नागपूर / अरूण कराळे:
नागपूर तालुक्यातील सोनेगाव (निपाणी ) गावालगत संदीप मेटल ही कंपनी अस्तित्वात असुन या कंपनीचे रसायनयुक्त केमिकल पाणी संदीप मेटल कंपनीने सरंक्षण भिंती जवळ मोठे छिद्र करुन रसायनयुक्त पाणी सोनेगावात सोडले आहे . हा प्रकार अनेक वर्षा पासुन सुरु आहे सदर कंपनीच्या रसायनयुक्त पाण्यामुळे अनेक जनावरे गाय व म्हशी दगावली आहे या कंपनीचे पाणी मोकळया जागेत सोडल्याने गावातील सार्वजनिक विहिरी,बोरवेल मधुन झिरपलेले रसायनयुक्त पाणी गावकऱ्यांच्या घरगुती वापरात वापरले जात आहे त्यामुळे गावातील नागरीकांना काही आजार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे . या विषयी स्थानीक नागरीकांनी अनेकवेळा कंपनी विरोधात आंदोलन केले तरीही कंपनी प्रशासनानी याची गंभीर दखल घेतली नाही .
संदीप मेटल कंपनीवर कार्यवाही करुन सोनेगाव ( निपाणी ) येथील जनतेला न्याय मिळवुन द्यावा अशा प्रकारचे निवेदन सोनेगाव ग्रा .प. सदस्य विनोद लंगोटे, हिंगणा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अशविन बैस यांच्या नेतृत्वात प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, नागपूर जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी,विलेज डेवलपमेंट अधिकारी यांना दिले .