ललित लांजेवार/नागपूर:
तुमच्या मोबाईलवर एक टेक्स्ट MSG येतो,तुम्ही मोबाईल बघता आणि मेसेज असतो तुमचा कोणी तरी मित्र मैत्रीण तुमच्या खात्याला एकहजार रुपये जमा करतो,त्याखाली त्याखाली एक लिंक असते त्यावर क्लिक करायसाठी सांगतात,आणि तुम्ही तत्काळ त्या लिंकवर क्लिक करता मात्र तुम्ही लिंक उघडून पाहिली तर पैसे जमा झालेले नसतात. मग मेसेज कशासाठी पाठवला जातोय,असे मेसेज कोण पाठवत आहे,याची संपूर्ण माहितीचा शोध आम्ही विविध सायबर तज्ञांकडून जाणून घेतला,
तुमच्या मोबाईल मध्ये एक हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आलाय? जर का हा मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आला असेल तर जरा सावध व्हा, कारण हा मेसेज अनेकांना येतोय, तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा दावा करतो, आणि खात्यात पैसे जमा झालेत का? हे पहायचं असल्यास खालील लिंक उघडून बघा असा संदेश देतो,पण खरच कोणी आपल्याला पैसे पाठवत असते का ? हे बघण्यासाठी अनेकांनी ही लिंक उघडून पाहिली, पण पैसे जमा झालेले नाहीत, मग हा मेसेज कोणी पाठवला, हि फसवणूक तर नाही न? असे अनेक प्रश्न आपल्या समोर उभे ठागतात,
हा जो MSGवर पैसे जमा झाल्याचे जे घडून येते त्याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही काही पोलीस विभागातील अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांना हा मेसेज दाखवला आणि याबद्दल अधिक माहिती जाणून घेतली, पाठवणाऱ्याचा एकच उद्देश आहे तो म्हणजे आपली वैयक्तिक माहिती चोरून त्याचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून घ्यायचा आहे, हे मेसेजेस जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून बल्कच्या संख्येत पाठविल्या जात आहेत,हे मेसेज गेल्या अनेक दिवसांपासून अनेक लोकांच्या मेसेज बॉक्समध्ये येत आहेत, तुमच्या खात्यावर ते 1000 रुपये जमा झालेले आहेत आणि अधिक माहिती जाणून घ्यायचे असेल तर आपण पुढे दिलेली लिंकआहे, ही हि लिंक तुम्ही ओपन करा,मात्र हि लिंक ओपन केली तर संपूर्ण बँक तपशील मागितला जातो,जर का तुम्ही हा बँक तपशील भरला तर तुमचा खिशा खाली झाला समजा,अश्या फसव्या MSG ला बळीन पडण्याचे आव्हाहन सध्या महाराष्ट्र पोलिसांकडून करण्यात येत आहे.
या MSG मध्ये येत असलेली लिंक हि एका ऑनलाईन शॉपिंग साईटची असल्याचे समजते आहे,एखादी साईटच्या प्रमोशनसाठी अश्या प्रकारच्या बल्क MSG चा वापर केला जातो,तर समोरील माहिती विचारली आणि जर तुम्ही ती दिली तर तुमचा खिसा खाली झालाच समजा,त्यामुळे ही निव्वळ फसवणूक असल्याचे स्पष्ट झाले आहे,त्यामुळे असे MSG आल्यास याला ब्लॉक करा किव्हा डिलिट करा, हि लिंक आहे वेबसाइट आहे ती ओपन करायची नाही, आणि अशा आमिषाला बळी पडायचं नाही, मिळालेल्या माहिती वरून हा उत्तरप्रदेश येथील पश्चिम भागातून बीएसएनएल या यंत्रणेद्वारे MSG पाठविण्यात येत आहे.
आजच्या जगात ५ रुपयाचा चहा पाजायला मागे पुढे पाहणारे लोक तुमच्या खात्याला कशे काय १ हजार रुपये विना कामाने टाकणार असा प्रश्न या वेळी उपस्थित होत आहे.
हि लिंक ओपन करून माहिती भरणाऱ्या बऱ्याच जणांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे असे मेसेजेस आले तर ते लागलीच डिलीट करा किंवा ब्लॉक करा असे आवाहन महाराष्ट्र पोलिसांनी केलंय.