সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, June 21, 2013

आनंदवन @६२ वर्षे

चंद्रपूर-ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी उभारलेल्या आनंदवनाला शुक्रवारी ६२ वर्षे पूर्ण होत आहेत .बाबांनी उभ्या केलेल्या या सामा ‌ जिक संस्थेचीजबाबदारी आता आमटे कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीकडेआहे . त्यामुळे आनंदवन आता केवळ आश्रम नव्हेतर श्रमतीर्थ ठरत आहे . 
महारोगी सेवा समितीची स्थापना झाल्यानंतर राज्यसरकारने वरोराजवळील ५० एकर जागा आनंदवनआश्रमासाठी दिली . दत्तपूरच्या कुष्ठधामातूनकुष्ठरोगांच्या सेवेच्या कार्याला सुरुवात झाली .साधनाताई आमटे , डॉ . विकास आमटे , डॉ .प्रकाश यांच्यासह बाबांनी या कामाला सुरुवात केली .२१ जून १९५१ रोजी आचार्य विनोबा भावे तेलंगणाकडेभूदान पदयात्रेसाठी रवाना झालेत . त्याआधीआनंदवनाचे उद्घाटन आचार्यांच्या हस्ते पार पडले . पूर्वी काटेरी वनात असलेली ही संस्था आताकुष्ठरूग्णांसाठी कार्य करणारे वटवृक्ष ठरली आहे . 
बाबा आमटे यांच्या कार्यातून आम्हाला प्रेरणा मिळत असते . बाबांनी श्रमगीताच लिहिली आणिप्रत्यक्षात कृतीत आणली . आनंदवनसाठी कार्य करतानाचा अनुभव वेगळाच होता , असे ज्येष्ठकार्यकर्ते तथा महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू यांनी ' मटा ' शी बोलताना सांगितले . ' तुमच्यातील ताकद समाजाला दाखवा ', असा संदेश बाबांनी कुष्ठरोगी , अपंगांना दिल्याचेही कडूयांनी सांगितले.  
पूर्वी अत्यंत छोट्या वास्तुत कार्यरत असलेल्या आनंदवनाला आता पक्की इमारत , वीज जोडणी ,बँक , पोस् ‍ ट ऑफीस , शाळा , कॉलेज , दवाखाने अशा विस्ताराचर साथ लाभली आहे .आतापर्यंत आनंदवनातून २४ लाख विविध पातळीवरील लोकांना सहाय्य मिळाले आहे . 
केवळ कुष्ठरुग्णांपुरते आनंदवन मर्यादीत नाही . अंध , अपंग , मूकबधीर , महिलांच्या कल्याणाचेकार्यही येथे केले जाते . 

आनंदवनाच्या ध्येय , दृष्टी व उद्द ‌ िष्टांना नवा आयाम देण्याची गरज आहे . कुठल्याही नैतिकमूल्यांशी तडजोड न करता भविष्यात आनंदवनाचे कार्य आणखी व्यापक केले जाईल . 
       कौस्तुभ आमटे , सहाय्यक सचिव , महारोगी सेवा समिती 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.