काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, February 11, 2014

दारूविक्रेत्यास पकडले

दारूविक्रेत्यास पकडले

मिंडाळा येथे महिलांचा एल्गार - 

नागभीड तालुक्यातील ंिमंडाळा येथिल महिला दारूबंदीसाठी पुढे सरसावल्या असुन दोन दारूविक्रेत्यास पकउून पोलीसाचे हवाली केले.
मिंडाळा येथे अवैद्य दारूविक्री सुरू असल्याने येथील महिलांना फार त्रास सहन करावा लागत आहे. अनेक संसार उध्वस्त झाले असुन लहान-लहान मुलेही दारूच्या आहारी जात आहेत, गावात भांडणे होऊन शांतता धोक्यात आली आहे. त्यामुळे पिढी ही व्यसनाधिन होऊ नये व गावात शांतता व सुव्यवस्था राहावी याकरीता येथील महिला पुढे येत आहे. महिलांनी एकत्र येऊन महिलांची बैठक घेतली व दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 26 जानेवारीचे ग्रामसभेतही महिलांनी दारूबंदीचा ठराव घेतला व संबंधीत विभागाकडे सभेच्या प्रती पाठविल्या परंतु दारू बंद होत नसल्याने महिलांनी श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला. महिलांनी गावात श्रमिक एल्गारचे नेतृत्वात महिलांनी दारूविक्रेत्याकडे धाडी घातल्या असता विक्रेते प्रभुचरण शामराव नायउू व विठोबा मांदाडे यांचेकडुन 245 बाटल व 3500 रूपये नगद असे 9625 रूपयाच्या मुददेमालासह पकडून नागभीडचे पोलीस निरीक्षक ढोबळे यांचे हवाली केले.या कारवाईमुळे दारूविक्रेते धास्तावले आहे.
सदर कारवाई श्रमिक एल्गारच्या संस्थापिका अॅड. पारोमिता गोस्वामी यांचे मार्गदर्शनात महासचिव विजय कोरेवार, तालुक्याचे कार्यकत्र्या सपना कामडी, शालु धुर्वे, राकेश मंथनवार, वर्षा घाटूरकर, इंदूताई आंबोरकर, रूख्माबाई नागोसे, रंजना सहारे, वंदना आंबोरकर, वनिता शेंडे, सुलभा शेंडे, विभा समर्थ, सुलोचना मोहुर्ले, सुमन साकुळकर, सुमन समर्थ, विना कायरकर, शालु जकनवार, पुष्पा साकुळकर, कुंदा लोनबले, अल्का अंबादे व सुधिर समर्थ यांनी केली.
दुकाने निरीक्षक बोरकर निलंबित

दुकाने निरीक्षक बोरकर निलंबित

शासकीय चालान पुस्तिकांबाबतचा हलगर्जीपणा भोवला


प्रतिनिधी / चंद्रपूर
येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये कार्यरत दुकाने निरीक्षक रमेश आर. बोरकर यांनी सही व शिक्के असलेले कोरी शासकीय चालान पुस्तिका कार्यालयात जतन करून न ठेवता खासगी व्यक्तींकडे दिली. याबाबतचा भांडाफोड विदर्भ प्रहार कामगार संघटनेचे अध्यक्ष अँड. हर्षल कुमार चिपळूणकर यांनी केला. याबाबतची तक्र ार वरिष्ठ स्तरावर केल्यानंतर दुकाने निरीक्षक रमेश बोरकर यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. सोबतच त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे संकेतही दिले आहेत.
येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय मागील अनेक दिवसांपासून या ना त्या कारणावरून वादग्रस्त ठरू लागले आहे. सोमवार (३0 डिसेंबर) २0१३ ला सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातच दोन दलालांच्या हातात परवान्यासाठी लागणार्‍या शेकडो चालान पावत्या आढळून आल्याने येथील सहा. कामगार आयुक्ताचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. जिल्ह्य़ातील उद्योगांमध्ये कार्यरत कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणार्‍या विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या अध्यक्षा अँड. हर्षलकुमार चिपळुणकर यांनी या दलालांचा पर्दाफाश केला. याबाबतची तक्रार उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव भुजबळ यांच्याकडे दाखल करताच येथे कार्यरत सर्व अधिकारीवर्ग ऑफिस बाहेर पळाले होते, हे विशेष.
कंत्राट परवाना, शॉपर्स परवान्यासाठी लागणारे सरकारी चालान पावत्यांचे गठ्ठे दोन दलालांकडे असल्याची माहिती मिळताच अँड. चिपळुणकर यांनी त्यांचा पर्दाफाश केला. त्यांचेकडून जवळपास ४ ते ५ गठ्ठे ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कामगार आयुक्तांकडून तक्रार झाल्यानंतरच याबाबतची दखल घेऊ, असे आश्‍वासन दिले. त्यानंतर कामगार आयुक्ताकडे तक्र ार दिली. पण या गंभीर बाबीकडे सर्वांनीच कानाडोळा केला होता. त्यानंतर वरिष्ठस्तरावर अँड. चिपळूणकर यांनी तक्र ार नोंदविली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत शासनाने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील दुकाने निरिक्षक बोरकर याना तडकाफडकी निलंबित केले. यासोबतच त्यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांना निलंबन कालावधीत खासगी नोकरी स्वीकारता येणार नाही किंवा व्यापार, उद्योगधंद्यात गुंतवून ठेवण्यास बंधन घालण्यात आले आहे. जर निलंबन कालावधीत बोरकर यांनी खासगी नोकरी स्वीकारली किंवा व्यापार उद्योगधंद्यात गुंतवून घेतले तर त्यांचे गैरवर्तन केल्याचे समजण्यात येईल आणि ते निर्वाहभत्यास अपात्र ठरतील, असेही आदेशात म्हटले आहे.

