সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, May 15, 2013

गाडे यांची तहसीलदार पदी निवड


चंद्रपूर,दि. 15- चंद्रपूर जिल्हा कोषागार कार्यालयात अप्पर कोषागार अधिकारी म्हणून कार्यरत असलेले हरिश्चंद्र गाडे यांनी नुकतीच तहसीलदार पदाची परीक्षा उत्तीर्ण केली असून त्यांची लवकरच तहसीलदार पदावर नियुक्ती होणार आहे. मुळ नांदेड जिल्हयातील असलेले हरिश्चंद्र गाडे यांनी 2011 मध्ये कोषागार कार्यालयाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. स्वामी रामानंदतिर्थ विद्यापीठातून राज्यशास्त्र या विषयात पदवी त्यानी मिळविली आहे. शिक्षक या पदापासून त्यांनी नौकरीची सुरुवात केली असून 2012 राज्यसेवा परिक्षेत त्यांनी तहसीलदार पदाची परिक्षा नुकतीच उत्तीर्ण केली आहे. नांदेड जिल्हयातील सामान्य कुटुंबातील गाडे यांनी मेहनत व परिश्रमाच्या भरवशावर हे यश संपादन केले आहे. तहसीलदार पदाची परिक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल गाडे यांचे जिल्हा कोषागार अधिकारी एम.एस. वाघमारे व अधिकारी, कर्मचा-यांनी अभिनंदन केले आहे. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.