नागरीकांनी ग्रामपंचायतचे मानले आभार
वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे:लाव्हा ग्रामपंचायत अतंर्गत असणाऱ्या सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्या व सिमेंट रस्त्याच्या विकास कामासाठी ६० लक्ष रुपयाचा भूमीपूजन समारंभ आमदार समीर मेघे यांच्या हस्ते पं .स.उपसभापती सुजीत नितनवरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला .लाव्हा येथील साई स्मृती अपार्टमेंटच्या मालकाने अपार्टमेंटचे सांडपाणी बाजुला असलेल्या खुल्या जागेवर सोडल्यामुळे तिथे घाण पाण्याची गटार तयार झाली होती . त्या सांडपाण्यामुळे परीसरात दुर्गंधी पसरली होती. तेथील रहीवाशांनी आंदोलन सुध्दा केले ही बातमी तरुण भारत मध्ये प्रकाशीत झाली होती .तसेच बकूताई नगरमधील सांडपाणी रस्त्यावर वाहत होते त्याचा सुध्दा विषय तातडीने सूटण्याकरिता व सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याकरिता सरपंच ज्योत्सना नितनवरे व पं .स उपसभापती सुजित नितनवरे यांनी आमदार समीर मेघे यांच्या कडे प्रश्न लावून धरला होता . आ . समीर मेघे यांनी या समस्याकडे तातडीने लक्ष घालून आमदार निधीतून ते काम पूर्ण केले .
व या सुध्दा कामाचे भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्यात आली .साई स्मृती अपार्टमेंट व बकूताई नगर मधील नागरीकांनी ग्रामपंचायतचे आभार मानले .भुमीपुजन समारंभाला आमदार समीर मेघे, खंडविकास अधिकारी किरण कोवे , पं .स उपसभापती सुजित नितनवरे, जि .प. सदस्य प्रणिता कडू,वाडीचे नगराध्यक्ष प्रेम झाडे, सरपंच ज्योत्सना नितनवरे,उपसरपंच महेश चोखांद्रे, माजी सरपंच देवराव कडू ,नरेश चरडे,संजय कपनीचोर,पुरुषोत्तम रागीट ,नानाजी ठाकरे, साधना वानखेडे,सुनंदा चोखांद्रे, सुशिला ढोक ,मनोज तभाने,प्रशांत परीपवार,अनिल पाटील,रेखा पटले,मंजूषा लोखंडे,सुनिता मेश्राम,प्रकाश डवरे, पांडुरंग बोरकर , कमलाकर इंगळे, जया पीनकाटे , पुरुषोत्तम गोरे , सुनीता तडोसे प्रामुख्याने उपस्थित होते . संचालन ग्राम विकास अधिकारी विकास लाडे यांनी केले. आभार श्री सहारे यांनी मानले .