प्रशासनाची जय्यत तयारी
चंद्रपूर दि.17- विधानसभेसाठी 15 ऑक्टोंबर रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी रविवार 19 ऑक्टोंबर रोजी सकाळी 8 वाजता सुरु होणार असून प्रत्येक विधानसभेसाठी 14 टेबल लावण्यात येणार आहेत. प्रशासनाने मतमोजणीची जय्यत तयारी केली असून मतमोजणीसाठी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात येणार आहे.
सहाही विधानसभा मतदार संघात खालील ठिकाणी मतमोजणी होणार आहे. 70-राजूरा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजूरा, 71-चंद्रपूर जिल्हा उद्योग भवन (नवीन इमारत) चंद्रपूर, 72-बल्लारपूर- उपविभागीय अधिकारी कार्यालय मूल, 73-ब्रम्हपूरी- शासकीय तंत्र निकेतन नागभिड रोड ब्रम्हपूरी, 74-चिमूर राजीव गांधी भवन तहसिल कार्यालय परिसर चिमूर व 75-वरोरा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वरोरा या ठिकाणी त्या त्या मतदार संघाची मतमोजणी होणार आहे.
मतमोजणीसाठी जिल्हयातील सहा विधानसभा मतदार संघासाठी एकूण 102 मतमोजणी निरीक्षक, 102 मतमोजणी सहाय्यक निरीक्षक, 112 सुक्ष्म निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहे. यात राजूरा-17 मतमोजणी निरीक्षक, 17 मतमोजणी सहाय्यक, 17 सुक्ष्म निरीक्षक, चंद्रपूर-16 मतमोजणी निरीक्षक, 16 मतमोजणी सहाय्यक, 19 सुक्ष्म निरीक्षक, बल्लारपूर-16 मतमोजणी निरीक्षक, 16 मतमोजणी सहाय्यक, 20 सुक्ष्म निरीक्षक, ब्रम्हपूरी-17 मतमोजणी निरीक्षक, 17 मतमोजणी सहाय्यक, 18 सुक्ष्म निरीक्षक, चिमूर- 18 मतमोजणी निरीक्षक, 18 मतमोजणी सहाय्यक, 20 सुक्ष्म निरीक्षक व वरोरा-18 मतमोजणी निरीक्षक, 18 मतमोजणी सहाय्यक, 18 सुक्ष्म निरीक्षक असे एकूण 316 अधिकारी-कर्मचा-यांचा समावेश आहे.
जिल्हयातील सहाही निवडणूक निर्णय अधिकारी राजूरा- शंतनू गोयल, चंद्रपूर- संजय दैने, बल्लारपूर-रवींद्र खंजाजी, ब्रम्हपूरी-कु.दीपा मुधोळ, चिमूर-विजय उरकुडे व वरोरा- जे.पी.लोंढे हे आहेत.
गुरुवार 16 ऑक्टोंबर रोजी मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचा-यांची सरमिसळ निवडणूक निरीक्षक आणि जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांचे उपस्थित करण्यात आली. सर्व अधिकारी-कर्मचा-यांना नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. नागरिकांनी मतमोजणी केंद्रासमोर गर्दी करु नये तसेच शांतता व सुव्यवस्था राखावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.