काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, January 12, 2014

बहाद्दर हरिदासने दिली वाघाशी झुंज

बहाद्दर हरिदासने दिली वाघाशी झुंज

वरोरा : शेतातून बैल घेऊन सायंकाळी परत येत असताना पायवाटेलगतच्या झुडपामधून अचानक वाघ एका २८ वर्षीय युवकासमोर आला. युवकाने प्रसंगवधान दाखवून धाडसाने वाघाचा पहिला वार चुकविला. हातात काठी घेऊन प्रतिकार करु लागला. १0 ते १५ मिनिटे त्यांच्या ही झुंज सुरू होती. अखेर युवकाच्या धाडसामुळे वाघाला माघारी वळावे लागले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास सावरी शेतशिवारात घडली. यामध्ये युवक जखमी झाला.
वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या सावरी (बी.) गावातील युवक हरिदास यादव शेंडे हा १0 जानेवारी रोजी बैल घेऊन शेतात गेला. शेतातील दिवसभराची कामे आटोपून हरिदास सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास बैल घेऊन घराकडे परत येत होता. दरम्यान, सुभाष कारेकार यांच्या शेतालगतच्या झुडुपामधून अचानक वाघ निघाला. तेव्हा हरिदासचे लक्ष नव्हते. वाघ दिसताच हरिदासच्या बैलांनी अचानक धूम ठोकल्याने हरिदास थोडा थबकला. समोर पट्टेदार वाघ दिसताच प्रारंभी हरिदासही घाबरला. मात्र त्यानंतर त्याने प्रसंगवधान दाखविले. वाघाने हरिदासवर उडी घेतली. मात्र हरिदासने हा वार चुकविला. हरिदास आरडाओरड करीत हातातील काठी फिरवू लागला. वाघाने अनेकदा हरिदासवर हल्ल्याचा प्रयत्न केला. परंतु हरिदासाने मोठय़ा धैर्याने वाघाचा प्रयत्न हाणून पाडला. वाघ आणि हरिदासमधील ही झुंज सुमारे १५ मिनिटे सुरू राहिली. हरिदासची आरडाओरड सुरूच असल्याने अखेर वाघाने तिथून धूम ठोकीत जंगलात पसार झाला. यापूर्वीही वाघाने सावरी या गावालगतच्या शेतात हल्ला करुन दोघांचा बळी घेतला होता. या घटना विस्मरणात जाण्यापूर्वीच शुक्रवारी वाघाने हरिदासवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने ग्रामस्थांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे. हरिदासला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने रुग्णालयात जाऊन हरिदासची भेट घेतली असता त्याने त्याने आपबिती कथन केली. याबाबत वनपरिमंडळ अधिकारी संजय पडवे यांच्याशी संपर्क साधला असता घटनेची माहिती मिळाली असून वनकर्मचारी घटनास्थळी गेल्याचे सांगितले.
अस्वलाच्या हल्ल्यात युवक ठार

अस्वलाच्या हल्ल्यात युवक ठार

चंद्रपूर
जिल्ह्य़ातील गोंडपिपरील तालुक्यातील धाबा गावाजवळ आज शनिवारी ११ जानेवारीला सकाळच्या सुमारास दोन पिल्लासह वावरणार्‍या अस्वलाने 'मॉर्निग वॉक' करणार्‍या सतीश कोटूकवार (३0) या युवकाला हल्ला करून जागीच ठार केले.
या नंतर अस्वल जंगलाच्या दिनेशे पळ काढला. तर एक पिल्लू मृतदेहाजवळच आढळले. वनविभागाने ते पिल्लू तालुक्यात घेतले असले तरी पिल्लाच्या शोधात अस्वल गावात येण्याची दाट शक्यता असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
सतीश कोटूकवार हा मूकबधिर होता व गावातच कपड्यांना इस्त्री करण्याचे दुकान चालवित होता. आज सकाळी गावाबाहेरील मार्गावर तो फिरायला गेला असताना अचानक त्याच्यावर अस्वलाने हल्ला चढविला. त्यात ज्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे हा हल्ला चढविल्यानंतर अस्वल जंगलात निघून गेली. पण, अस्वलाचे एक पिल्लू तिथेच राहिले. चार ते पाच महिन्याच्या या पिल्लाला वनविभागाने आपल्या ताब्यात घेतले आहे. या पिल्लामुळे युवकावर हल्ला करणारी अस्वल मादा असल्याचे स्पष्ट झाले आहे. मादा अस्वलाचे पिल्लू लहान असताना ती अतिशय आक्रमक व्यवहार करते व त्यातूनच हा हल्ला झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र हल्ला करणार्‍या मादा अस्वलाची तिच्या पिल्लापासून वेगळी झाल्यामुळे ती या भागात परत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे व त्यामुळे वनविभागाने या भागात आपली गस्त वाढवली आहे.   

Saturday, January 11, 2014

मराठा सिमेंटला शास्वता पुरस्कार

मराठा सिमेंटला शास्वता पुरस्कार

कोरपना - मराठा सिमेंट वर्क्स च्या अंबुजा सिमेंट उद्योग उप्परवाही ला त्याच्या केलेल्या चांगल्या कामाची पावती म्हणून त्यांना सलग दुस-र्यांदा सी आय आय आय टी सी शास्वता पुरस्कार नुकताच दिल्ली येथे कंपनी कामकाज मंत्री सचिन पायलट यांच्या हस्ते मराठा सिमेंट वर्क्स चे अध्यक्ष सुशील ठाकूर यांना प्रदान करण्यात आला.या प्रसंगी उर्जा पर्यावरण पाणी समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू, सलागर समितीचे अध्यक्ष वाय.सी.देवेश्वर कार्यकारी संचालक सीमा अरोरा इत्यादी मान्येवर उपस्थित होते.

