चंद्रपूर/अमोल जगताप:
सत्यशोधक कोसरे माळी समाज जुनोना तर्फे गावात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती 3 जानेवारी ला जलोष्यात साजरी करण्यात आली। ह्या कार्यक्रमात महिला, आबालवृद्ध, तसेच मोठ्या संख्येने गावकरी सहभागी होऊन सायंकाळी भव्य फेरी काढण्यात आली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवनपट व कार्याची माहिती श्री. मेघश्याम पेटकुले व स्तुती सुमने गीत सौ. सुरेखाताई आदे यांनी सादर केली. कार्यक्रमाला ग्राम पंचायत जुनोना उपसरपंच श्री रवी गेडाम, सदस्य तानबाजी चौधरी, मंगला वसाके,मालाबाई मेश्राम, पोलीस पाटील जयपाल औरासे व गावातील प्रतिष्ठित नागरिक रुपदास गुरनुले, अजय वाढई, परशुराम शेंडे, मनोज लेनगुरे, नवनाथ बोरूले, मनोज कोटरंगे, मुकेश नागोसे, महेश वाडगुरे,विशाल लेनगुरे, वासुदेव पेटकुले, गजानन वाढई, अनिकेत जेंगठे, श्रीकृष्ण ढोले, बेबीताई वाडगुरे, मायाताई आदे, अर्चना चौधरी, वनिता मोहूर्ले, वीणाताई ढोले, सुनीताताई मोहूर्ले, काजल कोटरंगे, व इतर समाज बांधव व गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. ह्या वेळी समाज प्रभोधन घडून सामाजिक एकता आणि संघटन यांचे दर्शन झाले.