সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, May 30, 2013

बारावीचा आज निकाल

पुणे - कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा संप, उशिरा सुरू झालेले उत्तरपत्रिका तपासणीचे काम, अशी आव्हाने पेलत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल वेळेत लावण्याचा "मुहूर्त' साधला आहे. गुरुवारी (ता. 30) सकाळी 11 वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर हा निकाल जाहीर करण्यात येईल.
सहा जून रोजी कनिष्ठ महाविद्यालयांना तपशीलवार गुणांचे अभिलेख आणि विद्यार्थ्यांचे गुणपत्रक देण्यात येईल. याच दिवशी दुपारी तीनपासून विद्यार्थ्यांना त्यांचे गुणपत्रक वितरित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करायची असेल, तर मूळ गुणपत्रिका मिळाल्यानंतर 17 जूनपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करता येतील. इंटरनेटवरील गुणपत्रिकेच्या आधारे गुणपडताळणी करता येणार नाही, असे मंडळाचे विभागीय सचिव अनिल गुंजाळ यांनी कळविले आहे.

निकालानंतर विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास त्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत (झेरॉक्‍स) देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यासाठी 19 जूनपर्यंत अर्ज करावेत. पुनर्मूल्यांकनासाठी छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांत विभागीय मंडळाकडे अर्ज करावेत. परीक्षेत सर्व विषयांत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारणेसाठी ऑक्‍टोबर 2013 आणि मार्च 2014 अशा दोन संधी उपलब्ध करून देण्यात येतील, असे गुंजाळ यांनी सांगितले.

मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव म्हणाले, ""कनिष्ठ महाविद्यालयांच्या 20 दिवसांच्या बहिष्कार आंदोलनामुळे उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात अडथळा निर्माण झाला होता; परंतु नंतर सर्वच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी वेळेत निकाल पूर्ण होण्यासाठी कष्ट घेतले. आंदोलन झाले नसते, तर किमान 10 दिवस आधी निकाल जाहीर करता आला असता. तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी निकालास उशीर झालेला नाही.''

येथे पाहा निकाल
http://mahresult.nic.in
www.msbshse.ac.in
www.mh-hsc.ac.in
www.hscresult.mkcl.org

फक्त एक एसएमएस
मोबाईलच्या मेसेज विंडोमध्ये टाइप करा MHHSC (स्पेस) तुमचा आसन क्रमांक आणि पाठवा 57766 या क्रमांकावर.

मदत हवी? फोन करा
020-25536712 / 020-25536783

विद्यार्थ्यांनो, घाबरू नका...
कमी गुण मिळालेल्या व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. सकाळी 10 ते सायंकाळी साडेपाच या वेळेत ते उपलब्ध असतील.
शरदचंद्र बोटेकर : 9822991391, रमेश पाटील : 9822334101, टी. एम. बांगर : 9763557131, एस. एल. कानडे : 9028027353, सुधीर खाडे : 9420542654.