मराठा सिमेंट वर्क्स उप्परवाही ची सदर पुर्स्काराकारिता निवड सी आय आय च्या प्रत्येक्ष अंकेक्षण व आंतरराष्ट्रीय दर्ज्याच्या चौदा सद्येशीय समिती द्वारा करण्यात आली कंपनीने विविध चांगल्या गोष्टींचा अवलंब केला असून त्यामध्ये टाकाऊ प्लास्टिकचा तसेच कचऱ्यांचा इंधनाकरिता वापर,आंतरराष्ट्रीय पर्यावरण मापदंडाचा अवलंब,कार्बनडाय ऑक्साईड चा कमीत कमी नित्सारण, पाण्याचे संवर्धन, वृक्ष लागवड इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. कंपनीने सर्वात जास्त प्राधान्य कामगाराची सुरक्षा तसेच सी एस आर द्वारा समुदाय विकासाच्या कामाला दिलेले आहे समुदाय विकासाचे काम ८५ गावांमध्ये जवळजवळ ४५ हजार लोकसंखे सोबत चालू असून यामध्ये आरोग्य,कृषी विकास,पाण्याचे संवर्धन युवक युवती करिता कौशल्य शिक्षण, महिलांचा सर्वांगीण विकास व गुणवत्ता पूर्ण शिक्षण,आय.टी.आय. कौशल्ये शिक्षण घेतलेल्या जवजवळ ८५ टक्के मुलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.सदर पुरस्कारा सोबतच वर्ष २०१२-१३मधे १२ वार्षिक ग्रीनटेक पुरस्कार गोल्ड काटागिरीध, आशिया पाशीफिक एच.आर.एम.कॉंग्रेस पुरस्कार २०१३,व सृष्टी जी कूब इत्यादी चा समावेश आहे असे एका आयोजित केलेल्या पत्रकार परिषेदत सुशील ठाकूर यांनी सांगितले ते पुढे म्हणाले कि,कंपनीने व्यवसाय शास्वत करण्याकरिता कंपनी स्तरावर दोन कमेठीची स्थापना केली असून त्याद्वारे निरंतर कामाचे नियोजन व अंमलबजावणी केली जात आहे सदर पुरस्कार कंपनीने विविध क्षेत्रात उद्योग शास्वत पद्धतीने चालविण्या करिता केलेल्या प्रयत्नाचे फलित असल्याचे सांगितले.या पत्रकार परिषदेप्रसंगी वरिष्ठ उपाध्यक्ष एन.एल शर्मा,अरुण शर्मा,देवेंद्र त्रिपाठी,प्रमोद खडसे,इत्यादी अधिकारी उपस्थित होते.



..................................................................
गतिमान पाणलोट कार्यक्रम निकृष्ट दर्ज्याचे काम

गतिमान पाणलोट कार्यक्रम निकृष्ट दर्ज्याचे काम

कोरपना - महाराष्ट्र शासनाने अनेक जिल्ह्यात गतिमान पाणलोट कार्यक्रम तसेच महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील दुर्गम भागात हा प्रकल्प राबविण्यात आला परंतु निकृष्ट दर्ज्याचे काम करून,शेतकऱ्यांचे प्रशिक्षण कागदोपत्रीच दाखवून कृषी विभागाने या योजनेचा फजाच उडविला असल्याचे गावात शेतकऱ्यांची चर्चा आहे.

पकडीगुडम लाभ क्षेत्रातील बेलगाव,कारगाव,धनोली,पिपारडा,सोनुर्ली या भागात शासनांनी महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्प तसेच गतिमान पाणलोट कार्यक्रम गावातील पाण्याची अली वाढावी शेतकर्यांच्या जनावरांना मुबलक पिण्याचे पाणी मिळावे, गाव ट‍‍कर मुक्त व्हावे या उदात्त हेतूने हे दोन्ही कार्यक्रम राबवण्यात आले.या करिता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला मात्र कामच झालेच नाही अशी ओरड बळीराजा करू लागला आहे.

या कार्यक्रमा अंतर्गत शेतक-र्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देणे पाण्याचे नियोजन, पाणी पुरवठा समित्या बळकट करणे,गाव गावात समित्या स्थापन करून सभा घेणे,बँकेत समित्याचे खाते उघडणे मागणी नुसार विकासात्मक कामे काणे इत्यादी कामे होणे अपेक्षित होते परंतु हिकामे झालेच नाही अशी चर्चा दिसून येते.

