সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, June 10, 2013

संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला

वर्धा- कारंजा (घा.) तालुक्यातील जसापूर (किनाळा) येथील चार जण तळेगाव (श्या.) येथे शनिवारी रात्री ७ वाजता जेवण करायला गेले होते. त्यापैकी तिघेजण रात्री उशिरा घरी सुखरुप पोहचले. एकाचा आज पहाटे ४ वाजताच्या सुमारास नजीकच्या राष्ट्रीय महामार्ग ६ वर गुरुदेव सॉ मिलजवळ संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रमोद वामनराव खोडे (५0) रा. जसापूर (किनाळा) असे मृतकाचे नाव आहे. आपल्या वडिलाची सोबतच्या तिघांनी हत्या केल्याचा आरोप मृतकाच्या मुलाने केला आहे. पोलीस सूत्रानुसार, शनिवारी रात्री प्रमोद खोडे हा शरद खोडे (४८) या लहान भावाच्या वाहनाने चुलतभाऊ विजय खोडे (४0) व प्रमोदने शेती ठेक्याने दिली ते विलास गवारी (४0) यांच्यासोबत जसापूर येथून तळेगावला जेवण करायला गेला होता. रात्री उशिरा प्रमोदशिवाय अन्य तिघेही घरी पोहचले. अशातच आज पहाटे राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात मृतदेह पडून असल्याची माहिती तळेगाव पोलीस चौकीला मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असता मृतकाच्या खिशातील कृषी केंद्राच्या बिलावरून सदर इसम प्रमोद खोडे असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर कुटुंबीयांनी घटनास्थळ गाठून ओळख पटविली. वास्तविक, प्रमोद हा तिघांसमवेत जेवण करायला गेला होता. परतताना तो त्यांच्यासोबतच घरी का परतला नाही. तो परतला नाही याची माहिती सोबतचा त्याचा भाऊ व चुलत भाऊ व अन्य एकाने त्याच्या कुटुंबीयांपासून दडवून का ठेवली. यावरून प्रमोदच्या मृत्यूबाबत संशय बळावला आहे. प्रमोदची हत्या करून मृतदेह राष्ट्रीय महामार्गावर टाकून अपघाताचा बनाव केला असावा, असाही संशय एकंदर घटनाक्रमावरून लक्षात येत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या प्रकरणी तळेगाव चौकीत र्मग दाखल केला आहे. पोलीस सदर प्रकरणाचा तपास करून रहस्यावरून पडदा हटविते वा अपघाताचे स्वरुप देते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.(वार्ताहर) ■ याप्रकरणी कारंजा (घा.) पोलिसांनी प्रमोदसोबत जेवण करायला गेलेले शरद खोडे, विजय खोडे व विलास गवारी या तिघांना रात्रीला अटक केली. याप्रकरणी आर्वी पोलिसांची टाळाटाळ सुरू असल्याने प्रकरण पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहचले. यानंतर अटकेची कारवाई करण्यात आल्याचे समजते. तिघांनाही अटक पित्याची हत्याच- मुलगा स्वप्निलची तक्रार ■ प्रमोद खोडे यांची सोबत गेलेल्यांनीच हत्या केली, अशी तक्रार देण्यासाठी मुलगा स्वप्निल आर्वी पोलीस ठाण्यात गेला होता. मात्र पोलिसांनी तळेगाव पोलिसांकडे बोट दाखवून तिकडे पाठविले. तळेगाव पोलिसांनीही टाळाटाळ केली. नंतर नातेवाईक व नागरिक संतप्त झाल्याने अखेर पोलिसांनी लेखी तक्रार स्वीकारली. 



শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.