Sunday, February 09, 2014

चंद्रपूरात राज्य वन अकादमी स्थापन होणार

चंद्रपूरात राज्य वन अकादमी स्थापन होणार

श्रमिक एल्गारच्या पाठपुराव्याला यष
चंद्रपूर : विदर्भात सर्वाधिक जंगल असतांना, वन अकादमी मात्र पष्चिम महाराश्ट्रात करण्यांच्या धोरणाला विरोध करीत, ही अकादमी विदर्भात विषेशतः चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात यावी ही श्रमिक एल्गारने केलेली मागणी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्य करण्यात आल्याचे राज्याचे प्रधान वन सचिव डाॅ. प्रविणसिंह परदेषी यांनी गिलबीली येथे ग्रामस्थांच्या बैठकीत सांगीतले.  या वन अकादमीसाठी लागणारा खर्चाची तरतूद आणि मंजूर अधिकारी व कर्मचारी याबाबत लवकरच षासन आदेष निर्गमीत करण्यात येणार असल्यांचेही त्यांनी सांगीतले. मध्यवर्ती वनरजिक महाविद्यालयाला स्वायतत्ता देण्यांचा आदेषही निर्गमीत करण्यात आला असून, यामुळे बंद पडलेले वनरजिक महाविद्यालय पुन्हा एकदा कात टाकणार आहे.
विदर्भात मोठया प्रमाणावर जंगल आहे, मात्र वन अकादमी पष्चिम महाराश्ट्रात होत असल्यांचे लक्षात येताच श्रमिक एल्गारच्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी षासनाचा निर्णय विदर्भावर अन्याय करणारा असून, ही अकादमी विदर्भात विषेशतः चंद्रपूर जिल्ह्यात स्थापन करावी अषी मागणी केली होती.  या मागणीच्या अनुशंगाने चंद्रपूर जिल्ह्यात ही अकादमी का स्थापन करावी याची कारणीमिमांसाही करण्यात आली होती.  डिसेंबर 2013 च्या नागपूर येथील अधिवेषनाचे दरम्यान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वनमंत्री पतंगराव कदम यांचेकडेही याबाबत पाठपुरावा करण्यात आला होता.
आज, 9 फेब्रुवारी रोजी गीलबीली येथील संयुक्त वन व्यवस्थापन योजनेच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी श्री. परदेषी येथे आले असतांना, अॅड. गोस्वामी यांनी वनविभागाकडे विविध मागण्या केल्या, त्यात आम्ही विदर्भात जंगल राखतो, मात्र वनमंत्री राज्य वन अकादमी पष्चिम महाराश्ट्रात करणार असतील तर आम्ही जंगल कषाला राखायचे? असा संतप्त सवाल केला, त्यावेळी श्री. परदेषी यांनी  मंत्रीमंडळाच्या बैठकीत कुंडल सोबतच चंद्रपूरातही राज्य वन अकादमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्यांचे सांगून चंद्रपूरातील वन अकादमीबाबत खर्चाचे तरतूद असलेले व आवष्यक अधिकारी, कर्मचारी याबाबतचा षासन निर्णय लवकरच काढण्यात येईल.  दोनही अकादमीचा दर्जा सारखाच राहील असेही स्पश्ट केले.  यावेळी परिसरातील हजारो नागरीक, मुख्य वनसरंक्षक संजय ठाकरे व वनविभागाचे वरिश्ठ अधिकारी उपस्थित होते.
राजुरा येथे महिला सन्मान संमेलन