· निधी उपलब्ध असूनही शेतकऱ्यांचे प्रशिक्षण देण्यात आले नाही पाणीपुरवठा समित्या बळकट करण्यात आले नी उद्योजक व प्रक्रिया करणारे शेतकऱ्यांचे समूह तयार करण्यात आले नाही शेतकऱ्यांच्या समूह मंडळ स्थापन करून नोंदणी करण्या करिता चर्चा करण्यात आली मात्र प्रत्येक्ष कृती कृषी विभागाने किलीच नाही फक्त गावात नाममात्र शेतकरी समूह गट,महिला समूह गट, बनवून बोर्ड लावण्यात आले.मात्र या गावातील एकही शेतकरी समूह गट नोंदणीकृत झालाच नाही.यावर मोठ्याप्रमाणात खर्च झाला परंतु ज्या गावात या योजना राबविण्यात आल्या त्या गावातील शेतकऱ्यांना शासनाच्या योजनेची जाण नसल्याची चर्चा आहे.कागदोपत्री समित्या दाखविण्यात आल्या मात्र आल्या मात्र प्रतेक्षात काम झालेच नाही निधी खर्चाचे नियोजन किंवा आराखडा तयार करण्यात आले नसल्याचे व जमाखर्चाचा हिशोब  आला नाही फक्त बँकेचे खाते उघडण्यासाठी समितीची सभा झाल्याचे बोले जात आहे तुळशी,टागारा,जेव्हरायेथील.शेतकऱ्यांन प्रशिक्षन देण्याकरिता करिता प्रगती नावाच्या संस्थेची निवड करण्यात अली होती मात्र शेतकऱ्यांच्या प्रगती न करता प्रशिक्षण न देता आपलीच प्रगती केल्याचे सांगण्यात येत आहे हि संस्था एका कृशिविभागाच्या अधिकाऱ्याच्या नातेवाहीकाची असल्याचे बोले जात आहे या योजनेतील संपूर्ण कामाचा आढावा घेतल्यास विस्तार व शेतीशाळा कार्यक्रमाचा प्रताप लक्षात येईल असे प्रकार कोरपना तालुक्यात मोठ्या प्रमाणत घडत असून विदर्भ पाणलोट विकास कार्यक्रम अंतर्गत उमरहीरा व मांडवा या ठिकाणी निकृष्ट दर्ज्याचे बांधकाम केले असून दोन कोटी सत्तर लाख खर्चून दोन्ही गावे दुष्काळाचा सामना करताना दिसत आहे. कामे करून शासनाच्या निकषानुसार मांगलहिरा या गावात पाच वर्षात विविध योजनेतून दुष्काळावर मत करण्यासाठी लाखो रुपयाचा निधी संबधित विभागाने खर्च केला मात्र दुष्कावर मत करता अली नाही त्यमुळे कृषी विभागाचे मोठे अपयश पहावयास मिळते.किडनीयंत्रण सापडे शेतकर्यांना न वाटता ते यंत्र शाशकीय गोदामात डूल खात असल्याचे बोले जात आहे.
श्रमिक एल्गारचा बल्लारपुरात मोर्चा

श्रमिक एल्गारचा बल्लारपुरात मोर्चा

balarpur1.jpg प्रदर्शित करत आहेबल्लारपूर शहरातील नागरीकांच्या समस्या घे न श्रमिक एल्गारच्या संस्थापिका अॅड.पारोमिता गोस्वामी यांचे नेतृत्वात तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
बल्लारपुरात अनेक कुटुुंबाकडे शिधापत्रिका नाही व नविन दिल्या जात नाही, बिपिएल धारकांना बिपिएलचे कार्ड बनवुन दिल्या जात नाही, बिपिएल उत्पन्न प्रमाणपत्राचे अट लावुन पन्नास हजाराचे वरील उत्पन्न दाखविणे, निराधार योजनेची अमलबजावणी केल्या जात नाही अशा रविंद्रनगर येथिल लोकांच्या समस्यांना घेऊन श्रमिक एल्गारचे वतीने अॅड. पारोमिता गोस्वामी यांचे नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. मोर्चा तहसिल कार्यालयावर पोहचल्यानंतर शिष्ठमंडळासोबत तहसिलदार बि.डी.टेळे यांनी चर्चा केली परंतु मोर्चेÚयांना समाधानकारक उत्तर न देता आमच्याकडे कर्मचारी नसल्याचे उत्तर देऊन हात झटकलेे. त्यामुळे मोर्चेकरीत महीला संतापुन तहसिलदारचा निषेध करीत कॅबीनमधुन निघाले व नागपूरचे आयुक्त बि.वेणुगोपाल रड्डीे हे जिल्हाधिकारीे  कार्यालयात असल्याने महीला चंद्रपूर गाठुन व त्यांना भेटुन समस्या मांडल्या यावर रेड्डी व जिल्हाधिकारी डाॅ.म्हैसेकर यांनी या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. 
या मोर्चात महासचिव विजय कोरेवार, फरजाना शेख, संगिता गेडाम, सलमा शेख, प्रविण चिचघरे, सुर्यकांत भूरसे, फातीमा शेख, जमीना शेख, प्रेमदास उईके, कपिला भसारकर, फिरोजा पठाण, हसीना पठाण, शमीना पठाण आदींसह शेकडो महीला सहभागी होते.

