काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, January 04, 2015

"हातमाग' बंद  सिर्सीला हवाय रोजगार

"हातमाग' बंद सिर्सीला हवाय रोजगार

"हातमाग' बंद
सिर्सीला हवाय रोजगार

श्रीमंत सिर्सीला विकासाची प्रतीक्षा
जिनिंग, प्रेसिंग व हातमाग व्यवसाय सर्व दूर प्रसिद्ध असलेले सिर्सी गाव. मात्र, हे उद्योग आता बंद झाल्याने गावातील नागरिकांचा पारंपरिक व्यवसाय हिरावला. त्यामुळे बेरोजगारीची फौज निर्माण झाली आहे. उमरेड तालुक्‍यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत अशी ओळख आता पुसली गेली आहे. प्रगतिशील शेतकरी संघटनेने 1989 मध्ये गावात जिनिंग-प्रेसिंग मिल व हातमाग व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. परंतु, कालांतराने हे दोन्ही व्यवसाय बंद पडले. यामुळे गावात मोठ्या संख्येत असलेला भूमिहीन कोष्टी समाज बेरोजगार झाला. त्यांच्यासमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. उच्च शिक्षणाच्या सोयीसाठी गावात कला-वाणिज्य महाविद्यालयाची निर्मिती करण्यात आली. परंतु, बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठी हातमाग व्यवसायाला नवसंजीवनी देण्यासाठी कुणीही पुढाकार घेतला नाही, हीच शोकांतिका आहे.
मृत्यूचे प्रवेशद्वार कोंढाळी

मृत्यूचे प्रवेशद्वार कोंढाळी

औद्योगिकीकरण झाले; आता हवाय स्थानिक विकास

नागपूरपासून अवघ्या 48 किलोमीटरवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर कोंढाळी गाव आहे. औद्योगिकदृष्ट्या कोंढाळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या रस्त्याने मोठ्या प्रमाणात जडवाहतूक चालते. दिवसेंदिवस महामार्गालगत दोन्ही बाजूंनी वाढते अतिक्रमण तसेच जडवाहतुकीमुळे अपघातांत वाढ झाली आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रवेशद्वार, अशी नवी ओळख गावाला मिळाली आहे. वाढत्या औद्योगिकीकरणासोबत स्थानिकांना सुविधा न मिळाल्याने त्यांच्यात प्रशासनाप्रति नाराजी आहे. कोंढाळीत सर्वधर्मीयांचे वास्तव्य आहे. त्यामुळे गावाला सर्वधर्मसमभावाची ओळख प्राप्त झाली आहे.
पंचक्रोशीत मांढळ

पंचक्रोशीत मांढळ

पूर्वी मांढळचे नाव मातंगपूर असल्याचे इतिहासाचे जाणकार सांगतात. कालांतराने मातंगपूर शब्दाचा अपभ्रंश होऊन मांढळ हे नाव पडले. पूर्वी येथे कुस्त्यांची आमदंगल मोठ्या स्वरूपात होत असे. तान्ह्या पोळ्याचीही येथे परंपरा होती. आमनदीमुळे शिंगाडा व मासेमारीचा व्यवसाय येथे मोठ्या प्रमाणात चालत असे. काळाच्या ओघात हे सारे कमी झाले असले तरी पंचक्रोशीत मांढळ गावाची वेगळी ओळख आहे.

