चंद्रपूर/प्रतिनिधी:
सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण देण्याचे महान कार्य केले, आजची स्त्री सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे, आज स्त्रियांची जी प्रगती दिसते ती केवळ सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आहे, म्हणून सर्वांनी सावित्रीबाई फुले यांचे कार्य जीवनभर स्मरणात ठेवावे असे मनोगत मा. महापौर सौ. अंजली घोटेकर यांनी चंद्रपूर महानगरपालिका येथे साजरा करण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमात व्यक्त केले.
याप्रसंगी विद्येची जननी, भारतातील पहिली स्त्री शिक्षिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकण्यात आला. याप्रसंगी उपमहापौर श्री. अनिल फुलझेले, उपयुक्त श्री. गजानन बोकडे, नगरसेविका सौ. डुकरे, श्री. गोस्वामी, डॉ. अंजली आंबटकर,अनिल घुले, आशिष जीवतोडे, गिरीश पात्रीकर, सारंग निर्मळे, तुकड्यादास डुमरे, नामदेव राऊत, दानव, जनबंधू ,अतुल भसारकर उपस्थित होते.