সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, April 20, 2013

देश घडविण्याचे काम साहित्यातून व्हावे


आमदार सुधीर मुनगंटीवार ; राज्यस्तरीय स्त्री शक्ती साहित्य संमेलनाचे थाटात उदघाटन

चंद्रपूर- दुरचित्रवाहिन्यांवर सध्या सुरु असलेल्या मालिकांमुळे समाज स्वाथ्य बिघडत असून, साहित्यिकांनी देश घडविण्याचे काम साहित्यातून करावे, असे आवाहन भाजपचे माजी प्रदेश अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.   
सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचातर्फे आयोजित राज्यस्तरीय स्त्री शक्ती साहित्य संमेलनाचे उदघाटन शनिवार  दि. 20 रोजी  थाटात पार पडले. मान्यवराच्या हस्ते सावित्रीबाई फुले आणि माता जीवाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.  
यावेळी मंचावर भाजपचे आमदार सुधीर मुन्गंतीवार, सम्मेलनध्याक्ष प्रसिद्ध लेखिका व कथाकार डॉ. प्रतिमा इंगोले, स्वागताध्यक्ष किशोर जोरगेवार व सूर्यांश संस्थेचे अध्यक्ष इरफान शेख, शोभाताई पोटदुखे, सुरेश तालेवार, विदर्भ साहित्य संघाचे कायकारीणी सदस्य डॉ.जाकीर षेख यांचीही उपस्थिती होती.
शनिवार  दि. 20 व रविवार 21 एप्रिल2013 आयोजन प्रसिद्ध लेखिका व कथाकार डॉ. प्रतिमा इंगोले यांचे अध्यक्षतेत सरदार पटेल महाविद्यालयात करण्यात आलेले आहे. 
यावेळी  आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, साहित्यात थकवा दूर करण्याची ताकद असते. म्हणूनच पूर्वी आजी घरी काम करताना ओवी म्हणायची. त्यामुळे पहिल्या साहित्यिक महिलाच होत. जेव्हा आई काम करताना गाणी म्हणते, तेव्हा तिचा कामावरील थकवा दूर होतो. त्यासाठी कोणतीही  ओषधं घेण्याची गरज पडली नाही. त्यातूनच साहित्यात एकाग्रतेने काम करण्याची जिद्द मिळते, असेही आमदार सुधीर मुन्गंतीवार म्हणाले. 
स्वागताध्यक्ष किशोर जोरगेवार म्हणाले,  स्त्री षिक्षणापासून सुरु झालेला स्त्रीचा स्वंयभू प्रवास लक्षात घेता 21 व्या शतकाकडे वाटचाल करणारी स्त्री आज स्त्रीशक्तीच्या रुपात वावरतांना दिसते.अनेक क्षेत्र तिने काबीज केले आहे. तिला हे यश मात्र सहजासहजी प्राप्त झाले नाहीतर जिद्दचिकाटीसंघर्शकश्ट, प्रायत्न यांची सतत सोबत करीत तिला हे यषोषिखर गाठता आले आहे. तिच्या या प्रवासाचा नागर-ग्रामीण भागातील अलक्षित स्त्रियांना जवळून परिचय घडावा तसेच स्त्री जाणिवंाच्या विविध पैलूवर सशक्त चर्चा करता यावी याकरीता चंद्रपूरातील महाराश्ट्रातील सामाजिक,साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यरत स्त्री-पुरुशांच्या विचारांची देवाण-घेवाण या संमेलनामागची प्रेरणा आहे. चंद्रपूर शहरात स्त्री साहित्य संमेलन आयोजित केल्याचे म्हणाले. 
संमेलनातील कार्यक्रमात विविध विशयावर तीन चर्चासत्र तसेच दोन कविसंमेलन / कथाकथन / सांस्कृतिक कार्यक्रम / अभिरुप न्यायालयाचा समावेश आहे.  

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.