बंद कंपन्यांचे व्हावे पुनर्ज्जिवन

बंद कंपन्यांचे व्हावे पुनर्ज्जिवन

बारमाही नदी, तरीही दुषित पाणी
कन्हान हे गाव नागपूर शहरापासून सुमारे 22 कि.मी.वर जबलपूर मार्गावर आहे. पचमढीपासून वाहणाऱ्या कन्हान नदीशेजारी हे गाव वसलेले असल्यामुळे "कन्हान' हे नाव पडले. नागपूर-कोलकाता रेल्वेमार्ग येथून जातो. 1970-75 च्या दशकात औद्योगिक नगर म्हणून उदयास आले. येथील औद्योगिकीकरण धोरणामुळे राज्यात सर्वात मोठी महसूल मिळवून देणारी ग्रामपंचायत म्हणून कन्हानने नावलौकिक मिळविला. 1970 च्या दशकात परिसरातील एक-दोन नव्हे तर जवळपास 10 कंपन्या स्थापित झाल्या. कंपनीच्या परिसरात चार ते पाच किलोमीटरपर्यंत रेल्वे मालधक्‍का, रेल्वे जाळे असणारी खंडेलवार ट्यूब मिल ही त्याकाळी राज्यात पहिली कंपनी होती. जवळपास 900 एकर जागेत स्थापित उद्योगांमध्ये हजार मजूर कार्यरत होते. परंतु 1995 नंतर येथील उद्योगांना उतरती कळा आली. बऱ्याच कंपन्यांमधील कामगार युनियनने कामगारांना विविध प्रलोभने दाखवून संप घडवून आणला. याचा थेट परिणाम उत्पादनावर झाला. त्यामुळे 2000 पासून हळूहळू कंपन्यांना टाळे लागत गेले. आज येथील सर्वच कंपन्या बंद झाल्या असून, केवळ ढाचे उरले आहेत. अचानक कंपन्या बंद झाल्यामुळे कामगारांची देणी थकली आहेत.
.............

पचखेडी

पचखेडी

पचखेडी

ब्रिटिशकाळात पचखेडीची ओळख बेलडोंगरी अशी होती. पूर्णत: गवळी समाजाची वस्ती असलेले हे गाव आमनदीच्या काठावर वसले होते. नदीकाठावरील भाग अचानक भूस्खलन होऊन खचल्याने संपूर्ण गाव दबले, असे इतिहासतज्ज्ञ सांगतात. 20 वर्षांपूर्वी येथे झालेल्या उत्खननात सोन्याची अंगठी, प्राचीन मातीच्या वस्तू आढळल्या. त्यामुळे ऐतिहासिक कथेला दुजोरा मिळतो. कालांतराने पुन्हा गाव वसले. परसोडी, दहेगाव, खैरलांजी, मदनापूर व केसोरी अशी पाच गावे जवळजवळ होती. त्यामुळे या गावाला "पचखेडी' असे नाव पडल्याचे गावकरी सांगतात. परसोडी राजा या गावातील शेतात भोसले राजे यायचे. नदीवर लहान मुलांसोबत खेळायचे. खाचरावर बसून मुलांना ओढायला लावायचे. सखाराम डहारे या तरुणाने एकट्याने महाराजांचा खाचर ओढून शाबासकी मिळविली होती. त्यामुळे त्याला नागपूर येथील राजवाड्यात गौरविण्यात आले, अशा अनेक आठवणी आहेत. सखराम डहारे यांच्या मुलाने सखास्मृती विद्यालय सुरू करून शैक्षणिक सुविधा निर्माण करून दिली. गोसेखुर्द प्रकल्पातील सोनेगाव व जीवनापूर ही गावे वसल्यामुळे पचखेडी गाव कुही तालुक्‍यातील मोठ्या गावांच्या रांगेत आहेत.

ब्रिटिशकालीन खापा  स्वातंत्र्यानंतरही उपेक्षित

ब्रिटिशकालीन खापा स्वातंत्र्यानंतरही उपेक्षित


  • ब्रिटिशकालीन खापा 
  • स्वातंत्र्यानंतरही उपेक्षित 

खापा शहर कन्हान नदीच्या काठावर वसलेले आहे. नदीकाठावर एकीकडे माउली माता, तर दुसरीकडे प्रसिद्ध लष्करशहा बाबांचा दर्गा आहे. या स्थळी संत पतीराम महाराज, राघवानंद महाराज, लष्करशहा बाबा, कृष्णाजी महाराज आदी संत-महात्मे जन्मले आहेत. त्यामुळे ही संतांची भूमी आहे. कृष्णाजी महाराज व त्यांच्या पत्नीने जिवंत समाधी घेतली होती. एकेकाळी जरीच्या साड्या आणि चोळीसाठी हे गाव प्रसिद्ध होते. हातमागावर चालणारा विणकर व्यवसाय आता इतिहासजमा झाला. त्यावर उपजीविका साधणारा हलबा समाज अन्य व्यवसायांत गुंतला आहे. ब्रिटिश काळात येथील शेकडो तरुणांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात उडी घेतली होती. अनेकजण शहीदही झाले. येथील नगर परिषद ब्रिटिशकालीन असून, तिची स्थापना 1867 मध्ये झाली. अनेक लोकप्रतिनिधींनी नगरविकासासाठी केवळ थापाच मारल्याने हे शहर स्वातंत्र्यानंतरही उपेक्षित आहेत.

