সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, February 04, 2019

तब्बल २१ वर्षांनी सापडले चंद्रपूरचे बेपत्ता वनरक्षक

ललीत लांजेवार/नागपूर: 
लाखोंच्या संख्येत आयोजित कार्यक्रमात किव्हा मेळाव्यात एखादी व्यक्ती आप्तजनांपासून हरवली असल्याचे आपण ऐकले असेल, मात्र त्यांच गर्दीच्या व लाखोंच्या संख्येत असलेल्या मेळाव्यात एखाद्या व्यक्तीचा 21 वर्षानंतर शोध लागणे म्हणजे हरवलेल्या व्यक्तीच्या परिवाराला नवसंजीवनीच मिळणे होय, अशीच नवसंजीवनी चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी येथील बोनगीलवार परिवाराला मिळाली आहे, एक नव्हे २ नव्हे तर तब्बल २१ वर्षानंतर बेपत्ता झालेले बोनगीलवार परीवाराचे प्रमुख राजाराम बोनगीरवार हे पश्चिम बंगाल मधील गंगासागर मेळाव्याच्या निमित्याने सापडले.

कोलकातापासून 100 कि.मी. अंतरावर असलेल्या दक्षिण चौबीस जिल्ह्यातील गंगा नदीच्याकाठी दरवर्षी मकर संक्रांतीनिमित्त गंगासागर मेळाव्याचे आयोजन होत असते. प बंगाल मधील गंगासागर मेला जगप्रसिध्द असून लाखो भाविक येथे स्नानानाकरिता येतात. याठिकाणी होणाऱ्या मोठ्या गर्दीमुळे सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता तेथील प्रशासन सज्ज असते.त्यासाठी विविध सामाजिक संघटना व स्वयंसेवक या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी काम करत असतात, अश्यातच वेस्ट बंगाल रेडिओ क्लबचे अम्बरीश बिस्वास हे या मेळाव्यात स्वयंसेवक म्हणून काम करीत असता राजाराम बोणगीरवार हे आजारी अवस्थेत त्यांच्या चमुला सापडले.

वेस्ट बंगाल रेडिओ क्लबच्या सदस्यांनी त्यांना ताबडतोब वैद्यकिय सेवा पुरवून चौकशी केली. चौकशीत राजाराम हे महाराष्ट्रातील आहेत असे समजले. तसेच त्यांनी आपल्या गावाचे नाव कोठारी असे सांगितले.
बंगाल रेडिओ क्लबचे बिस्वास आणि महाराष्ट्रातील एक निवृत्त उपजिल्हाधिकारी दत्ता देवगावकर यांनी कोठारी कुठे आहे हे शोधण्यासाठी इंटरनेटचा वापर केला व पोलीस स्टेशनचे ठानेदार सहायक पोलीस निरीक्षक संतोष अंबिके यांच्याशी संवाद साधून माहिती दिली.त्यांना कोठारी येथून राजाराम बेपत्ता असल्याची महिती मिळाली. कोलकात्याहून छायाचित्र पाठविण्यात आले. परंतु कुटूंबीयांनी ओळखले नाही. राजाराम वनविभागात कार्यान्वित होते. त्यांच्या बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात 2002 मध्ये नोंद केल्याचे आढळले.



त्यामध्ये राजाराम यांचे वर्णनाची नोंद आहे, शरीरावरील खुणांची माहिती ठानेदार यांनी बिस्वास यांना दिल्यावर ते इसम बोनगिरवार असल्याची खात्री पटली. तहसीलदार बल्लारपूर यांनीही यात मदत केली.राजाराम यांचा शोध घेण्याकरिता त्यांच्या मुलासह ठाणेदार अंबिके यांनी पोलिस हवालदार पुलगमकर, पोलिस शिपाई विनोद, सचिन पवार यांना कोलकत्ता येथे रवाना केले. तेथे काकद्वीप रुग्णालयात त्यांची भेट झाली. अन त्यांना चंद्रपूर येथे आनण्याचे प्रयत्न सुरु झाले,पोलिसांनी संपूर्ण कायदेशीर कारवाई करत त्यांना रविवारी चंद्रपूर येथे आणले, तब्बल 21 वर्षांनी मुलांना वडील मिळाले. हे काम वेस्ट बंगाल रेडिओ क्लब च्या सदस्यांमुळे शक्य झाले. वडिलांना बघताच बोनगिरवार परिवाराच्या चेहऱ्यावर आनंदाच्या छटा दिसू लागल्या,

पोलीस स्टे. कोठारी चे ठाणेदार संतोष अंबिके यांच्या कार्यतत्परतेने जवळपास 21 वर्षापासून बेपत्ता असलेल्या कुटुंबियाची अविस्मरणीय भेट घडवून आणल्याने पोलीस प्रशासनाचे व त्यांच्या सहकार्यांचे आभार राजाराम बोनगीरवार यांचे पुत्र सुनील बोनगिरवार यांनी मानले.
या संपूर्ण प्रकरणात सखोल चौकशी केल्यानंतर मानसिक त्रासामुळे त्यांनी घरदार व संसार सोडला असे माहित पडते.

२२ वर्षानंतर बोनगिरवार चंद्रपूर येताच त्यांचे पोलीस अधीक्षक यांचे उपस्थितीत पुष्पगुच्छ व शालश्रीफळ देवुन त्यांची विचारपूस करण्यात आली, राजाराम यांना रविवारी संध्याकाळी त्यांचे नातेवाईकांकडे सुखरुप सुपुर्त करण्यात आले. तेव्हा त्यांच्या कुटंबियांच्या डोळयात आनंदाश्रू आले होते. आत्ता २२ वर्षानंतर घरातील व्यक्‍ती परत मिळाल्याने बोनगिरवार कुटंबियांच्या घरी वेगळे भावनीक आनंदाचे वातावरण आहे. या २२ वर्षाच्या भटकंतीवासाला चंद्रपूर पोलिसांचे मोलाची साथ मिळाली, पोलीस अधीक्षक श्री. महेश्‍वर रेड्डी यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी,शेखर देशमुख राजुरा यांचे नेतृत्वात पोहवा. श्‍यामराव पुल्लगमकर,पोल्लैस शिपाई विनोद निखाडे यांनी बोनगिरवार यांना शोधण्यास मोलाचे कार्य केले.

या संपूर्ण शोध प्रकरणात पुन्हा एकदा इंटरनेटने आपली महत्वाची भूमिका बजावली आहे,इंटरनेटच्या माध्यमातून कोठारी शोधणे सोपे झाले अन बोनगिरवार आपल्या घरी आले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.