नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आज (गुरुवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास फाशी देण्यात आलेल्या याकूब मेमनची आपल्या मुलीसोबत बोलण्याची शेवटची इच्छा होती. त्याच्या इच्छेनुसार त्याचे आणि मुलीचे संभाषण दूरध्वनीहून घडवून आणण्यात आले.
पहाटे 5 वाजता याचिका फेटाळल्यानंतर नागपूर तुरुंगात याकूबला नवीन कपडे देण्यात आले. पहाटे 5.30 वाजता याकूबला प्रार्थना करण्यात सांगितले. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
सकाळी 6.00 वाजता याकूबला फाशीच्या ठिकाणी नेण्यात आले. फाशी का देण्यात येत आहे, हे त्याला सांगण्यात आले.
सकाळी 6.35 वाजता याकूबला फाशीवर लटकवण्यात आले. त्यावेळी 8-10 जण हजर होते.