সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, June 09, 2013

अनिकेत आमटे

आलापल्ली पासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर मीरकल या गावाजवळ 'Glory of Allapalli' हे ठिकाण आहे. 12 महिने पाणी असलेला तलाव त्या ठिकाणी आहे. तसेच अतिशय उंच झाडांचे जंगल तिथे आहे. त्यात सागवाना करिता हे जंगल प्रसिद्ध आहे. प्रचंड मोठे खोडांचे घेर असलेले सागवान वृक्ष येथे बघायला मिळतात. पाणी आणि जंगल असल्याने वन्य प्राणी व पक्षी पण भरपूर प्रमाणात आढळतात. या वर्षी वन खात्याच्या सहकार्याने त्या निसर्ग सौदर्य असलेल्या व अनेक पशुपक्षांचे प्राण असलेल्या तलावाजवळ एक सिमेंटचे मंदिर बांधले. त्यामुळे प्राण्यांच्या वास्तव्याला प्रचंड धोका निर्माण झालाय. कायद्याने अशा ठिकाणी बांधकाम करायला नक्कीच बंदी असणार. त्या मंदिराचे वनखात्याच्या कार्यालयात रुपांतर झाले तरच प्राणी व जंगल वाचेल. अन्यथा कोणीतरी वाटसरू किंवा भिकारी बाबा त्या ठिकाणी येउन वास्तव्य करेल आणि नंतर लोक त्याला संत बनवतील. मग धर्मशाळा, हॉटेल, दुकाने आणि नंतर मीरकल बाबाची जत्रा सुरु व्हायला वेळ लागणार नाही. अश्या काही घटना आपल्या देशात-राज्यात नेहमीच घडतात. फेसबुक हे माध्यम मित्रांच्या-लोकांच्या संवेदना जागृत करते यात खरच समाधान वाटते. तरुणाई व देश अश्या अनेक अनुचित घटनांनी अस्वस्थ होतात याचे पण समाधान आहे. भावना व्यक्त करायला एक छान व्यासपीठ मिळाले आहे. या प्रतिक्रियांचा नक्कीच काहीतरी फायदा होईल. आजू बाजूच्या गरीब अशिक्षित आदिवासी बांधवांना जेवण देऊन मूर्तीची स्थापना केली आहे. आदिवासी बिच्चारे आहेत. त्यांना कोणीही काहीही सांगून फसवू शकत. ते लवकर विश्वास ठेवतात. अजून आदिवासी बांधवांमध्ये पर्यावरण - प्राणी - पक्षी यांच्या संवर्धना विषयी जागृती निर्माण झालेली नाही. त्यात त्यांचा दोष नाही. कायमच अर्धपोटी असलेली लोक या गोष्टींचा विचार तरी कसा करतील? पण वनखात्याने करायलाच हवा.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.