সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, February 06, 2019

२१ दिव्यांग जोडपी विवाहबद्ध होणार!


आस्था बहु. चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम

चंद्रपूर -प्रतिनिधी 
आस्था बहुउद्देशिय चॅरिटेबल ट्रस्ट तथा गौरवबाबू पुगलिया संगनिकृत उपवर वधू सुचक केंद्र वरोरा द्वारा १६ वर्षांपासून अविरत सुरू असणारा दिव्यांग बांधवांचा सामूहिक विवाह सोहळा स्व. गौरवबाबू पुगलिया स्मृति प्रित्यर्थ यावर्षी दिनांक १० फेब्रुवारी २०१९ रोजी गौरव सेलिब्रेशन सभागृह, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाला नरेशबाबु पुगलिया, हाजी अनिस अहमद, गेव्हआवारी, नागपूर इत्यादी राजकीय क्षेत्रातील गणमान्य व्यक्तिसह धर्मादाय आयुक्ताद्वारे आयोजित ७५ आत्महत्याग्रस्त शेतकèयांच्या मुलामुलींचा चंद्रपूरला सामूहिक विवाह सोहळा यशस्वीरित्या पार पाडणारे सध्या मुंबई विरार येथील न्यायाधीश आर.एन. चव्हाण, श्रीहरी देवस्थान चिमुरचे अध्यक्ष निलम राचरलावार, सुभाषभाऊ शिदे, राहुलबाबू पुगलिया सह संस्थेच्या पाठीशी तन-मन-धनाने उभे असणारे नरेंद्रबाबुजी पुगलिया उपस्थित राहणार आहे.
आस्था बहुउद्देशिय चॅरिटेबल ट्रस्ट सदर उपक्रम मागील १६ वर्षांपासून अविरत रावित आहे. दि. १७, १८ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रसंग लान, चंद्रपूर येथे दिव्यांग उपवर वधू यांचा परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. ज्यात भारतातील ६ राज्यातून आलेल्या विवाह उत्सुक २०० दिव्यांग उपवर वधूंनी आपला परिचय करून दिला. सदर बहुतांश दिव्यांग बांधवा समवेत त्यांचे पालक उपस्थित नव्हते हे विशेष. पालक तथा समाजातील मान्यवर सोबत नसतांना सुद्धा ज्या आत्मविश्वासाने संसारातील अडचणीला सामोरे जाण्याची मानसिक तयारी पाहून सामान्य माणसाला लाजवेल अशी त्यांची धडपड पाहून संस्थेच्या पदाधिकारी तथा कार्यकत्यांना त्यांच्या कार्याची दिव्यांगाणी दिलेली सकारात्मक पावतीच होती. सदर परिचय मेळाव्यात आपला परिचय करून दिलेल्या दृष्टीबाधित, कर्णबधिर, अस्थिव्यंग उपवर वधूंना योग्य जोडीदार मिळवून देण्याकरिता आस्थाचे पदाधिकारी तीन महिन्यापासून अथक परिश्रम करीत होते. त्यांच्या परिश्रमाचे फेलित ३७ जोडप्यांचे विवाह जोडण्यात संस्थेला यश आले. सदर जोडीदार शोधत असताना दिव्यांग बांधवांना संसारात दैनंदिन घडामोडी करिता कोणतीही अडचण येणार नाही, त्यांचा संसार सुखी व संपन्न होईल या सर्व बाबींची पूर्तता करण्यात संस्थेच्या कार्यकत्र्यांनी प्रयत्न केलेत. ज्या दिवांग बांधवांची आर्थिक स्थिती उत्तम आहे अथवा ज्यांचे पालक त्यांच्या पाठीशी उभे आहेत ते बांधव आपल्या घरी विवाह संपन्न करीत आहे. तर समाजा समोर वेगळा आदर्श उभा व्हावा व दिव्यांग बांधव सुद्धा यशस्वी संसार करून दिव्यांगत्वावर मात करू शकते याचा आदर्श निर्माण करण्यासाठी आर्थिक सामाजिक परिस्थिति उत्तम असतानाही १० फेब्रुवारी २०१९ रोजी होऊ घातलेल्या २१ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळ्यात विवाह करणार आहेत.

सदर सोहळ्यात दिनांक ९.२.२०१९ रोजी संध्याकाळी ७ वाजता सर्व दिव्यांग वधूवरांना नृत्य व संगीत अविष्कारात मेहंदी व हळद लावण्यात येईल ज्यात चंद्रपुरातील संगीत नृत्य सौंदर्यप्रसाधन क्षेत्रातील सुप्रसिद्ध मान्यवर स्वयंम प्रेरणेने येऊन मोफेत सेवा देतात. सदर कार्यक्रमाला श्रीमती ताराजी गांधी, श्रीमती शकुंतलाजी बांठिया, श्रीमती नगिनाजी पुगलिया, गुंजनदिदी बाफेणा, सौ. किरणताई देरकर, वणी, सौ. सीमाताई खुटेमाटे बल्लारशहा इत्यादि मान्यवर उपस्थित राहणार आहे.
दिनांक १०.२.१९ रोजी सकाळी गौरव सेलिब्रेशन सभागृहातून सर्व वधू-वर तयार होऊन चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली देवीचे दर्शन घेण्याकरिता नाचत गात जातील. सभागृहात वरात आल्यानंतर वधू वरासह सर्व मान्यवर उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात येईल. याच कार्यक्रमात जे आर्थिक दुर्बल प्रशिक्षित २५ दिव्यांग बांधव आहेत त्यांना व्यवसाय उपयोगी साहित्य मोफेत देऊन त्यांना व्यवसाय करून स्वतः आत्मनिर्भर करण्याकरिता संस्था सहकार्य करेल ज्यात पप्पू लुनावत तथा ज्वेलर्स व्यावसायिक मंडळी सहकार्य करणार आहे. त्याचप्रमाणे स्वतःच्या कलागुणांनी दिव्यांग क्षेत्रात समाजासमोर आपली वेगळी ओळख निर्माण करणाèया दृष्टीबाधित आकाश भैसारे संगीतकार लाखणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अमोल कर्चे, मुंबई, अस्थिव्यंग कु. शिरीन नाज पठाण, चंद्रपूर कर्ण बधिर सुरेश पहाडे कॉम्प्यूटर ऑपरेटर, बी.एम.सी. मुंबी यांचा शाल श्रीफेळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

ठिक ११ वाजता २१ जोडप्यांचे धार्मिक विधी नुसार मान्यवर प्रमुख अतिथि तथा समाज बांधवांच्या उपस्थितीत विवाह संपन्न होईल . नव दाम्पत्यांना संसार उपयोगी साहित्यासह नववधूस सुभाषभाऊ qशदे विप्लव ज्वेलर्स तर्फे सोन्याचे मंगळसूत्र देण्यात येईल. तरी सर्व चंद्रपूरवासी मान्यवरांनी सदर विवाह सोहळ्यास उपस्थित राहून आस्थाच्या या जगावेगळा सोहळा यशस्वी करावा असे आवाहन केले आहे. सदर उपक्रम यशस्वी करण्याकरिता रोहितबाबू पुगलिया, संजयकुमार पेचे, महेश भगत, अविनाश गायधणे, विनोद भोयर, यशवंत देशमाने, आतिश आक्केवार, रमेश रामटेके, प्रकाश राजुरकर तथा आस्था परिवारातील सर्व सहकारी संस्था तथा मित्र परिवार अथक परिश्रम घेत आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.