मनोज चीचघरे/पवनी/भंडारा:
नव्या जोमाने आधुनिक शेती पध्दतीची कास धरणारे जीवन फुंडे व संजय ब्राम्हणकर यांच्या एकत्रित रेशीम शेड आगीत भस्मसात झाले. पिकांसह शेड जळाल्याने त्यांचे स्वप्न हिरावले गेले. त्या शेतकर्याना आझाद शेतकरी संघटनेचे संस्थापक व भाजप किसान आघाडीचे नेते किशोर पंचभाई यांनी घटनास्थळी भेट देऊन दहा हजार रुपयांची मदत दिली.
अल्पभूधारक असलेल्या या शेतकऱ्याचे कोषाचे पिक अंतीम टप्प्यात होते. ३५० डि एल एफ चे पिक घेणे मोठी उपलब्धी आहे. रेशीम शेतीमध्ये पिकविम्याची सोय नाही. अशा वेळी किशोर पंचभाई यांनी केलेल्या मदतीचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे. ही मदत रोख स्वरूपात देण्यात आली.यावेळी आसगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यादव डोये, राजेंद्र फुलबांधे, राजु सावरबांधे, अमीत डोये, संदीप देशमुख उपस्थित होते.