সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, December 28, 2015

थंडी आणि दूध न मिळाल्याने चंद्रपुरातील बछड्यांचा मृत्यू

चंद्रपूर : चंद्रपुरातल्या सावली तालुक्यात वाघाच्या चार बछड्यांचा मृत्यू थंडी आणि दूध न मिळाल्याने झाल्याचं समोर आलं आहे. चारपैकी दोन बछड्यांच्या पोस्टमॉर्टेम अहवालातून हे निष्पन्न झालं आहे. त्यामुळे इतर दोन बछड्यांचा अंतही आईची ऊब आणि उपासमारीमुळे झाल्याचं म्हटलं जात आहे.
 सावलीतल्या नवेगाव मार्गावर फिरायला गेलेल्या लोकांना शनिवारी ही चार वाघांची पिल्लं मृतावस्थेत आढळून आली. याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर सुरुवातीला हद्दीवरुन वनविभाग कर्मचाऱ्यांनी हात झटकण्याचेही प्रयत्न केले. परंतु मोठा गाजावाजा करुन सुरु झालेल्या व्याघ्र मोहीमेला या घटनेने धक्का बसला आहे.
तालुक्यात झालेल्या वाघाच्या 4 बछड्यांच्या मृत्यूचं गूढ कायम आहे. वन अधिकाऱ्यांच्या मते भुकेपोटी या चारही बछड्यांचा अंत झाला आहे, तर वाघिणीची शिकार होऊन आईपासून ताटातूट झाल्यानं या पिल्लांचा मृत्यू झाल्याचा दावा प्राणीप्रेमी करत आहेत.  
मात्र या प्रकारामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या बछड्यांची आई म्हणजेच वाघिण कुठे आहे? तिची शिकार झाली का? या भागात चार बछड्यांना जन्म दिलेली वाघिण आहे, याची माहिती वनखात्याला नव्हती का?
दरम्यान या मृत्यूप्रकरणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.