बल्लारपुर येथील गुरुनानक पब्लीक स्कुल मध्ये थाटात पार पडला पुरस्कार वितरण समारंभ
चिमूर/रोहित रामटेके
चिमुर--:: पर्यावरण श्रेत्रामध्ये वृक्षसंवर्धन , जलसंवर्धन , वन्यजीव संवर्धन , प्लास्टिक मुक्त शहर अभी यान, ऐतीहासीक वारसा संवर्धन इत्यादि सामाजिक उपक्रमामध्ये भरिव व उल्लेखनिय कामगीरी केल्याबद्दल पर्यावरण प्रेमी तथा पर्यावरण समीती अध्यक्ष कवडु लोहकरे यांना २०१९ या वर्षिचा जीवनगौरव पुरस्कार बल्लारपूर येथील गूरुनानक पब्लिक स्कुल या ठीकाणी पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटक वनविकास कार्पोरेशन चे अध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जा चंदनसीह चंदेल यांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेडी कार्यक्रमाचे अतिथी कैलाश खंडेलवार , फिल्म निर्माता राजण सुर्यवंशि , फिल्म निर्माता विजय गुमगावकर, प्रेम झामनानी, डाॅ नामदेव उमाटे, नविन लादे , सौ .कल्पणा वाढे आदि प्रमुख पाहुणे उपस्थित होते
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्यातील विविध व पर्यावरण श्रेत्रात कार्य करणारे दिग्गज लोकांची उपस्थिती होती.पर्यावरण प्रेमी कवडू लोहकरे यांना पर्यावरण श्रेत्रातील राज्यस्तरिय जीवनगौरव मीडाल्याबद्दल सर्व स्तरावरुन कौतूक होत आहे. पर्यावरण संवर्धन
समीती भिसी, पर्यावरण संवर्धन समीती चिमुर , पर्यावरण संवर्धन समीती नेरी , पर्यावरण संवर्धन समीती खडसंगी कडुन अभी नंदन करण्यात आले.