राजुरा येथे महिला सन्मान संमेलन

चंद्रपूर- येत्या १५ व १६ फेब्रुवारीला राजुरा येथे मुक्तांगण संस्थेच्या महिला सन्मान संमेलन आयोजित करण्यात आले असून, संमेलनाध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध कवियित्री उषाकिरण आत्राम उपस्थित राहतील. या संमेलनात महिलांच्या विविध प्रश्नांवर तसेच सद्यपरिस्थितीवर चर्चा करण्यात येणार आहे. संमेलनाचे उद््घाटन सुपरिचित विचारवंत व लेखक अमर हबीब यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष वंदनाताई वामनराव चटप आहेत.

पहिल्या दिवशी सकाळी १0 वाजता रस्त्यांवरून महिला सन्मान दिंडी काढण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता या संमेलनाचे उद््घाटन साहित्यिक अमर हबीब यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे, खा. हंसराज अहीर, आ. सुभाष धोटे, आ. मितेश भांगडिया, माजी राज्यमंत्री रमेश गजबे, माजी आ. प्रभाकरराव मामुलकर, माजी आ. अँड. वामनराव चटप, माजी आ. सुदर्शन निमकर, नगराध्यक्ष आरती चिल्लावार, उपनगराध्यक्ष अरुण धोटे, डॉ. अशोकराव जिवतोडे, राजेंद्र वैद्य आदींची उपस्थिती राहील.

माजी आ. सरोज काशीकर, सामाजिक कार्यकर्त्या अँड. पारोमिता गोस्वामी यांना विशेष निमंत्रित म्हणून पाचारण करण्यात आले आहे. यावेळी समाजसेविका कौसल्याबाई लढी यांना विदर्भरत्न व नागपूर येथे मुस्लिम महिलांच्या उत्थानासाठी काम करणार्‍या रूबिनी पटेल व सामाजिक जाणिवेतून फोटोग्राफी करणार्‍या संगीता महाजन यांना क्रांतिज्योती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी संस्थेतर्फे एक स्मरणिकाही प्रकाशित करण्यात येईल. उद््घाटन सोहळ्यानंतर स्त्री-काल, आज आणि उद्या या विषयावर परिसंवाद होणार आहे.

या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी अमर हबीब हे राहणार असून, या परिसंवादात यशदाचे प्रशिक्षक निलीमा काळे, जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. दिलीप चौधरी, प्रा. विजया मारोटकर नागपूर हे विचारपुष्प गुंफणार आहेत. याच दिवशी सायंकाळी ७ वाजता अध्ययन भारती वर्धा यांची निर्मिती असलेले नाटक दाभोळकरच भूत सादर करण्यात येणार आहे. नाटकाचे लेखक शाम पेटकर व दिग्दर्शक हरीश इथापे आहेत.

दुसर्‍या दिवशी सकाळी ९ वाजता पहिल्या सत्राला सुरुवात होणार असून, यात कुटुंबसंस्था आणि बालसंस्कार या विषयावर महिलांना प्रशिक्षणपर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या सत्राचे अध्यक्ष सुप्रसिद्ध विचारवंत दिलीप सोळंकी हे राहणार असून, यात अमरावती येथील निलीमा काळे व बुलडाण्याचे नरेंद्र लांजेवार हे मार्गदर्शन करतील. यानंतर दुपारी ११ वाजता डॉ. सुधा भालधुरे यांच्या अध्यक्षतेखाली महिला मुक्तीच्या मार्गातील अडसर र्शद्धा-अंधर्शद्धा या विषयावरील परिसंवाद होणार आहे. यात अमरावतीच्या ज्योती तोटेवार, नागपूरच्या मंजुषा सावरकर व चंद्रपूरच्या अर्चना चौधरी व राजुर्‍याच्या प्रा. डॉ. संजय गोरे हे मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी २ वाजता ज्वलंत विषयाला हात घालणारा किती 'आरुषी निर्भया 'या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रजनी हजारे हे राहणार असून, यात अमरावतीच्या रजिया सुलताना, नागपूरच्या अरुणा सबाने, चंद्रपूरच्या प्रा. जयश्री कापसे-गावंडे हे विचारपुष्प गुंफणार आहेत. सायंकाळी ५ वाजता या संमेलनाच्या समारोप होईल.

