সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, February 01, 2019

महावितरणच्या चित्ररथाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक

नागपूर/प्रतिनिधी:

     प्रजासत्ताक दिनानिमित्त महावितरणच्या वतीने तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून महावितरणने या चित्ररथात विजेमुळे शेती आणि शेतीमुळे प्रगती या संकल्पनेवर आधारित देखावा तयार केला होता.

     प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी 2019 ला मुंबई येथील शिवाजीपार्क येथे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत असणाऱ्या विविध विभागांच्या वतीने चित्ररथाचे प्रदर्शन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मॉरिशियसचे पंतप्रधान श्री. प्रवींद जुगनॉथ, महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. विद्यासागर राव, मुख्यमंत्री ना. श्री. देवेद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी महावितरणने विजेमुळे शेती आणि शेतीमुळे प्रगती  या मुख्य संकल्पनेवर आधारलेला देखावा चित्ररथासाठी तयार केला होता. यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, इलेक्ट्रिकल व्हेईकल चार्जिंग स्टेशन्स्, मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना, सौभाग्य योजना, उच्चदाब वीज वितरण प्रणाली या योजनेंच्या यशस्वीतेवर आधारित देखाव्यांचा समावेश होता. चित्ररथाच्या देखाव्याचे मान्यवरांनी कौतुक केले होते.

          महावितरणच्या या चित्ररथाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून सर ज. जी. उपयोजित कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता श्री संतोष क्षिरसागर, सर जे. जे. स्कुल ऑफ आर्टचे अधिष्ठाता प्रा. विश्वनाथ साबळे  व मुंबई विद्यापीठाच्या अकॅडेमी ऑफ थिएटर आर्टस्‌चे संचालक  डॉ. मंगेश बनसोड यांच्या निवड समितीने चित्ररथाचे नामांकन निश्चित केले. हा चित्ररथ कन्सेप्ट कम्युनिकेशन या एजन्सीच्या माध्यमातून तयार करण्यात आला. महावितरणच्या यशाबद्दल ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव श्री अरविंद सिंह, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री संजीव कुमार यांनी सर्वसंबंधितांचे कौतुक केले आहे. 


 


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.