Friday, January 10, 2014

युपीएच्या प्रधानमंत्री व कोळसा मंत्र्यांनी राजीनामा द्यावा : खा. हंसराज अहीर

युपीएच्या प्रधानमंत्री व कोळसा मंत्र्यांनी राजीनामा द्यावा : खा. हंसराज अहीर

६-७ वर्षांपूर्वी हे पुराव्यानिशी तक्रारी केल्या होत्या त्या खèया ठरल्या
कोळसा ब्लॉक आवंटनात घोटाळा प्रकरण
चंद्रपूर:- कोळसा खाणी वाटपात घोटाळा झाल्याचे आपण मागील 6-7 वर्षांपासून सबळ पुराव्यासह सतत सरकारला सांगत होतो. परंतू कोल ब्लॉक आवंटनात कोणत्याही प्रकारचा घोटाळा झाला नाही असे सातत्याने खोटे वक्तव्य करणाÚया युपीए सरकारने अखेर कोल ब्लॉक आवंटनात घोटाळा झाल्याचे मान्य केले. सरकार पक्षाकडून अॅटर्नी जनरल यांनी घोटाळा झाल्याची सर्वोच्च न्यायालयात कबुली दिल्याने 2006 पासून कोल ब्लॉक आवंटनामध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप सरतेशेवटी सिध्द झाला असल्याचे प्रतिपादन कोळसा ब्लॉक आवंटन घोटाळा सर्वप्रथम उघडकीस आणण्याचे श्रेय असणारे खा. हंसराज अहीर यांनी केले आहे.
या कबुली जबाबानंतर प्रतिक्रीया व्यक्त करतांना खा. हंसराज अहीर यांनी म्हटले आहे की, देशाची कोटयवधी रूपयांची प्रापर्टी सरकारने काही उद्योगपतींना फुकटात वाटप करून देशाचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान केले होते. परंतू या सरकारचे दुर्दैव असे की, वारंवार या घोटाळयाची सिध्दता होवूनही सरकारने घोटाळा केल्याचे मान्य केले नाही. याउलट देशाचे पंतप्रधान, अर्थमंत्राी, न्यायमंत्राी, व कोळसा मंत्राी यांनी या कोल ब्लॉक वाटपाची जी बेकायदेशीर प्रक्रीया होती तिचे पाठराखण केली होती हे सर्वश्रृत आहे व याची जाणीव संपूर्ण देशभरातील जनतेला आहे. असे असतांनाही व आपण सुरूवातीपासून कोल ब्लॉक वाटपात प्रचंड प्रमाणात महाघोटाळा झाला असल्याचे सिध्द करण्याचा प्रयत्न केला. याबाबत आपण केलेल्या तक्रारींची दखल व याबाबतची सत्यता पाहून कॅग ने ही वस्तुस्थिती सर्वप्रथम जगासमोर ठेवली. त्यानंतर केंद्रीय सतर्कता आयोग (सीवीसी), सीबीआय, आंतरमंत्रालयीन कमिटी ग्रुप (आयएमजी) व सर्वोच्च न्यायालय आदींनी कोळसा ब्लॉक आवंटनात घोटाळा झाल्याचे वारंवार संकेत देत सरकारची या प्रकरणात भर्त्सना केली. सीबीआयने या प्रकरणता एमआयआर दाखल केले, कॅग ने एकंदर नुकसानीची आकडेवारी दिली. असे असतांनाही केंद्रातील कॉग्रेस प्रणित युपीए सरकारने हे मान्य केले नव्हते. आज शेवटी सरकार पक्षाने कोळसा ब्लॉक आवंटनात घोटाळा झाल्याचे कबुल करून आपल्या अपराधाला मान्यता दिली आहे.
आपण केलेले आरोप सत्य असल्याचे या कबुली जबाबानंतर सिध्द झाले याचा आपणांस आनंद आहे. देशाची खरबो रूपयांची मालमत्ता ज्यात जवळपास 50 खासगी कंपन्यांचे ब्लॉक रद्द केले. व जे कोळशाचे ब्लॉक विनामुल्य वाटप केले होते ते पुन्हा सरकारच्या खात्यात जमा होण्याकरिता मार्ग सुकर झालेला आहे. मा. सर्वोच्च न्यायालयासह चौकशी व लेखापरीक्षण करणाÚया सर्व सरकारी एजन्सींनी या घोटाळयात प्रचंड परीश्रम घेवून कार्य केले आहे. त्यांच्या या अविश्रांत परीश्रमातूनच या घोटाळयातील महासत्य बाहेर आले आहे. आता मा. पंतप्रधान आणि केंद्रीय कोळसा मंत्रयांनी या कोळसा ब्लॉक आवंटन घोटाळयाची नैतिक जबाबदारी स्विकारून व देशवासीयांची माफी मागुन राजिनामा द्यावा व रद्द केलेले सर्व कोल ब्लॉक व अन्य मोफत दिलेले ब्लॉक कोल इंडियाच्या स्वाधिन करावे असेही खा. हंसराज अहीर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्राकात म्हटले आहे.
वाघाच्या हल्ल्यात इसम ठार

वाघाच्या हल्ल्यात इसम ठार

चिमूर :
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या कोलारा गावातील विठोबा नागोसे (वय ५५ वर्षे) हा दिनांक ९ जानेवारीला सकाळी सरपण जमा करण्याकरीता जंगलात गेला असता दबा धरुन बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक हल्ला करुन नरडीचा घोट घेतला.
२०१४ या नववर्षातील मानव-वन्यजीव संघर्षातील बळीची ही दुसरी घटना असून पहिली घटना  लोहारा येथील मंगला गुलाब शेंडे ही महिला बुधवारी, दुपारच्या सुमारास लोहारा जवळील वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक ३९६ मध्ये सरपन गोळा करण्यासाठी गेली होती. सरपन गोळा करीत असताना झुडूपात दबा धरुन बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला केला होता. यात तिचा जागीच मृत्यू झाला होता.
प्राप्त माहितीनुसार दिनांक ९ जानेवारीला सकाळी मृतक गावातील सहकार्यासोबत सरपणाकरीता जंगलात गेला असता दबा धरुन बसलेल्या पट्टेदार वाघाने त्याच्यावर अचानक हल्ला केल्याने आरडाओरड झाली. तेव्हा मृतकाचे सहकारी गावाकडे परत आल असता नागरिकांनी मृतकाचा शोध घेण्याकरीता घटनास्थळाकडे धाव घेतली. तेव्हा  मृतक विठोबा नागोसे यांचा मृतदेह छिन्नविछन्न अवस्थेत आढळुन आला.घटनेच्या काही वेळानंतर पोलीस व वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचुन पंचनामा केला. पुढील तपास ठाणेदार विखे पाटील तसेच वनपरिक्षेत्र विभागाचे अधिकारी करीत आहेत.
तीन वर्षात ३८ सायबर गुन्हे

तीन वर्षात ३८ सायबर गुन्हे

चंद्रपूर: फेसबुक, वाटसर्प, आकरुट यासारखे संचार माध्यम मानवाच्या सुविधांसाठी तयार केले आहेत. मात्र या माध्यमांचा दुरुपयोग वाढला आहे. सोशल नेटवकर्र्ींगचा विद्यार्थ्यांकडून दूरुपयोग होत असल्याने चिंता वाढली आहे. २0११ मध्ये सायबर क्राईमचे पाच गुन्हे दाखल आहेत. २0१२ मध्ये १२ गुन्हे तर २0१३ मध्ये तब्बल २१ असे एकूण ३८ साईबर क्राईमचे प्रकरण पोलिसांनी उजेडात आणले आहेत.

