সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, July 17, 2015

वैद्यकिय महाविद्यालयाची जिल्हाधिका-याकडून पाहणी

चंद्रपूर दि.17- चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय 2015 च्या सत्रापासून सुरु होणार असल्याने जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आज महाविद्यालयाची पाहणी करुन त्यांना काही त्रृटी दिसून आल्या त्यावर त्वरीत अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. 


यावेळी त्यांचेसोबत वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. प्रदिप दिक्षीत, अधिक्षक अभियंता डी.के.बालपांडे, कार्यकारी अभियंता मनोज जयस्वाल, महानगरपालिकेचे शहर अभियंता महेश बारई, इंडियन मेडीकल अशोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ.अनंत हजारे, उपअभियंता मकवाने, एन.बुरांडे तसेच इतर विभागाचे अधिकारी व कत्रांटदार यावेळी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिका-यांनी मुलांच्या वस्तीगृहाच्या इमारतीची पाहणी करुन तेथे पिण्याच्या पाण्याची सुविधा महानगरपालिकेकडून त्वरीत करुन घेण्यात यावी अशा सूचना संबधितांना दिल्या. वस्तीगृहामध्ये लाईनची व्यवस्था तात्काळ सुरु करण्यात यावी असे ते म्हणाले. तसेच मुलांच्या भोजन कक्षाची व अधिकारी, कर्मचा-यांच्या निवासस्थानाची व वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व विभागाची पाहणी जिल्हाधिका-यांनी यावेळी केली. त्यानंतर अधिका-यांच्या बैठकीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे फायर ऑडीट तात्काळ करुन घ्यावे असे त्यांनी सांगितले. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीमधील शिल्लक असलेले किरकोळ कामे त्वरीत करण्यात यावे अशा सूचना संबंधित विभागाला त्यांनी दिल्या. चालू सत्रापासून वैद्यकीय महाविद्यालय सुरु होणार असल्याने या कामास प्रथम प्राधान्य देवून हे सर्व कामे कालमर्यादेत पूर्ण करण्यात यावे ते जिल्हाधिकारी म्हणाले.
तसेच महाविद्यालयास लागणारे साहित्य, फर्निचर, औषधी, संगणक इत्यादी बाबींची खरेदी त्वरीत करण्यात यावे असे महाविद्यालय प्रशासनाला त्यांनी सांगितले. तसेच इमारतीचे विद्युतीकरण, मलनिस्सारण व्यवस्था, गॅस पाईप लाईन व पाणी पुरवठा या बाबी काळजी पूर्वक करण्यात याव्यात असे ते म्हणाले. वैद्यकिय महाविद्यालयाची इमारत हस्तांतरीत करण्यापूर्वी ती वापरण्यायोग्य असली पाहिजे याची खात्री बांधकाम विभागाने करुन घ्यावी असे ते म्हणाले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.