किल्ला पर्यटन आणि सौंदर्य वाढीसाठी इको-प्रो चा अनोखा प्रयत्न....
चंद्रपुर किल्ला स्वच्छता 630 दिवस सतत सुरु असून, सोबत किल्ला पर्यटन मागील 25 हप्ते पासून प्रत्येक रविवार ला सुरु आहे....आतापर्यंत 2 हजार पेक्षा अधिक नागरिक सहभागी झालेत....
सोबत किल्ला चे सौंदर्यात भर पडावी म्हणून मागील 40 दिवस पासून रामाला तलाव च्या आतिल किल्ला भिंति व बुरुज मधून बाहर वाढलेली झाडे आणि झुडपे काढण्याची कामे इको-प्रो सदस्य कडून सुरु आहे...
ही कामे झाल्यावर याचा वापर कसा होऊ शकतो... याकरिता, काल आणि आज या स्वच्छ झालेल्या किल्ला भिंतिवर विद्युत रोशनाई करून किल्लाच्या सौंदर्यात भर घालन्याचे काम करण्यात आलेले आहे....
इको-प्रो तर्फे रामाला तलाव मधील संपूर्ण भिंतीची स्वच्छता करण्यात येणार असून या भिंतिवर प्रशासन कडून कायम अशी विद्युत रोशनाई करण्यात आल्यास भविष्यात रामाला तलाव परिसर अधिक सुंदर आणि पर्यटन दृष्टया अधिक विकसित होईल....
मागील 40 दिवस या विशेष श्रमदान कार्यात आणि रोशनाई च्या या कामात मागील दोन दिवस संस्थेचे बंडू धोतरे, रवि गुरनुले, बिमल शहा, राजू कहिलकर, नितिन रामटेके, नितिन बुरड़कर, सुमित कोहले, अनिल अदगुरवार, प्रमोद मलिक, जयेश बैनलवार, अमोल उत्तलवार, यांनी सहभाग घेतला....
विशेष म्हणजे या लाइट आणि रोशनाई च्या कामाकरिता आपल्या वाददिवशी धर्मेन्द्र लुनावत Dharmendra Lunawat यांनी आर्थिक सहकार्य देऊन मदत केली