येथील पोलीस विभागाच्या सायबर सेलने दिलेल्या माहितीनुसार, २0११ मध्ये सायबर क्राईमचे पाच प्रकरणे नोंदविण्यात आली. यातील चार प्रकरणे केवळ फेसबुकशी संबंधित होते. २0१२ मध्ये एकूण १२ सायबर गुन्हे दाखल करण्यात आले. यातील पाच प्रकरणे सोशल नेटवकर्र्ींगच्या प्रकारात मोडते. २0१३ मध्ये हा आलेख आणखी चढला. या वर्षात तब्बल २१ सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून यात सहा गुन्हे फेसबुकशी संबंधित आहेत. तीन वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता जिल्ह्यात सायबर क्राईम वाढत असल्याचे दिसून येते. यातील सर्वाधिक प्रकरणात महाविद्यालयीन विद्यार्थीच आरोपी असल्याचे स्पष्ट झाले आहे. मोबाईलवरून अश्लिल फोटो, चित्रफित पाठविणे, अश्लिल एसएमएस, एमएमएस पाठविणे यासारख्या ९ गुन्ह्यांची २0१३ या वर्षात नोंद करण्यात आली आहे. याशिवाय कोणाचा ईमेल हॅक करणे, ऑनलाईन ट्रांजेक्शन फ्राड, दुसर्‍याच्या एटीएममधून परस्पर रक्कम काढणे यासारख्या सायबर गुन्ह्यांचीही या वर्षात नोंद झाली आहे. 

शिक्षेची तरतूद
  • ■ कलम ६६-ए नुसार सोशल नेटवकर्र्ींगच्या दुरुपयोगासाठी तीन वर्ष शिक्षा
  • ■ कलम ६६ नुसार संगणकातील डाटाचे नुकसान करण्यासाठी तीन वर्ष शिक्षा
  • ■ कलम ६६-बी नुसार मोबाईल किंवा संगणक चोरीप्रकरणी तीन वर्ष शिक्षा
  • ■ कलम ६६-सी नुसार पासवर्ड चोरणे, कुणाच्या नावाचा उपयोग करून अपराध करण्यासाठी तीन वर्ष शिक्षा व एक लाख रुपये दंड
  • ■ कलम ६६-एफ नुसार सोशल नेटवकर्र्ींगद्वारा दहशतवाद पसरविण्यासाठी आजन्म कारावास.
  • ■ कलम ६७ नुसार अश्लिल चित्रीकरण करून त्याचे प्रसारण करण्यासाठी पाच वर्ष शिक्षा.



Thursday, January 09, 2014

महापौर चषक नागपूरने जिंकला

महापौर चषक नागपूरने जिंकला

चंद्रपूर : चंद्रपूर पंचशताब्दी महोत्सव समिती, महानगरपालिका तथा चांदा जिल्हा फूटबॉल संघटनेच्या वतीने स्थानिक पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर विदर्भस्तरीय फुटबॉल सामने घेण्यात आले. यात १२ फूटबॉल संघांनी भाग घेतला. आज अंतिम सामना यंग अंसार क्लब नागपूर व सीडीएफए चंद्रपूर संघादरम्यान अत्यंत चुरशीचा झाला. ट्रायबेकरमध्ये चौथ्या प्रयत्नात यंग अंसार क्लब विजेता ठरुन महापौर चषकाचा धनी ठरला.
बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचशताब्दी महोत्सव समितीचे संयोजक माजी खासदार नरेश पुगलिया होते. प्रमुख पाहुणे म्हणून महापौर संगीता अमृतकर, उपमहापौर संदीप आवारी, स्थायी समितीचे सभापती रामू तिवारी, आयुक्त प्रकाश बोखड, उपायुक्त राजेश मोहिते, रवींद्र देवतळे, विलास कंदेवार, अशोक नागापुरे, प्रविण पडवेकर, हिंदकेसरी अमोल लुथडे, फूटबॉल संघटनेचे अध्यक्ष के. के. सिंग, सचिव दीपक दीक्षित, सरवर खान यांची उपस्थिती होती.
विदर्भस्तरीय फूटबॉल सामन्यात अंतीम लढत होण्यापूर्वी ईगल क्लब नागपूर व बिग बेन क्लब नागपूर संघादरम्यान महिलांचा सामना झाला. यावेळी बीग बेन महिला संघाने ईगल क्लबवर २-0 अशी मात केली. फूटबॉलच्या अंतीम सामन्यात विजेता यंग अंसार क्लब नागपूरला महापौर चषक, रोख ३१ हजार रुपये प्रदान करुन सन्मानित करण्यात आले तर उपजिवेता सीडीएफए संघाला चषक व रोख २१ हजार रुपये बक्षिस देण्यात आले.
अंत्यत चुरशीच्या सामन्यात निर्धारीत वेळात १-१ अशी बरोबरी साधली. ट्रायबेकरच्या माध्यमातून उत्कंठावर्धक सामन्याचा निकाल जाहीर करण्यात आला. 
श्री श्री रविशंकर १५ ला चंद्रपुरात