Friday, January 02, 2015

‘नायलाॅन’ मांजाचा वापर टाळा

‘नायलाॅन’ मांजाचा वापर टाळा

पक्षी आणि मनुष्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी नायलाॅन मांजावर बंदी आणण्याची गरज - बंडु धोतरे

नायलाॅन धागा अत्यंत मजबुत असल्याने हे सर्व प्रकार होतात. पतंगत्सोवमुळे असंख्य पक्षी दरवर्षी मृत्युमुखी पडत असतात. जिकडे-तिकडे या धाग्यांचे जाळे झाडावर व तारांवर लटकलेले असतात. याबाबत सर्वच नागरीकांनी जागृतपणे या नायलाॅन मांजाचा वापर टाळणे तसेच आपल्या मुलांना या मांजा वापरापासुन परावृत्त करणे तसेच सर्वच शाळकरी विदयाथ्र्यामध्ये सुध्दा शिक्षकांनी याबाबत जागृती करणे गरजेचे आहे. सर्व बाल-गोपाल व चंद्रपूरकरांनी पतंगोत्सवाकरिता चायनिज-नायलाॅन मांजाचा वापर न करण्याचे आवाहन इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष तथा मानद वन्यजीव रक्षक बंडु धोतरे यांनी केले आहे.

Thursday, January 01, 2015

मुधोली येथे वाघिणीचा मृत्यू

मुधोली येथे वाघिणीचा मृत्यू


चंद्रपूर, - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्रातील मुधोली गावानजीक पूर्णवाढ झालेल्या एका वाघिणीचा संशयास्पदस्थितीत मृत्यू उघडकीस आला. गावाकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यालगत वाघिणीचा मृतदेह मिळाल्याने वनखात्यात खळबळ उडाली आहे. दोन वाघांची झुंज, चार चाकी वाहनाची धडक की विषप्रयोग यापैकी कशाने तरी हा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी विसेरा व तिच्या शरीराचे अवयव हैद्राबाद व बंगलोर येथील प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत.
युवा शेतकर्‍याची आत्महत्या

युवा शेतकर्‍याची आत्महत्या

वरोरा - तालुक्यातील युवा शेतकर्‍याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १ जानेवारीला घडली.  शेगाव पोलिस ठाणे हद्दीत येणार्‍या आबमक्ता (वडगाव) येथील युवा शेतकरी मोरेश्‍वर निमदेव ठावरी (२८) याच्याकडे पाच एकर शेती होती. वडील म्हातारे असल्याने शेतीचे कामकाज मोरेश्‍वर सांभाळत होता. मागील तीन वर्षांपासून सतत शेतात नापिकी असल्याने मोरेश्‍वर विवंचनेत होता, अशी माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली. शेतातील झाडाला मोरेश्‍वरने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी १० वाजता त्याचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळल्याने शेगाव पोलिसात कळविण्यात आले. मृतकाचा विवाह यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील बोर्डा घोन्सा येथे नुकताच जुळला होता. मृतकावर बँक व सेवा सहकारी सोसायटीचे कर्ज असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. शेगाव पोलिसांनी शवविच्छेदनाकरिता मृतदेह वरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणला. याप्रकरणी शेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Sunday, December 28, 2014

आंबेडकरी साहित्य संमेलन घुग्‍घुस येथे

आंबेडकरी साहित्य संमेलन घुग्‍घुस येथे

घुग्‍घुस - अ.भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे बारावे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन चंद्रपूर ‌जिल्ह्यातील घुग्‍घुस येथे १६ ते १८ जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आले आहे. प्रसिद्ध आंबेडकरी नाटककार आणि लेखक प्रा. अविनाश डोळस हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्‍थानी राहणार आहेत. हिंदीचे प्रसिद्ध आंबेडकरी लेखक मोहनदास नैमिशराय हे या संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते नरेन गेडाम यांची उपस्थिती राहणार आहे. संमेलनादरम्यान तीन परिसंवाद, एक विधान चर्चा, अनुभव कथन, कविसंमेलन, पथनाट्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार अहेत.

