সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, June 23, 2013

महिला व बालकल्याण अधिकारी अद्यापही बेपत्ता

चंद्रपूरच्या यात्रेकरूंपैकी १५ जण परतीच्या मार्गावर
 पौनीकरांचे सहकारी यात्रेकरूही बेपत्ता

चंद्रपूर : उत्तराखंड राज्यातील केदारनाथ येथे यात्रेसाठी गेलेल्या जिल्ह्यातील एकूण १६ यात्रेकरूंपैकी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी स्मिता पौनीकर यांचा अद्यापही ठावठिकाणा लागलेला नाही. याशिवाय त्यांच्या सोबत गेलेले नागपूर येथील अन्य पाचजण संपर्काबाहेर आहेत. त्या १८ जून रोजी शेवटच्या आढळल्या होत्या, अशी प्रशासनाकडे माहिती आहे.


यात्रेला गेलेल्या जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी स्मिता पौनीकर यांचा अद्यापही ठावठिकाणा लागलेला नाही. प्रशासनाने केलेल्या मोबाईल टॉवर ट्रेसनुसार त्यांचा अखेरचा संपर्क सोनप्रयाग येथे झाला. १८ जून रोजी त्या जंगमच्चेटी येथे चहा घेताना दिसून आल्याची माहिती प्रशासनाकडे आहे. पौनीकर यांच्यासोबत गोंदिया येथील एकात्मिक बालप्रकल्प अधिकारी हेमलता बावणकरविनोद खुरसमकरआरती खुरसमकरप्रदीप गुल्हाणेक्रिष्णा गुल्हानेस्वरुपा गुल्हाने यांचाही संपर्कही झाला नाही.
जिल्ह्यातील एकूण १६ भाविक ११ जूनपासून केदारनाथ येथे नागपूरमार्गे यात्रेला गेले. १८ पासून मुसळधार पावसानंतर महाप्रलय आल्यानंतर भाविकांचा संपर्क तुटला. या भाविकांना शोधण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्यानंतर काहींचा संपर्क झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडे असलेल्या नोंदीनुसार ११ जून रोजी रेल्वेने यात्रेला गेलेले करुणा शोभावत (वय ५२), सुरेंद्र शोभावत (वय ५४), मनाली शोभावत (वय २३) या २३ रोजी ङ्करिदाबाद येथे थांबले आहेत. पियुष वैष्णव (वय २४) हा २३ रोजी सायंकाळपर्यंत चंद्रपूरला पोचणार होता. कमल अटल (वय ५१) व अक्षय अटल (वय ४५) हे वैष्णव देवी थांबलेले असून, परतीच्या मार्गावर होते. रमेश ठवकर आणि त्यांची पत्नी २० जून रोजी नागपूर येथे पोचले. हेमंत बुटन हे शनिवारी ब्रदीनाथ येथे होते. त्यांच्यासोबत कविता हेमंत बुटन (३८), खुशबू हेमंत बुटन (वय १५), खूशी हेमंत बुटन (वय १२), गणेश हेमंत बुटन (वय ८) आणि धनराज सोनी (वय ५० ) हेसुद्धा असून, रविवारी (ता. २३) त्यांना हेलीकॅप्टरद्वारे जोशीमठ येथे आणण्यात आले असून, ते सोमवारी हरिद्वारमार्गे चंद्रपूरला पोचत आहेत.
-------------------


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.