সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, April 11, 2013

पाथरी जंगलात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार


चंद्रपूर- गुढीपाडव्याच्या दिवशी सावली ताकुक्यातील पाथरी जंगलात सकाळी साडेसातच्या दरम्यान एका वाघाने महिलेचा फडशा पाडल्याची घटना घडली. वनविकास महामंडळाच्या पाथरी जंगलातील कक्ष क्रमांक १६२मध्ये पाथरी येथील रहिवासी ललीता आनंदराव पेंदाम (५० वर्ष) ही महिला मोहफुले गोळा करण्यासाठी गेली होती. यावेळी बेसावध असलेल्या ललीता पेंदाम यांच्यावर वाघाने झडप घातली. वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये रोष असून परिसरातील वातावरणात तणाव निर्माण झाला आहे. यामुळे परिसरात खळबळ माजली असून रहिवाशांनी वनविभागाच्या कारभारवर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील मागील १५ दिवसांत पाच जणांचा मृत्यू हा वाघ व बिबट्याच्या हल्ल्यात झाला आहे. बुधवारी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात बिबट्याने दोन जणांचा बळी घेताला होता.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.