चंद्रपूरच्या नगरसेवकांची अनोखी शक्कल
चंद्रपूर : चंद्रपूर महापालिकेच्या आयुक्तांवर नजर ठेवण्यासाठी नगरसेवकांनी आयुक्तांच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवला आहे. गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर महापालिकेचे आयुक्त सुधीर शंभरकर आणि पदाधिकारी यांच्यातला वाद विकोपाला गेला आहे.आयुक्त गैरहजर राहतात, फाईल्स क्लिअर होत नाहीत, आयुक्त नगरसेवकांना भेटत नाहीत, असे आरोप करण्यात येत आहेत. यावरुन सर्वसाधारण सभेत गदारोळही माजला होता. यावेळी मी गैरहजर राहतो याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे, असा प्रतिप्रश्न आयुक्तांनी नगरसेवकांना केला आहे. त्यावर उपाय म्हणून पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क आयुक्तांच्या केबिनमध्येच सीसीटीव्ही कॅमेरा बसवला आहे विशेष म्हणजे सीसीटीव्हीचा सर्व खर्च नगरसेवकांनी स्वत:च्या खिशातून केला आहे.