Tuesday, December 23, 2014

बेरोजगारीला कंटाळून तरुणीची आत्महत्या

बेरोजगारीला कंटाळून तरुणीची आत्महत्या

 नागपूर : सुशिक्षित असूनही रोजगार मिळत नसल्याच्या कारणाने तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. ज्योती विजय गायकवाड (वय 25) असे मृत तरुणीचे नाव आहे.
दत्तवाडी येथील गजानन मंदिराजवळील समर्थ गजानन सोसायटीत राहणारी ज्योतीने एम.कॉमचे शिक्षण घेतले होते. ती पहिल्या माळ्यावरील खोलीत नेहमीप्रमाणे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायची. मंगळवारी (ता. 23) दुपारी जेवण करून नेहमीप्रमाणे अभ्यासाला गेली. आत्महत्येपूर्वी तिने एका कागदावर "आई, बाबा, ताई मला माफ करा. मी शिकूनही अजून मला चांगला जॉब मिळाला नाही. त्यामुळे मी स्वत: आत्महत्या करीत आहे. यासाठी कुणीही जबाबदार नाही.' असे लिहून ठेवले होते. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पंचनामा करण्यात आला.

Saturday, December 20, 2014

बंदीस्त बिबटयांना मोठया पिंजज-यात ठेवा

बंदीस्त बिबटयांना मोठया पिंजज-यात ठेवा

इको-प्रोची मागणी-
चंद्रपूरः जिल्हयातील वनक्षेत्रालगतच्या गावात बिबट-मानव संघर्षा दरम्यान पकडण्यात आलेल्या बिबटयांना छोटया ‘ट्रॅप केज’ मधुन मोठया पिंज-यात ठेवण्याची मागणी इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी वनविभागाकडे केली आहे.
चंद्रपुरात आज तुकडोजी महाराज साहित्य संम्मेलन

चंद्रपुरात आज तुकडोजी महाराज साहित्य संम्मेलन

 चंद्रपुर- श्री गुरूदेव सेवा मंडळ आणि भारतीय विचार मंच, विदर्भ प्रांताच्या संयुक्त विद्यमाने येत्या २१ डिसेंबरला चिमूर तालुक्यातील नेरी येथे  श्रीतुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या विदर्भस्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी गुरूकुंज मोझरी येथील अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे उपसर्वाधिकारी रुपराव वाघ असणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन रविवार (२१ डिसेंबर)ला सकाळी १० वाजता राष्टÑसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे. तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अ.भा. श्री गुरूदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ, सरचिटणीस जनार्दनपंत बोथे उपस्थित राहतील. दु. ४ वाजता होणाºया समारोप समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून संस्कार भारतीचे विदर्भ प्रांत अध्यक्ष तथा साहित्यीक डॉ. राजन जयस्वाल, भारतीय विचार मंच, विदर्भ प्रांताचे संयोजक प्रा. डॉ. सुभाष लोहे उपस्थित राहणार आहेत. २१ डिसेंबरला सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडी निघणार आहे. सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत प्रतिनिधी नोंदणी, ९ वाजता राष्टÑसंत छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन ‘राष्टÑसंतांचे अध्यात्मचिंतन व आध्यात्मिक कार्य’ या विषयावर पहिला परिसंवाद होईल. या परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून अमरावती येथील प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख असणार आहे. तर नागपूरचे प्रा. डॉ. कृष्णा साकुळकर, डॉ. संजय येल्लुरे, चंद्रपूरच्या प्रा. डॉ. पद्मरेखा धनकर व नेरीचे प्रा. राम राऊत हे वक्ते असतील. संचालन प्रा. प्रफुल्ल बन्सोड करतील. दु. १२.१५ वाजता दुसरा परिसंवाद ‘राष्टÑसंतांचे ग्रामचिंतन आणि समाजकार्य’ या विषयावर होईल.