नागपूर : ज्येष्ठ दलित नेते रा.सू.गवई यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. रा.सू.गवई हे ८६ वर्षांचे होते. रा.सू गवई यांनी शनिवारी दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी शेवटचा श्वास घेतला.
बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष असलेल्या गवई यांनी बिहार व केरळचे राज्यपाल पद भूषविले होते. अमरावती लोकसभा मतदारसंघातून रिपब्लिकन पक्षातर्फे १९९८ साली ते सर्वप्रथम निवडून गेले होते.रा.सू.गवई यांच्यावर उद्या अमरावतीत अंत्यसंस्कार होणार आहेत. रा. सू. गवई यांचे अंतिम दर्शन नागपूरच्या दीक्षा भूमीवर घेता येणार आहे. रा.सू गवई यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.