সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, January 17, 2019

बेवारस सापडलेला चैतन्य आपल्या पालकांच्या प्रतिक्षेत

महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा
नागपूर‍, दि. 16 : बसस्थानकावर एका टोपलीत बेवारस स्थितीत चि.चैतन्य वय 9 महिने बेवारसस्थितीत आढळून आला आहे. या संदर्भात चैतन्य या बाळाच्या शोध घेण्यात येत असून या बालकावर ज्या पालकांना हक्क दाखवायचा आहे. त्यांनी दहा दिवसात जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी, दूरध्वनी क्रमांक 0712-2569991 संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंह परदेशी यांनी केले आहे.

बेवारसस्थितीत आढळलेला चैतन्य, वय 9 महिने हा बसस्थानकावर सफाई करतांना 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 4 वाजता आढळून आला होता. या संदर्भात गणेशपेठ पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी बाळाच्या कुटुंबियाचा आणि पालकाचा शोध घेत आहे. परंतु अद्यापपर्यंत शोध न लागल्यामुळे या बालकाला बाल कल्याण समितीच्या आदेशाने त्रिमृती येथे वरदान दत्तक शिशू गृह येथे दाखल करण्यात आले आहे. चि.चैतन्य या बालकावर ज्या पालकांना अथवा कुटुंबियांना हक्क दाखवाचा आहे त्यांनी दहा दिवसाच्या आत संपर्क साधावा. त्यानंतर संपर्क न साधल्यास या बालकाला केंद्रीय दत्तक प्राधीकरण नवी दिल्ली यांचे नियमावलीनुसार बाल कल्याण समितीच्या आदेशान्वये दत्तकमुक्त करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असेही जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी विजयसिंह परदेशी यांनी कळविले आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.