সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, April 17, 2013

बिबट मृत्यू : दोन जणांना ताब्यात घेतले

चंद्रपूर- पाइपमध्ये निमूटपणे बसलेल्या अवघ्या चार महिन्यांच्या बिबट्याच्या बछड्याची गावकऱ्यांनी जाळूनहत्या केली . या घटनेत एका बछड्याचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे .जखमी बछड्याला चंद्रपूर येथे उपचारासाठी आणण्यात आले. या घटनेमुळे वन्यजीवप्रेमींच्यावर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले.
गोंदिया - चांदाफोर्ट रेल्वे मार्गावर रेल्वेखाली येऊन वाघिणीच्या एका बछड्याचा मृत्यू तर एक गंभीरजखमी झाला . या घटनेला ४८ तास उलटत नाही तोच सावलीजवळील व्याहाड - ब्रह्मपुरी मार्गावरीलनिफंद्रा बसस्थानकाजवळ घडलेल्या या घटनेने सारेच अवाक् झाले आहेत . निफंद्रा बसस्थानकाच्याबाजूला आईपासून दुरावलेले बिबट्याचे दोन बछडे लपून बसले होते . आसपासच्या लोकांना हेमाहिती होताच त्यांनी याठिकाणी एकच गर्दी केली . काही उत्साही लोकांनी पाइपच्या दोन्ही बाजूकापड आणि इतर कचरा टाकून बंद केल्या आणि दोन्ही बाजूंना आग लावली . सायंकाळी सुमारेसाडेपाचच्या सुमारास ही घटना घडली . दरम्यान , कुणीतरी पोलिसांना या घटनेची माहिती दिली .पोलिस घटनास्थळी पोहोचताच लोकांनी घटनास्थळावरून पोबारा केला . एका बछड्याचा जागीचमृत्यू झाला होता तर एकाला वाचवण्यात पोलिसांना यश आले . त्यांनी या घटनेची माहितीवनविभागाला दिली. मुख्य वनसंरक्षक बी . एस . के . रेड्डी , सहाय्यक वनसंरक्षक राजीव पवार व त्यांची चमू घटनास्थळी पोहोचली . अंदाजे चार ते सहा महिन्यांचे हे बछडे असून , जखमी बछड्याला चंद्रपूर येथील डॉ . कडूस्कर यांच्याकडे उपचारासाठी पाठवण्यात आल्याचे रेड्डी यांनीसांगितले. या घटनेनंतर मादी बिबट या परिसरात गोंधळ घालण्याची शक्यता नाकारता येत नाही .त्यामुळे तिचाही या परिसरात शोध घेतला जात आहे.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.