अशी असेल प्रवेशप्रक्रिया
निकाल जाहीर झाल्यानंतर 15 ते 20 जूनपर्यंत बीए, बीकॉम आणि बीएस्सी या अभ्यासक्रमांची महाविद्यालये सुरू होतात. त्यापूर्वी प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयांकडून अर्ज विक्री. सहा जून रोजी निकालपत्र मिळणार असल्याने त्या दिवसापासून प्रवेशप्रक्रिया सुरू होईल.
प्रथम वर्ष प्रवेशासाठी अर्ज विक्री सुरू झाल्यानंतर दोन-तीन दिवसांत महाविद्यालयांना जागांच्या उपलब्धतेनुसार गुणांचा "कटऑफ' जाहीर करावा लागतो.
विद्यालयात उपलब्ध जागांपेक्षा अर्ज जास्त आले, तर गुणवत्ता यादी जाहीर करावी लागते. प्रत्येक महाविद्यालयास त्यानुसारच प्रवेश द्यावे लागतात.
प्रथम वर्षासाठी व्यवस्थापन कोटा नसतो. उपलब्ध जागांची खुला आणि आरक्षित गट यांच्यात विभागणी करावी लागते. त्या नियमांच्या आधारे प्रवेश द्यावे लागतात.
पहिली गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यासाठी दोन-तीन दिवसांचा कालावधी दिला जातो. दाखल अर्जांची संख्या कमी असेल, तर दुसरी गुणवत्ता यादी जाहीर केली जाते. महाविद्यालयांच्या सर्व जागांवर प्रवेश पूर्ण होईपर्यंत गुणवत्ता यादी तयार करावी लागते.
एखाद्या संस्थेचे अकरावीपासून पदवीपर्यंत महाविद्यालय असेल, तर बारावीत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्राधान्याने त्याच महाविद्यालयात प्रवेश देणे बंधनकारक असते. त्यासाठी गुणवत्ता यादीची गरज नसते. उर्वरित जागा मात्र गुणवत्ता यादीनुसार भराव्या लागतात.

प्रवेशासाठी कागदपत्रे
प्रवेशाच्या प्राथमिक प्रक्रियेसाठी केवळ बारावीच्या निकालपत्राची छायांकित प्रत आवश्‍यक. प्रवेश निश्‍चित झाल्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला बंधनकारक.
आरक्षित जागेवर प्रवेश घ्यायचा असेल, तर बारावीच्या निकालपत्राची छायांकित प्रत आणि जातीचा दाखला आवश्‍यक.

बारावीचे गुणपत्रक मिळाल्यानंतर प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रिया सुरू होईल. सर्व शाखांच्या प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम आता बदललेला आहे. त्याची रचना करताना आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम विचारात घेतले आहेत. याद्वारे जागतिक स्तरावरील श्रेयांक मूल्यमापन पद्धतीशी सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी त्याचा चांगला उपयोग होईल.
- व्ही. बी. गायकवाड,  संचालक, विद्यापीठ आणि महाविद्यालये विकास मंडळ

प्रवेश अर्ज भरताना जवळ ठेवा
अर्ज भरायला जाताना गुणपत्रिका, जातीचा दाखला, आधार कार्ड आणि घराच्या पत्त्याचा पुरावा.
पासपोर्ट आकाराचा फोटो, डिंक, कागदपत्रे जोडण्यासाठी स्टेपलर.
इतर क्षेत्रांमध्ये मिळविलेल्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती बरोबर ठेवा.
प्रवेश अर्ज काळजीपूर्वक भरा
अर्ज भरताना गोंधळ होत असल्यास महाविद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.
नाव, पत्ता, ई-मेल, नागरिकत्व, जन्मतारीख, जन्मस्थळ अचूक लिहा.
इंग्रजीमध्ये अर्ज भरल्यास तो कॅपिटल लेटरमध्ये भरावा.
सुरवातीला अर्जाच्या झेरॉक्‍सवर माहिती भरा, त्यानंतर मूळ अर्जात ती माहिती भरा.

महत्त्वाची संकेतस्थळे
तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन.
(अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माण शास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट आदी) www.dte.org.in
वैद्यकीय शिक्षणासंबंधी : वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, महाराष्ट्र शासन www.dmer.org
औद्योगिक प्रशिक्षणासाठी : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासनwww.dvet.gov.in
पारंपरिक पदवी शिक्षण, पुणे विद्यापीठ www.unipune.ac.in
बीटेक पदवी : भारतीय प्रौद्योगिक संस्था (आयआयटी), मुंबई www.iitb.ac.in
केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) www.upsc.gov.in
राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) www.mpsc.gov.in

करिअरसाठी संधीच संधी...
एमबीबीएस
कालावधी - पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, एनईईटी (खासगीसाठी असोसिएट सीईटी)

बीएएमएस
कालावधी - पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, एनईईटी (खासगीसाठी असोसिएट सीईटी)

बीएचएमएस
कालावधी - पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, एनईईटी (खासगीसाठी असोसिएट सीईटी)

बीडीएस
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, एनईईटी (खासगीसाठी असोसिएट सीईटी)

बीएस्सी इन नर्सिंग
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, एनईईटी (खासगीसाठी असोसिएट सीईटी)

बीव्हीएससी ऍण्ड एएच (पशुवैद्यकीय)
कालावधी - पाच वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, एनईईटी

डीफार्म
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र

बीफार्म
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, एमटी-सीईटी

बीई
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, जेईई, एमटी-सीईटी

बीटेक
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, जेईई/एमटी-सीईटी
महाराष्ट्रात एकूण अभियांत्रिकीच्या 70 शाखा आहेत. बारावी व जेईई/एमटी-सीईटी यांच्या गुणांवर प्रवेश.

बीई (कॉम्प्युटर/आयटी)
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, जेईई/एमटी-सीईटी

बीएस्सी (कॉम्प्युटर सायन्स)
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र (भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र)

बीसीए (बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन)
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश - कोणत्याही शाखेतून बारावी शास्त्र, महाविद्यालय स्तरावर प्रवेश परीक्षा
संधी : संगणक उद्योग, संगणक प्रणाली क्षेत्रात
शिक्षण - बीआर्च
कालावधी - पाच वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, एमएच-सीईटी एआर (खासगीसाठी एनएटीए-नाटा)

डॉक्‍टर
कालावधी - साडेपाच वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, एनईईटी

एनडीए
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, एनडीए प्रवेश परीक्षा व एसएसबी मुलाखत
संधी : नौदल, वायू दल आणि भूदल

सीएमई (कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग)
कालावधी - पाच वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, एसएसबी मुलाखत

नेव्हल इंजिनिअरिंग
कालावधी - पाच वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, एसएसबी मुलाखत

शिक्षण - बीएस्सी
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, प्रवेश थेट

शिक्षण - बीएस्सी (ऍग्री)
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र

शिक्षण - बीए
कालावधी - तीन वर्षे
पात्रता : बारावी
संधी - एमबीए, पत्रकारिता, शिक्षण, ग्रंथालय शास्त्र, ललित कला, बॅंकिंग, विमा, रेल्वे.

शिक्षण - बीकॉम
कालावधी - तीन वर्षे
पात्रता : बारावी
संधी - आयसीडब्ल्यूए, सीए, सीएस

शिक्षण - बीएसएल (विधी)
कालावधी - पाच वर्षे
पात्रता : कोणत्याही शाखेतून बारावी
संधी - विधी व्यवसाय, विधी सल्लागार, न्याय सेवा

डीटीएड
कालावधी - दोन वर्षे
प्रवेश - कोणत्याही शाखेतून बारावी

बीबीए, बीसीए, बीबीएम
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश - कोणत्याही शाखेतून बारावी, महाविद्यालय स्तरावर प्रवेश परीक्षा

हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट सीईटी

रोजगाराभिमुख अभ्यासक्रम
डिप्लोमा इन सरफेस कोटिंग टेक्‍नॉलॉजी
डिप्लोमा इन रबर टेक्‍नॉलॉजी
कालावधी - तीन वर्षे
पात्रता - बारावी (विज्ञान)

डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट
कालावधी - तीन वर्षे
पात्रता - कोणत्याही शाखेतून बारावी

ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदविका
कालावधी - तीन वर्षे

ड्राफ्टमन (सिव्हिल/मॅकेनिकल)
कालावधी - दोन वर्षे

इलक्‍ट्रिशियन
कालावधी - दोन वर्षे

रेडिओ, टीव्ही मॅकेनिक
कालावधी - दोन वर्षे

रेफ्रिजरेशन, एसी मेकॅनिक
कालावधी - एक वर्ष

कॉम्प्युटर हार्डवेअर
कालावधी - एक वर्ष

टेक्‍स्टाईल डिझाईनिंग
कालावधी - एक वर्ष

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.