সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, April 21, 2013

सुप्रिया सुळे ताडोबात


चंद्रपूर- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा येथे भ्रमतीसाठी आल्याची जोरदार चर्चा सध्या आहे. दोन दिवसांपासून धनवटे फार्म हाऊसमध्ये मुक्काम ठोकल्याचे कळते . मात्र हा दौरा अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला आहे . 

सुळे यांच्यासह १५ जण जंगल सफारीवर आले आहेत . गत दोन दिवसांपासून सुळे या ताडोबातमुक्कामी आहेत . शनिवारी त्यांनी तेलियाच्या जंगलात सफारी केली . या भागात त्यांना वाघिणींसहपाच बछड्याचे दर्शन झाले . भामदेही भागातही त्यांनी सफारी केली आहे . विशेष खबरदारीचा उपायम्हणून त्यांच्यासोबत असलेले चालक  गाईडचा मोबाइल बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे .सुरक्षेसाठी त्यांच्यासोबत पोलिसही तैनात करण्यात आले आहेत . परंतु त्यांचेही मोबाइल ऑऊटऑफ कव्हरेज आहेत . राज्यातील जंगलामध्ये कॅन्टरची सुविधा उपलब्ध नाही . ते वापरण्यातहीयेत नाही . परंतु सुळे यांच्या जंगल सफारीसाठी विशेष सोय करण्यात आली आहे . मध्य प्रदेशातूनएक नव्हे तब्बल चार ' कॅन्टर ' मागविण्यात आले आहेत . यामध्ये १७ जण एकाच वेळी जंगलसफारीचा आनंद घेऊ शकतात . याशिवाय पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेल्या स्थळांवरही त्यांनीजंगल सफारीचा आनंद घेतला. २२ तारखेलात्या नागपुरात येणार असल्याचे समजते. सध्या अधिकारी वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्ल्याच्या घटनेत व्यस्त असल्याने अधिक माहिती कळू शकली नाही 
-- 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.