সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, April 18, 2013

शिवसेनेच्या चंद्रपूर जिल्हाप्रमुखांवर तडीपारीची कारवाई

- बाळू धानोरकर यांच्यावर ६ जिल्ह्यात प्रवेशास मनाई

  चंद्रपूरचे पालकमंत्री संजय देवतळे यांना मागील निवडणुकीत उत्तम लढत देणारे जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांना चंद्रपुरसह ६ जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. या तडीपारीने चंद्रपुर जिल्हयातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. सप्टेंबर २०१२ मध्ये हा आदेश जारी करण्यात आला होता मात्र त्याला धानोरकर यांनी गृहविभाग स्तरावर आव्हान दिले होते. अंतिम निर्णय नुकताच जाहीर झाला असून धानोर्कारांच्या तडीपारीवर गृह विभागाने शिक्कामोर्तब केले आहे.
बाळू धानोरकर यांचेवर दाखल असलेले २००६ पासूनचे अनेक गुन्हे यासाठी गृहीत धरण्यात आले आहेत. ही कारवाई २ वर्षांसाठी करण्यात आली आहे. बाळू धानोरकर यांच्याविरोधात एकूण २३ गुन्हे न्याय प्रविष्ट असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून यात दरोडा, सरकारी कामात अडथळे, हल्ला, मारहाण , जीवे मारण्याच्या धमक्या, दारुंबंदी , सरकारी मालमत्तेचे नुकसान यासारखे गुन्हे समाविष्ट आहेत. वर्धा, यवतमाळ, गडचिरोली, भंडारा, नागपूर व चंद्रपुर या ६ जिल्ह्यात हा मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. चंद्रपुर जिल्ह्यात गेले १० वर्षे भद्रावती ही एकमेव नगर परिषद शिवसेनेच्या ताब्यात आहे. या पालिकेत पुढील ४ महिन्यात निवडणूक अपेक्षित आहे. त्यासोबतच वर्षभरात विधानसभा निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर ही एक राजकीय घटना असल्याचेही बोलले जात आहे. जिल्हा प्रमुख तडीपार तेही ६ जिल्ह्यातून होण्याची पूर्व विदर्भाच्या शिवसेनेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.
या तडीपारीच्या आदेशासह गेली अनेक वर्षे जिल्ह्यातील शिवसेना आपल्या पद्धतीने चालविणा-या बाळू धानोरकर यांच्या विरोधातील गट सक्रिय झाला आहे. आता धानोरकर यांची पद मुक्ती निश्चित असल्याने नव्या जिल्हा प्रमुखपदासाठी मोर्चेबांधणी सुरु होणार आहे. या गटातटांच्या लढाईत कोण बाजी मारतो याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.