সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, January 13, 2019

वाडीतील टोलचे छत झाले झोल;टोल नाक्यामुळे अनेकांचे जीव धोक्यात

कामगार,विद्यार्थी यांचे जीव मुठीत घेऊन प्रवास 
नागपूर/अरुण कराळे:

टोल नाक्यावर वाहन चालकाकडून टोल ची वसुली केल्या जाते,परंतु आवश्यक सुविधा पुरवल्या जात नसल्यामुळे वाहन चालकांना टोल वर जीव मुठीत घेऊन उभे राहावे लागते.वाडीतील तीनही टोल ची छत क्षतीग्रस्त झाल्याचे दिसून येते .याला बांधकाम विभागाची डोळे झाक म्हणावे की ठेकेदारांची कंजूशी यावर प्रश्न निर्माण होत आहे.
वाडी मध्ये तीन टोल नाके असून त्याचे छप्पर केव्हा पडेल याचा अंदाज नाही. वृत्तपत्राच्या प्रतिनिधींनी टोल नाक्याची पाहणी केली असता टोल चा झोल दिसून आला. एमआयडीसी कडे जाणाऱ्या रस्त्यावर जड वाहना कडून टोल टॅक्स घेतल्या जातो.तेथील दोन्ही टोल टॅक्सची स्थिती गंभीर आहे.काटोल रोड वरील टोल नाका याच स्थितीत आहे. पथकर विभाग महाराष्ट राज्य रहदारी विकास महामंडळ मर्यदीत मुंबई टोल नाका यांच्या अधिपत्याखाली चालविल्या जात आहे.

दहा वर्षा पासून सुरू असलेल्या या टोलवर वाहन चालका कडून टोल वसूल केल्या जात आहे.परंतु सुविधेच्या अभावामुळे वाहन चालक नाराजी व्यक्त करीत आहे.येथील कर्मचाऱ्यांकरीता बैठक व्यवस्था पुरेशी नाही .शौचालयाकरीता व्यवस्था नाही. तसेच एम .आय .डी .सी मधून अनेक प्रवासी , कामगार व विद्यार्थी शाळेत व महाविद्यालयात ये- जा करतात .त्या क्षणी एखादा प्रसंग घडला तर त्याचा जिम्मेदार कोण ,हा प्रश्न निर्माण झाला आहे .टोल नाक्यावर पत्र्याचे छत लावले आहे.ते क्षतिग्रस्त झाल्यामुळे केव्हा पडेल अशी भीती वाहन चालक व कर्मचाऱ्यांनाही वाटत आहे. टोल ला मजबूत बनविण्यासाठी कंपनीने अजून पर्यंत कोणत्याही प्रकारचे ठोस पाऊल उचलले नसल्यामुळे धोकादायक शेडच्या खालीच काम सुरू आहे.

वादळी पाऊसात टोल अक्षरशः हलायला लागतो.छतावरील पत्रे केव्हाही पडू शकतात. येथील कर्मचाऱ्यांना या धोका दायक स्थितीचा सामना करावा लागतो. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे.तसेच टोल चे कर्मचारी वर्ग यांनी टोलचे वस्त्र न वापरता वेगळया वस्त्रात काम करते.एखादी अनपेक्षित दुर्घटना होण्याच्यापूर्वी टोल नाक्याच्या छताची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी वाहन चालक करीत आहे.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.