरकारतर्फे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. महाराष्ट्र शासनातर्फे सन २००५ पासून तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार विविध कलाकारांना प्रदान करण्यात आला आहे. तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार यंदा लोकशाहीर बशीर कमरोद्दीन मोमीन (कवठेकर) यांना घोषित करण्यात आला आहे. गतवर्षीचे पुरस्कार विजेते ज्येष्ठ कलाकार मधुकर नेराळे यांच्या हस्ते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप रुपये ५ ...
– अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार* पोंभुर्णा येथे टूथपिक उत्पादन केंद्र, बांबु हॅन्डीक्राफ्ट व आर्ट युनिटचे लोकार्पण आजपर्यंत टूथपिक तायवानहून आयात व्हायची पण आता आसाम नंतर फक्त पोंभुर्णा येथे टूथपिक तयार होणार आहे. पोंभुर्णा येथे तयार होणा-या टूथपिक या पुढील काळात आपण पंच तारांकित हॉटेल्सला पुरवू शकतो. आदिवासी बहुल असलेल्या पोंभुर्णा तालुक्यात टूथपिक उत्पादन प्रकल्पाच्या माध्यमातुन रोजगार निर्मीतीचे नवे दालन तयार होत आहे. पोंभुर्णा तालुक्यात विकासकामांसह रोजगार निर्मीतीच्या दृष्टीने अनेक प्रकल्प आपण राबवित आहोत. मी विकास करतो, तुम्ही सहकार्य करा असे आवाहन अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. दिनांक 21 डिसेंबर रोजी चंद्रपूर जिल्हयातील पोंभुर्णा येथे आयोजित टूथपिक उत्पादन केंद्र तसेच बांबु हॅन्डीक्राफ्ट अॅन्ड आर्ट युनिट च्या लोकार्पण सोहळयाच्या निमीत्ताने आयोजित कार्यक्रमात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, पंचायत समिती पोंभु...
गडचिरोली - गेल्या ४० वर्षांपासून नक्षल चळवळीत सक्रिय असलेला नक्षल्यांच्या तांत्रिक विभागाचा प्रमुख रामन्ना उर्फ श्रीनिवासी मडरू हा शस्त्रास्त बनविण्यात पारंगत होता. त्याने नक्षल्यांच्या विविध दलममध्ये सेवा दिली आहे. त्यामुळे त्याची अटक हा नक्षल्यांसाठी मोठा हादरा आहे. दरम्यान रामन्नासह त्याची पत्नी पद्माला शनिवारी गडचिरोली जिल्हा न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गडचिरोलीसह आंध्रप्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेशात नक्षल चळवळीत सेवा देणा-या रामन्ना व पद्मा या दाम्पत्याला शुक्रवारी पहाटे गडचिरोली पोलिसांच्या सूचनेनंतर चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारशहा रेल्वे स्थानकावर अटक झाली होती. प्राथमिक चौकशीनंतर त्यांना दुपारी गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रामन्ना शस्त्रास्त्र बनविण्यात आणि ते चालविण्यात पारंगत होता. त्यामुळे त्याला अनेक दलममध्ये नक्षल्यांना प्रशिक्षित करण्यासाठी पाठविण्यात आले होते. दंडकारण्य कमिटीशिवाय त्याने कोंडागाव, माल, टिपागड, अहेरी आणि बस्तरच्या जंगलात नक्षल दलममध्ये सेवा दिली आहे. त्यामुळे शासनाने त्याच्यावर २५ लाख रुपयांचे इनाम ठेवले होते....