श्री श्री रविशंकर १५ ला चंद्रपुरात

चंद्रपूर: लिव इन रिलेशनशिपला सर्वोच्च न्यायालयाने कायदेशीर मान्यता दिली असली तरी ही व्यवस्था भारतीय संस्कृतीला अनुरुप नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आपण विरोध करीत नाही. मात्र दुसर्‍या बाजूने विचार करता ही व्यवस्था भारतीय संस्कृतीला घातक आहे. यामुळे माणसाचे आयुष्य वा संसार चिरकाल सुखी राहू शकत नाही. ही व्यवस्था विदेशात आहे. आपण अनेकवेळा विदेशाचा दौरा केला. त्यात अशा व्यवस्थेतून तिथेही चिरकाल सूख मिळाल्याचे दिसले नाही. त्यामुळे भारतातही अशी स्थिती निर्माण होऊ शकते, असे मत आर्ट ऑफ लिव्हींगचे गुरु आनंद वैश्यपायन यांनी पत्रकारपरिषदेत व्यक्त केले.
यावेळी ते पुढे म्हणाले, पंडित श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हींगमागे नागरिकांना सुखी आणि आनंदी बनविणे, हा उद्देश आहे. आध्यात्मद्वारा स्वत:च्या आत्माचा स्वत:लाच परिचय करून देऊन त्याद्वारे दुसर्‍यांना सहकार्य करायला लावणे, हाही एक उद्देश आहे. आपण चांगले काम नेहमीच पोस्टपोंड करतो. वाईट काम असले की ते प्रकर्षाने करतो. मात्र हे योग्य नाही. चांगले काम कधीही पोस्टपोंड करू नये. तेच प्रकर्षाने करावे, असेही त्यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला आर्ट ऑफ लिव्हींगचे भाई सलील, महापौर संगिता अमृतकर, गोपाल अमृतकर, दामोदर सारडा व आर्ट ऑफ लिव्हींगचे पदाधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी) श्री श्री रविशंकर १५ ला चंद्रपुरात आर्ट ऑफ लिव्हींगचे संस्थापक पंडित श्री श्री रविशंकर यांचे १५ जानेवारी रोजी चंद्रपुरात आगमन होत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. उद्या ९ जानेवारीला सकाळी ९ वाजता महानगरपालिका व आर्ट ऑफ लिव्हींग संस्थेद्वारा गांधी चौकात स्वच्छता अभियान
पट्टेदार वाघाच्या हल्लात महिलेचा जागीच मृत्यू

पट्टेदार वाघाच्या हल्लात महिलेचा जागीच मृत्यू


चंद्रपूर : जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेवर पट्टेदार वाघाने हल्ला चढविला. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना आज बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास लोहाराजवळच्या मामला वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ३९६ मध्ये घडली. मंगला ऊर्फ पूनम गुलाब शेंडे (४३) असे मृत महिलेचे नाव आहे.
चंद्रपूर-मूल मार्गावरील लोहाराला लागून असलेल्या एफडीसीएमच्या जंगलात आज बुधवारी दुपारी दहा महिला सरपण आणण्यासाठी गेल्या होत्या. लाकडे गोळा करीत असताना दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक मंगला शेंडे हिच्यावर हल्ला चढविला. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो निष्फळ ठरला. वाघाने तिला काही अंतरापर्यंत फरकटत नेले. हे दृष्य बघून मंगलासोबत असलेल्या इतर महिला घाबरल्या. त्यांनी लगेच गावाकडे धूम ठोकली व गावकर्‍यांना या घटनेची माहिती दिली. गावकर्‍यांनी घटनास्थळी जाऊन मंगलाचा शोध घेतला असता जंगलातील एका झुडुपात तिचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. वनविभागाला याची माहिती देण्यात आली. वनाधिकार्‍यांनी घटनास्थळावर पंचनामा केला. येथील उपविभागीय वनाधिकारी चौधरी यांनीही या परिसरात पट्टेदार वाघाचे ठसे आढळल्याचे सांगितले. उल्लेखनीय असे की चंद्रपुरातील टॉवर टेकडी परिसरातही काही दिवसांपूर्वी एका बालिकेला बिबट्याने ठार केले होते.

Wednesday, January 08, 2014

धुके वाढल्याने रेल्वेगाड्या लेट

धुके वाढल्याने रेल्वेगाड्या लेट

नागपूर - दाट धुक्‍यांमुळे रेल्वेगाड्यांची गती मंदावली आहे. परिणामी अनेक रेल्वेगाड्या निर्धारित वेळेपेक्षा तासन्‌तास उशिरा धावत आहेत.
थंडीचा जोर वाढत असून, दिवसेंदिवस पार खालीखाली जात आहे. हवेतील गारव्यामुळे अंगार हुडहुडी भरत आहे. परिणामी दाट धुक्‍यांमुळे रेल्वेगाड्यांची गती मंदावली आहे. नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्‍स्प्रेस सुमारे 10.45 तास, न्यू दिल्ली सिकंदराबाद एक्‍स्प्रेस 12 तास, हजरत निजामुद्दीन-बंगलोर सिटी एक्‍स्प्रेस 8 तास, न्यू दिल्ली चेन्नई एक्‍स्प्रेस 8 तास, न्यू दिल्ली-चेन्नई एक्‍स्प्रेस 6 तास, हैद्राबाद-न्यू दिल्ली आंध्र प्रदेश एक्‍स्प्रेस, यशवंतपूर-गोरखपूर एक्‍स्प्रेस 3 तास आणि हजरत निजामुद्दीन-सिकंदराबाद सुपरफास्ट एक्‍स्प्रेस 5.30 तास उशिराने धावत आहेत. परिणामी वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांना रेल्वेगाड्यांची तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत आहे.

