जुन्नर /आनंद कांबळे:
जुन्नर येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालय व डायमंड पब्लिकेशन्स पुणे यांनी भरविलेल्या ग्रंथप्रदर्शनास ग्रंथरसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
ग्रँथ प्रदर्शनाचे उद्घाटन जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या खजिनदार कांतामस्करे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रभारी प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक, उपप्राचार्य डॉ. विलास जोशी अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. विलास कुलकर्णी, ग्रंथापाल लक्ष्मण थोरात, प्राध्यापक व विदयार्थी उपस्थित होते.
प्रदर्शन २० जाने. २०१९ पर्यंत चालू राहणार असून प्रदर्शनात सुमारे ५० प्रकाशकांची पंचवीस हजार विविध विषयांवरील पुस्तके सवलतीत विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. दिवसभरात दोन हजार ग्रंथरसिकांनी प्रदर्शनास भेट देवून ग्रंथ खरेदी केली.
समाजात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी महाविद्यालयात दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. विद्यार्थ्यांकडून स्पर्धा परीक्षा व माहितीपर पुस्तकांना विशेष मागणी आहे. तर महिलांकडून पाककृती व महिला वाडमयाची मागणी आहे. इलेक्ट्रॉनिक व सोशल मिडीयाच्या प्रभावातही जुन्नरमध्ये वाचन संस्कृती टिकून आहे याचा प्रत्यय पहिल्या दिवसापासून दिसून येत आहे.