यावेळी वेगवेगळ्या विषयावरील ठराव घेण्यात येणार आहेत. या संमेलनात मोठय़ा संख्येने उपस्थित राहून संमेलन यशस्वी करण्याचा हातभार लावावा, असे आवाहन संयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.

Saturday, February 08, 2014

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार

मूल- अज्ञात वाहनाने धडक दिल्यांने प्रदिप बुरांडे (वय 25) हा युवक जागीच ठार झाला. आज 1 वाजताचे दरम्यान दुपारी मूल—चंद्रपूर रोडवर हा अपघात झाला. मूल तालुक्यातील प्रदिप बुरांडे हा युवक काही कामानिमीत्त मूल येथे आला होता. काम आटोपून आपल्या दुचाकीने परत जातांना चंद्रपूर वरून गडचिरोली मार्गावर निघालेल्या वाहनाने ठोस दिल्यांने तो जागीच ठार झाला. अपघात करणारे वाहन मात्र तेथून पसार झाल्यांने त्या वाहनाचा तपशिल मिळू शकला नाही.

‘इको सेन्सेटिव्ह’चे ताडोबाला संरक्षण

‘इको सेन्सेटिव्ह’चे ताडोबाला संरक्षण

पंकज मोहरीर, चंद्रपूर
------------------------

वाघांची सर्वाधिक संख्या असलेल्या विदर्भातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला 'इको सेन्सेटिव्ह झोन' म्हणून केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने नुकतीच मंजुरी दिली. या निर्णयाने प्रकल्पाच्या सुमारे दहा किलोमीटर परिघातील परिसरातील वीज-खाण प्रकल्पांसारख्या मानवी हस्तक्षेपांवर बंदी येणार आहे. या झोनचा दर्जा मिळणारा हा राज्यातील एकमेव प्रकल्प आहे. या निर्णयावर आता मंत्रालयाने आक्षेप मागविले असून त्यावर सुनावणी झाल्यानंतर राज्य सरकारकडून अंतिम अधिसूचना काढली जाणार आहे. या प्रक्रियेत मंत्रालयाची ही मंजुरी अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.

केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने या विशेष झोनसंदर्भात ९ फेब्रुवारी २०११ ला मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती. देशभरातील सर्व व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यात महाराष्ट्रातून ताडोबा-अंधारीचा प्रस्ताव आघाडीवर होता. मूळ प्रस्तावात काही त्रुट्या होत्या. त्या दूर करून सुधारीत प्रस्ताव वनविभागाने केंद्राकडे पाठविला होता. या निर्णयाला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर संपूर्ण क्षेत्राला पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ लागू होणार आहे. वाघांसाठी या अभयारण्यातील वातावरण पोषक मानले जाते. हमखास वाघ दिसतो म्हणून पर्यटकांचे हे आवडीचे ठिकाण आहे. २०१०च्या व्याघ्र गणनेप्रमाणे ताडोबा व आसपास ६९ वाघ होते. आता नेमके किती वाघ आहेत, हे यंदाच्या व्याघ्रगणनेतून स्पष्ट होईल. सध्या व्याघ्रगणना सुरू आहे.

या निर्णयामुळे उत्तरेकडील चंद्रपूर व नागपूर वनवृत्त, दक्षिणेकडील गोंदिया-चांदा फोर्ट रेल्वे लाइन, पूर्वेकडील चंद्रपूर व ब्रह्मपुरी वनविभाग, इरई डॅम परिसरात आता खाण, वीज प्रकल्प, सॉ मिल, क्रशर आदी उद्योग उभारता येणार नाही. ब्रम्हपुरी तालुक्यातील बंदर, चंद्रपूरजवळील लोहारा येथील प्रस्तावित खासगी वीज केंद्रासाठी लॉबिंग करणाऱ्यांना या निर्णयामुळे हादरा बसला आहे. सेन्सेटिव्ह झोन अंतर्गत सुमारे दहा किलोमीटरचा परिसर संरक्षित व्हावा, असे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत. अंतिमत: हे क्षेत्र ठरविण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. त्यानुसार, उमरेड वनपरिक्षेत्रातील कऱ्हांडला, गडचिरोली जिल्ह्यातील चपराळा अभयारण्य यांचादेखील या झोनमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. ताडोब्यातील राष्ट्रीय उद्यान व अभयारण्यात असणारे जलस्रोत कृषिक्षेत्र, पाणवठे, वन्यप्राणी या नैसर्गिक साधनसंपत्तीला मानवीनिर्मित धोका निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय महत्त्वाचा होता. या निर्णयामुळे आरक्षित जंगलाचे संरक्षण करण्यास मोठी मदत होईल तसेच मानव-वन्यजीव संघर्षही नियंत्रणात येईल, अशी आशा वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केली.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला इको से‌न्सेटिव्ह झोनमध्ये समाविष्ट केल्यामुळे वन्यजीवांसोबत पर्यावरणावर होणारा विपरीत परिणामावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. व्याघ्र संवर्धनासाठी हे निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल. या निर्णयाचे भविष्यात सकारात्मक परिणाम दिसतील.