Tuesday, January 07, 2014

श्री श्री रविशंकरजीचे आगमन चंद्रपूरचे अहोभाग्य

श्री श्री रविशंकरजीचे आगमन चंद्रपूरचे अहोभाग्य

एक विराट आध्यात्मिक विश्व निर्माण करण्याची अभिप्सा बाळगणा-या कोटी कोटी लोकांना वाटणारे आशा आणि श्रद्धास्थान तसेच विश्वविख्यात आर्ट ऑङ्क लिव्हींग संंस्थेचे संस्थापक श्री श्री रविशंकरजी (गुरूजी) यांचा परिचय करून देण्याची मुळीच आवश्यकता नाही. परंतु या क्षेत्रात अनभिज्ञ असलेल्यांना देखील ह्या रति अतिस्थी आणि महारथी व्यक्तीमत्वाचा परिचय व्हावा म्हणून हा प्रपंच.
श्री श्री रविशंकरजी यांचा जन्म १३ मे १९५६ रोजी बंगळूर जवळ असलेल्या पापनासम ह्या एका लहानशा खेड्यात झाला. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. ह्या म्हणीप्रमाणे त्यांच्यातील तल्ल्लख बुद्धी व अद्भूत सामथ्र्यांंचा परिचय त्यांच्या कुटुंबियांना आणि इतरांना बालपणापासूनच होऊ लागला. अनेक घटनापैकी त्यांच्या जीवनातील दोन तीन घटनांवर प्रकाश टाकला असता ह्याचा प्रत्यय येतो.गुरूजी अवघ्या ४ वर्षाचे असतांना त्यांना भगवतगिता शिकविण्यासाठी त्यांच्या मातापित्यांनी एक विचशेष प्रशिक्षकाची नेमणूक केली आणि अहो आश्चर्यम! त्या प्रशिक्षकाने भगवत्गीताने पहिला श्लोक म्हणावा तर हे लहानसे मूल त्यापुढील दुसरा श्नोक अस्ख्रलीत संस्कृतमध्ये धडधड म्हणून दाखवित असे. हयाच क्रमाने जेव्हा तिसरा श्लोक प्रशिक्षक उच्चारीत असे तर हे मूल चोथा श्लोक आपोआप म्हणत असे ह्या मुलांनी अद्भुत किमया बघून प्रशिक्षकाला असे वाटले की, ह्या मुलास त्यास मातापित्यांनी भगवगितेत पहिलेच प्रविण करून ठेवले आहे व त्याला शिकविण्यासाठी हकनाक नेमलेले आहे. परंतु प्रशिक्षकांचे म्हणणे ऐकून गुरूजींचे आईवडील देखील चाट पडले कारण त्यांनी त्यापूर्वी कधीही त्यामुलास भगवतगिता कोणास मार्फत शिकविली नव्हती.
दिव्यआत्मे पूर्वजन्माचे संस्कार ज्ञान घेऊन विशेष कार्यासाठी अवतरीत होत असतात. ही जी आपल्या हिंदु धर्माची धारणा आहे त्याला पृष्टी देणारा हा जिवंत पुरावाचा म्हणावा लागेल.
वयाच्या सहाव्या वर्षी हे बालक बालसुलभ प्रवृत्तीच्या क्रीडांमध्ये मग्न होण्याऐवजी ध्यान, धारणा आणि समाधी मध्ये तासन्तास गुंतून असे. सवंगडी म्हणतात तु हे काय करीत आहेस.चल खेळुया! त्यावेळी हे तेजस्वी बालक गर्जून सांगत असे की
"The Whole World is waiting for me,I have to reach there'
संपूर्ण विश्व माझी वाट आहे आणि मला तेथे पोहचायचे आहे. हे उद्गार ऐकून मित्रमंडळी त्याची थट्टा करीत व त्यांचेसमोर विविध देशांची नावे लिहीत परंतु त्या बिचाèया अज्ञ मुलांना काय माहित की गुरूजीच्या मुखातून त्यांचा येवू घातलेला भविष्यकाळच परमात्मा परमात्मा वदवत आहे. आज गुरूजींचे अध्यात्मिक प्रशिक्षक आणि योग कार्यार्ने ४९ पेक्षा अधिक देशांचा लपेटून टाकले आहे. याला म्हणतात द्रष्टा! ही झालीत त्यांच्या अद्भूत दैवी शक्तीची उदाहरणे आता त्यांच्या तल्लेख बुद्धीकडे वळु या! वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी एका बाजुस भौतीक शस्त्र आणि दुसèया बाजुस वैदीक वाड:मय् या दोन्ही विषयात त्यांनी पदवी प्राप्त केली. तथा कथीत बुद्धीवादी विज्ञान अध्यात्म जणू एकमेकांचे शत्रु आहेत. असा सर्वत्र प्रचार व प्रसार करीत असतात. परंतु विज्ञान आणि अध्यात्माची एकत्रीत सांगड घालुन एका नव्या विचाराकडे, एका नव्या जगाकडे, एका नव्या युगाकडे घेऊन जाण्याचे सामथ्र्य गुरूजत मुळातच होते. व ते त्यांनी प्राप्त करूनही देखील दाखविले. गुरूजींनी त्यांच्या जिवनात योग कार्य करीत असतांना जूने सोडले नाही. नवे पकडले व जुन्याला नव्याचा सोनेरी मुलामा चढवून विश्वाचे सोने करण्याचा चंग बांधला.
वयाच्या २४ व्या वर्षी १० दिवसाचे खडतर ध्यान करूप समाधी अवस्था प्राप्त केली. व त्यात परमात्याने जगदोध्दाशंसाठी आवश्यकत असलेले सुदर्शन क्रिया त्यांना शिकवली त्याच आधारे पुढे त्यांनी साधना, सेवा आणि सत्संग या आर्ट ऑङ्क लिव्हींग च्या त्रिसुत्रीसाठी आपले जीवन झोकुन दिले. आणि हा हा म्हणता त्यांच्या कार्याचा पसारा भव्य वटवृक्षाप्रमाणे जगभर पसरत गेला.
ध्यान, धारणा, समाधी, अधात्मा हे सर्व विषय पेंशनीत निघालेल्या लोकांसाठी असतात. असा (गैर) समज सर्वत्र पसरलेला आढळतो. परंतु प्रत्यक्षात ही स्थिती विरूद्ध असते कारण वृद्धांसाठी नाना रोगांचे माहेर घर झालेल्या शरीराकडून कोणते ध्यान व साधना होवू शकेल! म्हणून आत्मोन्नतीसाठी प्रत्येकाने अल्पवयातच साधना सुरू करणे अपरिहार्य असते. हे लक्षात घेवून बालवयापासूनच सर्व स्त्री-पुरूष ध्यान धारणेत सामील व्हावे या हेतुने गुरूजींनी विवधि प्रकारच्या योग प्रशिक्षण शाखा निर्माण केल्यात जसे... आर्ट एक्सेल वयोगट (८ ते १३) यस वयोगट (१३ ते १७) यस प्लस वयोगट (१८ ते ३०) पार्ट वन-आनंद अनुभूती शिबिर (१८ च्यावर.....) हे प्रशिक्षण प्राप्त करतांना प्रशिक्षणार्थींना होणारा आनंद आणि परमानंद अवर्णनीय असतो. त्याने केवळ अध्यात्मिक उन्नतीच होत नाही तर भौतिक जीवन यशस्वी होण्याची गुरूकिल्ली देखील लाभते. आजच्या धावत्या युगात प्रत्येकला असलेला मानसिक ताणतणाव, त्यातून निर्माण होणारे नैराश्य, आत्मविश्वासाचा अभाव, आत्मघातकी प्रवृत्ती ह्या सर्व व्याधीवर हुकूमी मात करण्याची प्रभावी संसाधन म्हणजे वरील प्रशिक्षण त्यामुळे तुम्ही विद्यार्थी असा, नोकरदार असा, व्यापारी असा, उद्योजक असा, अथवा अन्य कोणत्याही क्षेत्रात कार्य करणारे असा, तुमचे दैनंदिन जीवन आणि कामकाज सुरळीत आणि यशस्वी होण्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास, धैर्य आणि व्यापकता त्यांची नितांत गरज असते. वरीलपैकी कोणतेही प्रशिक्षण घेतलेला माणूस निश्चितच तुम्हाला ग्वाही देईल की त्याला त्या प्रशिक्षणाने ह्या सर्व बाबी प्राप्त झाल्या. ङ्करक एवढाच की नियमीत योगक्रिया प्रक्रिया करून त्या त्याने टिकवून वाढविल्या की नाही.
गुरूजींनी भौतीक जीवन यशस्वी करण्यासाठी उपाय ध्यान ध्यारणेतून शोधला आणि त्यामुळेच त्यांचे लाभार्थी करोडोच्या संख्येत जगभर पसरलेले आहेत. हे प्रशिक्षण घेण्यासाठी जगभर  शाखा निर्माण करण्यात आल्या आहेत. प्रशिक्षण शिबिरात घेणाèया बालमुलामुलांची व तरूणतरूणीची गर्दी बघून भलेभलेही अचंभित होतात.... अमृताचे सेवन कुणाला नाही आवडणार?
येत्या भविष्यकाळात संपूर्ण विश्वसच एक मंगलमय आनंददायक आणि आध्यात्मिक विश्वच बनणार आहे आणि त्याची सुरूवात ऋषीमुनीच्या काळा पासुन पावन झालेल्या ह्या भरतभूमीतूनच होणार आहे. ह्या विषयी सर्व आध्यात्मिक पुरूषामध्ये एकवाक्यता आहे. ह्या परमेश्वरी कार्यासाठी आपल्या अद्भूत शक्ती, मार्गदर्शन आणि कार्याने गुरूजींनी आपले जीवन समर्पित केले व भविष्यकाळात त्याचे अमृतमय ङ्कळ सर्वांना बघावयास नव्हे तर अनुभवास मिळेल.
अशी ही विभूती १५ जानेवारी २०१४ ला चंद्रपूरच्या इतिहासात प्रथमच चंद्रपूरात भेट देत आहे. हा दुर्मिळ योग आहे.
श्री श्री रविशंकरजी ह्याचे उत्कट स्वागत करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा व परिसरातील लाखो नागरिक सज्ज झाले आहेत. त्यांची चंद्रपूर भेट ह्या विभागास देखील एक नवा विचार, एक नवी दिशा, एक नव परिवर्तन, घडविण्यास सहाय्यभूत ठरेल असा दृढ विश्वास वाटते.

