সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, June 06, 2013

बिबट हल्ल्यात तरुण जखमी

चंद्रपूर- चंद्रपूरात वन्य जनावरांचे हल्ले वाढले असून गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात एक तरुण जखमी झाला आहे. या जखमी यात नितेश गेडाम  (वय २५) ला जिल्हा सामा न्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.तरुणाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूरमध्ये वन्य प्राण्याचे हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची संख्या वाढली आहे. आज सकाळी पुन्हा एकदा एका बिबट्याने बल्लारशा रोडवर एका तरुणावर हल्ला केला. बेसावध असलेला त्या तरुणाने बिबट्याच्या तावडीतून कशीबशी आपली सुटका करून घेतली. सध्या या तरूणावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती खासगी वृत्तवाहिनीवरून देण्यात आली आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.