সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, October 28, 2014

फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

भारतीय जनता पार्टी (भाजपा) चे विद्यमान प्रदेश अध्यक्ष 
देवेंद्र गंगाधरराव फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री …………. 

 विद्वत्ता आणि लोकप्रियतेचा मिलाप साधणारे एक दुर्मिळ राजकीय व्यक्तिमत्त्व.
नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी व्यवसाय व्यवस्थापनात स्नातकोत्तर पदवी व डी. एस. ई., बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापनाच्या पद्धती व तंत्र या विषयात पदविका मिळविली. नव्वदीच्या दशकात राजकारणात प्रवेश केल्यानंतर अल्पावधीतच त्यांनी मोठा जनाधार प्राप्त केला.
देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या जनतेचे प्रतिनिधित्त्व करत असतानाच पक्षांतर्गत विविध स्तरांवर नेतृत्त्व केले. नागपूर महानगरपालिकेतून ते सलग दोनदा (१९९२ व १९९७) निवडून आले. नागपूरचे महापौर पद त्यांनी भूषविलेले असून भारतातील आजवरचे दुसरे सर्वात तरुण महापौर अशी त्यांची ख्याती आहे. महापौर पदी पुन्हा निवडून येऊन महाराष्ट्रातून ‘मेअर इन काऊन्सिल’ चा मान मिळविणारे ते पहिलेच.
१९९९ पासून सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत. १३ वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून जनतेचे प्रतिनिधित्त्व करीत असताना विविध समित्यांवर काम केले आहे. त्यामध्ये अंदाज समिती, नगर विकास व गृहनिर्माणावरील स्थायी समिती, नियम समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासंदर्भात नेमलेली समिती यांचा समावेश आहे.
देवेंद्र फडणवीस हे अनुभवी लोकप्रतिनिधी असून राजकीय बुद्धिचातुर्य व कौशल्य यासाठी त्यांना विविध व्यासपिठांनी गौरविलेले आहे. त्यांच्या कार्य-कर्तृत्त्वाची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली गेलेली असून राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने दिला जाणारा ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तसेच जागतिक संसदीय फोरमच्या सचिव पदी ते कार्यरत आहेत.
आर्थिक धोरणांसह विविध विषयांचा व्यासंग व विश्लेषण यासाठी देवेंद्र फडणवीस यांची ख्याती आहे. केंद्रीय अर्थसंकल्पावरील त्यांच्या विश्लेषणाची दरवर्षी आतुरतेने वाट पाहिली जाते. आर्थिक विषमता दूर करण्यासंदर्भातील त्यांचे विचार व त्यांच्या कल्पनांचे तज्ञांनीही कौतुक केलेले आहे. इंधन / ऊर्जा सुरक्षितता व वातावरणातील बदल अशा विषयांवर बोलण्यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये निमंत्रित केले गेले आहे.

विचारसरणी

देवेंद्र फडणवीस यांचा ‘बोले तैसा चाले’ या विचारावर ठाम विश्वास आहे. हाती घेतलेले काम ते तडीस नेतातच आणि ते काम अधिकाधिक चांगल्या रितीने करतात. मदत मागणारा कोणीही असो, दिवसरात्र कोणतीही वेळ असो किंवा आव्हान कितीही कठीण असो, जनतेची सेवा करताना देवेंद्र फडणवीस जराही बिचकत नाहीत. नागपूर विद्यापीठातून त्यांनी विशेष गुणवत्तेसह कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी पदवीनंतर व्यवस्थापनशास्त्राची पदवी मिळविली. त्यांनी डीएसई बर्लिन या जर्मनीतील संस्थेमध्ये डिप्लोमा इन मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा डिप्लोमा मिळविला. उच्च शिक्षण असले तरी सदैव जनसामान्यांशी संपर्क ठेवून उत्साहाने लोकाभिमुख कामे करण्याचे त्यांचे वैशिष्ट्य आहे. हाती घेतलेले काम तडीस नेईपर्यंत अथवा समस्या सुटेपर्यंत त्यांना स्वस्थ बसवत नाही. त्यांचे नेतृत्व हे नैतिकतेच्या भक्कम पायावर उभे असलेले पारदर्शी नेतृत्व आहे.

लोकप्रतिनिधित्व

  • १९९९ ते आतापर्यंत – सलग तीनवेळा महाराष्ट्र विधानसभा सद्स्य
  • १९९२ ते २००१ – सलग दोन टर्म नागपूर महापालिकेचे सदस्य, दोनवेळा नागपूरचे महापौर, मेयर इन कॉन्सिल पदावर फेरनिवड, असा सन्मान मिळणारे राज्यातील एकमेव

राजकीय टप्पे

  • २०१३ – प्रदेश अध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
  • २०१० – सरचिटणीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
  • २००१ – राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा
  • १९९४ – प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा
  • १९९२ – अध्यक्ष, नागपूर शहर भारतीय जनता युवा मोर्चा
  • १९९० – पदाधिकारी, नागपूर शहर पश्चिम
  • १९८९ – वॉर्ड अध्यक्ष, भाजयुमो

विधिमंडळातील कार्य

  • अंदाज समिती
  • नियम समिती
  • सार्वजनिक उपक्रम समिती
  • महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
  • नगरविकास व गृहनिर्माणाविषयी स्थायी समिती
  • राखीव निधीविषयी संयुक्त निवड समिती
  • स्वयंनिधीवर आधारित शाळांबद्दलची संयुक्त निवड समिती

सामाजिक योगदान

  • सचिव, ग्लोबल पार्लमेंटेरिअन्स फोरम ऑन हॅबिटाट फॉर एशिया रिजन
  • नागरी पायाभूत सुविधांसाठीचा वित्तपुरवठा आणि राजकीय व्यवस्थापनाच्या मुद्द्यांबाबत रिसोर्स पर्सन
  • संयुक्त राष्ट्रांची मान्यता मिळालेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, मुंबई या संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य
  • नाशिक येथील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी (भोसला मिलिटरी स्कूल) चे उपाध्यक्ष
  • नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य

आंतरराष्ट्रीय ठसा

  • होनोलुलू, अमेरिका येथे इंटरनॅशनल एनव्हायरमेंट समिटमध्ये सहभाग आणि सादरीकरण, १९९९
  • अमेरिकेतील वॉशिंग्टन व नॅशविले येथे यू. एस. नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेचर्स, २००५
  • स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे आयडीआरसी – युनेस्को – डब्ल्यूसीडीआर यांनी आयोजित केलेल्या ‘डिझास्टर मिटिगेशन अँड मॅनेजमेंट इन इंडिया’ या विषयावरील आंतराष्ट्रीय शिखर परिषदेत सादरीकरण, २००६
  • चीनमध्ये बीजिंग येथे डब्ल्यूएमओ – ईएसएसपी यांनी आयोजित केलेल्या ग्लोबल एनव्हायरमेंटल चेंज काँग्रेसमध्ये ‘नॅचरल डिझास्टर्स मिटिगेशन – इश्युज ऑन इकॉलिजिकल अँड सोशल रिस्क’ या विषयी सादरीकरण
  • डेन्मार्कमध्ये कोपेनहेगेन येथे आशिया व युरोपमधील तरूण राजकीय नेत्यांच्या आसेम परिषदेत भारताचे प्रतिनिधीत्व, २००७
  • अमेरिकेच्या संघराज्य शासनाच्या ईस्ट – वेस्ट सेंटरतर्फे आयोजित न्यू जनरेशन सेमिनारमध्ये ‘एनर्जी सिक्युरिटी इश्युज’ या विषयावर शोधनिबंध सादर, २००८
  • ऑस्ट्रेलिया, न्यूझिलँड आणि सिंगापूरला गेलेल्या कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोशिएशनच्या उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळाचे सदस्य, २००८
  • रशियात मॉस्को येथे भेट देणार्‍या इंडो रशिया चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाचे सदस्य, २०१०
  • युरोपमध्ये क्रोएशिया येथे ‘ग्लोबल पार्लमेंटरियन फोरम ऑन हॅबिटाट’मध्ये सहभाग, २०११
  • मलेशियामध्ये ‘जीपीएच एशिया रिजनल मीट’मध्ये सहभाग, २०१२
  • केनियातील नैरोबी येथे ‘युनायटेड नेशन्स हॅबिटाट’ने निमंत्रित केलेल्या शिष्टमंडळाचे सदस्य, २०१२

पुरस्कार

  • कॉमनवेल्थ पार्लमेंटेरियन असोसिएशनतर्फे वर्ष २००२ – २००३ साठीचा सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार
  • राष्ट्रीय आंतर विद्यापीठ वादविवाद स्पर्धेत सर्वोत्कृष्ट वक्ता पुरस्कार
  • रोटरीचा मोस्ट चॅलेंजिंग यूथ विभागीय पुरस्कार
  • मुक्तछंद, पुणे या संस्थेतर्फे स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार
  • नाशिक येथील पूर्णवाद परिवारतर्फे राजयोगी नेता पुरस्कार

युवा नेतृत्व

भारत हा तरुणांचा देश आहे. देशातील सुमारे ५४ टक्के लोकसंख्या पंचवीसपेक्षा कमी वयाची आहे तर ३५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण ७२ टक्के आहे. आपल्याला लोकशाही अर्थपूर्ण बनवायची असेल तर अधिकाधिक युवकांनी सक्रीय होण्याची आणि निर्णयाच्या आणि बदलाच्या प्रक्रियेत भाग घेण्याची गरज आहे. देशातील युवकांना वाटते की त्यांच्या आकांक्षांनुसार आणि स्वप्नांनुसार देशाने झटपट विकास करावा व प्रगत बनावे. तसे घडण्यासाठी हा मुद्दा समजून युवकांच्या आकांक्षांशी एकरूप होणार्‍या नेतृत्वाची गरज आहे.

वकील

विशेष गुणवत्तेसह कायद्याची पदवी मिळविणार्‍या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कायद्याची असामान्य समज आहे व आपले हे ज्ञान नैतिक मार्गाने समाजात बदल घडविण्यासाठी वापरण्याची त्यांची क्षमता आहे. न्याय या मूल्याला ते सर्वाधिक महत्त्व देतात. तंत्रज्ञान व अर्थकारण याची आवड असलेला वकील असल्याने त्यांना या क्षमतेचा धोरणे ठरविताना व राबविताना खूप उपयोग होतो. संख्याशास्त्र व आकडेवारीचीही त्यांना समज आहे. या सर्वांमुळे ते कोणत्याही घटनेत भक्कम कायदेशीर, आर्थिक, तांत्रिक व मुख्य म्हणजे लोकहिताच्या दृष्टीकोनातून काम करतात.

लेखक आणि कवी

देवेंद्र फडणवीस यांच्या व्यक्तिमत्वाची एक हळुवार व संवेदनशील बाजूही आहे. जनतेबरोबर व्यवहार करताना त्यांचा हा पैलू दिसून येतो. सामान्य माणसाच्या वेदना आणि चिंता त्यांना समजतात व ते जनतेची गार्‍हाणी आस्थेवाईकपणे ऐकून घेतात. सर्वसामान्य माणसाच्या भूमिकेत शिरून त्याच्या नजरेतून विचार करणे त्यांना जमते. सर्वसामान्य माणसाच्या मनाचा ठाव घेऊन त्याच्या वेदना समजून घेत त्याच्या समस्येवर तोडगा काढणे हे त्यांचे कौशल्य आहे. अशा रितीने समस्येवर तोडगा काढला की, समोरच्या माणसाच्या चेहर्‍यावर हसू फुलते. अर्थकारणाचा रुक्ष विषय असो किंवा कविता असो ठिकठिकाणच्या त्यांच्या लेखनात त्यांची संवेदनशीलता प्रतिबिंबित होते. केंद्रीय अर्थसंकल्पाचे त्यांनी केलेले विश्लेषण ऐकण्याची दरवर्षी लोकांना उत्सुकता असते. ‘हाऊ टू अंडरस्टँड अँड रीड द स्टेट बजेट’ या अर्थसंकल्पावरील त्यांच्या पुस्तकाची राजकीय पंडित, अर्थविषयक पत्रकार आणि विद्यार्थ्यांकडून प्रशंसा झाली आहे.

वक्ता, वादविवादपटू, वैचारिक नेता

आर्थिक विषय, आपत्ती व्यवस्थापन किंवा कायदेशीर बाबी अशा कोणत्याही विषयावर बौद्धिक विश्लेषण आणि वैचारिक नेतृत्वाचे दर्शन घडविणार्‍या मांडणीबद्दल देवेंद्र फडणवीस यांची ख्याती आहे. गरीब आणि श्रीमंतांमधील आर्थिक दरी कशी भरून काढावी याबद्दलचे त्यांचे विचार आणि कल्पनांना जाणकारांकडून दाद मिळाली आहे. नोकरशाहीचे थर आणि वैयक्तिक लाभाच्या पलिकडे जाऊन सामान्य माणसाच्या गरजांना महत्त्व देण्यासाठी धाडसी निर्णय घेण्याचे श्रेय त्यांना आहे.
जेंव्हा देवेंद्र फडणवीस बोलतात त्यावेळी जग त्याची दखल घेते. राजकीय वर्तुळातील एक आघाडीचे वक्ते म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांची भाषणे मुद्देसूद व अर्थपूर्ण असतात आणि कोणताही आडपडदा न ठेवता ते बोलतात. त्यांना आकडेवारी तोंडपाठ असते. त्यांच्या भाषणांना सखोल संशोधनाचा आधार असतो आणि ते भाषणात कायद्याचा आणि आकडेवारीचा आधार देतात. केवळ बोलघेवडेपणा न करता कृतीवर भर देणारा आणि कधीकधी आधी काम करून मगच त्याबद्दल बोलणारा नेता त्यांच्या भाषणातून जनतेला, राजकीय सहकार्‍यांना आणि जगाला जाणवतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर भरगच्च सभागृहालाही त्यांनी सहजतेने संबोधित केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळातील भाषणे म्हणजे वादविवाद कौशल्य आणि अर्थपूर्ण मांडणीचा उत्तम नमुना असतो. संसदीय कामकाज आणि वादविवाद कौशल्य याबद्दल तरुण विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांच्या भाषणांचा उपयोग केला जातो.

शैक्षणिक पात्रता:

  • त्यांनी डी.एस.ई बर्लिन या जर्मनीतील संस्थेमध्ये डिप्लोमा इन मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा डिप्लोमा मिळविला. ‘
  • एल.एल.बी (नागपूर विद्यापीठ)
  • बोस प्राईझ इन हिंदू लॉ’ विजेता  

वैयक्तिक माहिती

  • वय :४३
  • पत्नी: श्रीमती अमृता फडणवीस
  • सुपुत्री : कु. दिविजा फडणवीस
  • कार्यालय/निवास्थान : २७६,राव साहेब फडणवीस पार्क, धरमपेठ, नागपूर -४४००१०

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.