................................

चंद्रपूर : आर्ट ऑङ्क लिव्हिंग संस्थेचे संस्थापक श्री. श्री. रविशंकर यांचे चंद्रपूरात प्रथमच आमगन होत असून त्याच्या आगमनानिमीत्त विविध कार्यक्रामचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक १३ जानेवारी २०१४ रोजी सकाळी ८ वाजता शहरातील मध्यभागी असलेल्या आझाद गार्डन येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यात सर्व शाळेतील वर्ग ८ ते वर्ग १० वी शिकवणाèया विद्याथ्र्यांचा सहभाग राहणार आहे.
तसेच दिनांक १४ जानेवारी २०१४ रोजी सकाळी ८ वाजता गांधी चौक येथे रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले असून यात एक हजारच्या वर नागरिक रक्तदान करणार आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे संस्थापक श्री. श्री. रविशंकरजी यांच्या पावन सानिध्यात दिनांक १५ जानेवारी रोजी चांदा क्लॅब मैदानावर सायकाळी ६ वाजता सुदर्शन क्रिया आणि महासंत्सगाचे आयोजन करण्यात आले आहे. ते सर्व उपस्थितांना सुदर्शन क्रिया काय आहे या सदर्भात मार्गदर्शन करणार असून सदर कार्यक्रमाचा जिल्ह्यातील सर्व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.