खबरबात, गणेश जैन, धुळे
बळसाणे : साक्री तालुक्यातील बळसाणे येथील कै.एन.पी.जी.विद्यालयात हुशार , होतकरू व गरजू मुला, मुलींना नुकतेच ६५० शालेय गणवेश मोफत वाटपाचा कार्यक्रम नुकताच झाल्याचे महावीर जैन यांनी सांगितले.
शिक्षण म्हणजे जीवन जगण्याची कला पण हीच कला काही दिवसांनी संपण्याच्या मार्गावर आहे बळसाणेसह माळमाथा भागात शेतकऱ्यांची व सर्व साधारण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने शिक्षण अर्धवट च राहून जात आहे व बळसाणेसह माळमाथा परिसरात बहुतांश ठिकाणी अशीच परिस्थिती आहे गेल्या दोन ते तीन वर्षापासून जैन समाजाने दुष्काळ ग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांना शालेय पोषाखा पासून ते स्कूल बँग्स , वह्या , कंपास , वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे गेल्या वर्षी बळसाणे विद्यालयात बावीशे रजिस्टर नोटबुक्स वाटपाचा कार्यक्रम मुंबई च्या प्रेम स्पर्श मार्फत झाला त्याच प्रमाणे महावीर जैन यांनी विश्वकल्याणकाचे ट्रस्ट गण यांना सांगितले की बळसाणे गावात दुष्काळ परिस्थिती असल्याने विद्यार्थी शालेय जीवनात लागणाऱ्या साहित्यास खरेदी करावयास मोठी अडचण भासत असल्याने असे विद्यार्थी शिक्षणापासून अलिप्त होताना दिसून येत आहे यासाठी आपण शालेय विद्यार्थ्यांना गणवेश भेट द्यावे अशी अपेक्षा महावीर जैन यांनी केली जैन यांच्या सांगण्याप्रमाणे धुळे येथील कमलेश गांधी यांनी मुंबई येथील दानशूर चंद्रहास वोरा यांना बळसाणे येथील विद्यार्थी पैसे अभावी शिक्षणाला तऱ्हे देत आहे तरी आपण आपल्या इच्छा शक्तीनुसार शालेय गणवेश देण्यात यावे त्याचप्रमाणे मुंबई चे चंद्रहस वोरा यांच्या वतीने कै. एन.पी.जी.विद्यालयाला साडे सहाशे विद्यार्थ्यांना गणवेश भेट देण्यात आले नियमितपणे समाजकार्यासाठी जैन समाज खरोखरच पुढे येत असल्याचे सरपंच दरबारसिंग गिरासे यांनी मनोगतातून सांगितले व कमलेश गांधी म्हणाले की आमच्या संस्था कायम सामाजिक उपक्रमास अग्रेसर राहत असल्याची ग्वाही गांधी यांनी दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेंद्र टाटीया होते याकामी विश्वकल्याणकाचे ट्रस्टचे संचालक विजय राठोड, कमलेश गांधी , सुरेंद्र टाटिया , सुरेंद्र भंसाली , पत्रकार गणेश जैन ,चंदन टाटीया व महावीर जैन व प्रमुख पाहुणा म्हणून दरबारसिंग गिरासे यांच्या उपस्थितीत शालेय गणवेश मुप्त वाटप करण्यात आले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आर.बी.पटेल व आभार प्रा.एस.बी. मोहने यांनी केले तसेच
कार्यक्रम यशस्वीसाठी शाळेचे प्राचार्य , उपप्राचार्य यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले