चंद्रपूर - जम्मु आणि काश्मिर राज्यात नैसर्गिक आपत्तीने जनजीवन विस्कळीत झाले असून येथील पूरग्रस्त नागरिकांना मदत मिळावी म्हणून चंद्रपुरातील चंद्रपूर बचाव संघर्ष समिती या संघटनेने पुढाकार घेत येथील सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण संस्था, पर्यावरणवादी संस्था, व्यापारी, वकील, डॉक्टर, पत्रकार, विद्यार्थी या सर्वांना घेऊन जम्मू काश्मिर पूरग्रस्त सहाय्यता समितीची स्थापना केली असून या समितीच्या वतीने २ ऑक्टोंबरला पूरपीडितांच्या मदतीसाठी एका मोठ्या मानवी साखळीचे आयोजन करून मदतनिधी गोळा करण्यात येणार आहे. ही मानवी साखळी बागला चौक येथून निघून अंचलेश्वर गेट, गांधी चौक ते जटपुरा गेट, येथून महात्मागांधी पुतळ्यापासुन कस्तुरबा मार्गे जाऊन गांधी चौक येथे विर्सजीत होणार असल्याची माहिती आज आयोजित पत्रपरिषदेत डॉ. गोपाल मुंधडा, अॅड. परोमिता गोस्वामी, सदानंद खत्री, मंगेश पाटील आदींनी दिली.
काश्मिर पूरपीडितांच्या मदतीसाठी उद्या चंद्रपुरात मानवी साखळी