সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, May 17, 2013

बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

चंद्रपूर शहराच्या बाबानगर परिसरात ६० वर्षीय इसम ठार -
बिबट हल्ला मालिकेतील अकरावा बळी
चंद्रपूर,  दि.१७ (प्रतिनिधी) :
 चंद्रपूर शहरातील बाबानगर भागात आज संध्याकाळी  एक मृतदेह आढळून आला. या इसमावर या परिसरात नव्यानेच आढळणा-या बिबट्याने हल्ला केल्यावर त्याचा  मृत्यू झाल्याचे बोलले  जात आहे. मृतकाचे नाव चरणदास लाकडे-६०  असे आहे.  या घटनेने परिसरात घबराट पसरली असून घटना जंगल परिसराला लागून असलेल्या झोपडपट्टी परिसरात घडल्याने नागरिक धास्तावले आहेत.
 गेले काही महिने हा बिबट्या या परिसरातील नागरिकांना दर्शन देत होता. चंद्रपूर शहराच्या सीमावर्ती भागात बाबानगर परिसर जंगलाने वेढला आहे. या भागात पाणी व छोटी जनावरे मोठ्या संख्येने आहेत. म्हणूनच बिबट्याचा या भागातील वावरही वाढला आहे.  या भागात घरी एकटेच राहणारे चरणदास लाकडे रात्री नेहमीप्रमाणे बाहेर खाटेवर झोपले होते मात्र रात्री अचानक बिबट्याने त्यांना खाटेवरून ओढून नेत लगतच्या झुडपी जंगलात त्याना ठार केले. हि घटना कुणाच्या लक्षात आली नाही. रात्री या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरल्यावर नागरिकांनी परिसराची पाहणी केल्यावर नागरिकांना हा प्रकार लक्षात आला. लगेच हा  कुजू लागलेला मृतदेह नेण्याची तयारी लोकानी  केली मात्र वनविभाग वा पोलिस यासह स्वयंसेवी संस्था यापैकी कुणीही शववाहीकेची मदत केली नाही. अखेर स्थानिकांना  एका साध्या  तीन चाकी रिक्षावर हा मृतदेह सुमारे ४ किमी लांबवर जिल्हा सामान्य रुग्णालयात आणावा लागला. या इसमाच्या शरीराचे काही भाग बिबट्याने खाल्ल्याचे दिसत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोचून पंचनामा केला. यात एखाद्या वन्यजीवानेचरणदासला काही दूरवर ओढत नेल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. शव वाहिका न मिळाल्याने चरणदासचा मृतदेह रिक्षावर आणावा लागल्याचे पोलिसांनी मान्य केले मात्र परिसरात कुणीही यासाठी  मदत केली नसल्याने हि नामुष्की ओढविल्याचे स्पष्ट झाले.   घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी अखेरपर्यंत पोचलेच नाहीत. आधी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा बफर क्षेत्रात होणा-या  बिबट्याच्या हल्ल्यांनी वनविभाग हादरला होता. आता चंद्रपूर शहराच्या सीमेवर होणा-या हल्ल्यांनी वनविभाग गोंधळून गेलाय. या संकटातून वनविभागाला मार्ग सापडेल का आणि केव्हा. तोवर किती बळी जातील असा प्रश्न चंद्रपूरकराना पडला आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.