- एस. पी. यादव

उपमहानिरीक्षक (वने) राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकारण

रकल्प क्षेत्र : ६२५ चौ. किलोमीटर

इएसझेडमुळे सुमारे १,३४७ चौ.कि‌मी.

क्षेत्राचे संरक्षण

Tuesday, February 04, 2014

वर्षभरात बदलले तीन अधिकारी, आता नवा चेहरा

वर्षभरात बदलले तीन अधिकारी, आता नवा चेहरा


चंद्रपूरच्या जिल्हा परिषदेत सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी बदलण्याचा सपाटाच सुरु झाला आहे. वर्षभरात  ३ अधिकरी बदलले असून, आता पुन्हा नवा चेहरा येणार आहे.
कोणताही नवा अधिकारी आला की, त्यांना जिल्ह्याची ओळख, प्रशासकीय कामाची पद्धत जाणून घेऊन नवीन कार्याला सुरुवात करावी लागते. काहीसा असाच प्रकार गेल्या वर्षभरात रुजू झालेल्या मुख्य कार्यपालन अधिका-र्यांनी  केला. मात्र विस्कटलेली घडी बसाविन्याआधीच खुर्ची सोडण्याची पाळी अधिका-यावर येत आहे.  
 मागील काळात चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अरुण शिंदे होते. तेव्हा त्यांच्यावर कारवाई करून हटविण्याची मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुंभरे यांच्यासह जि. प. सदस्यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी सहा फेब्रुवारी 2013 रोजी नागपुरात विभागीय आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर त्यांची शिंदे यांची अकोला जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली. या पदाचा कार्यभार अतिरिक्त जिल्हाधिकारी सी. एस. डहाळकर यांच्याकडे बराच काळ होता. त्यानंतर मे महिन्यात डॉ. माधवी खोडे यांच्या रूपाने चंद्रपूरला पहिली महिला मुख्य कार्यपालन अधिकारी मिळाली. मात्र, त्यांनाही जास्त दिवस खुर्चीवर बसता आले नाही. त्यामुळे पुन्हा प्रभार डहाळकर यांच्याकडे गेला. त्यानंतर ५ सप्टेंबर  २०१३ रोजी नाशिक आदिवासी विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत संपदा मेहता यांची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली. पदभार स्वीकारून काही दिवस होत नाहीतोच अवघ्या चार महिन्यात त्यांची बदली गडचिरोली येथे झाली आहे.  आता त्यांच्या जागी ग्रामविकास विभागाचे उपसचिव एम. एस. कलशेट्टी येत आहेत.
यूपीएससी परीक्षेत राज्यातील चौसष्ट विद्यार्थ्यांत पहिल्या आलेल्या पुण्याच्या संपदा मेहता या देशातही 21व्या क्रमांकावर होत्या. त्याच्या रूपाने चंद्रपूर जिल्हा परिषदेला मुख्य कार्यपालन अधिकारी हुशार अधिकारी मिळाला होता. पण काय करणार शासन निर्णयामुळे अधिकारी वर्गाला विकास करण्यापूर्वीच आल्या पावली परत जावे लागत आहे. 
बस दरीत कोसळली; १0 ठार

बस दरीत कोसळली; १0 ठार

कोल्हापूर : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगद्याजवळील घाटात सोमवारी रात्री दहाच्या दरम्यान खासगी प्रवासी बस पन्नास फूट दरीत कोसळून बसचालकासह १0 जण ठार तर ४0 जण जखमी झाले. तर या अपघातानंतर घाटात झालेल्या वाहतूक कोंडीदरम्यान कंटेनर एका कारवर आदळून कारचा चेंदामेंदा झाल्याने त्यातील काही प्रवाशांचीही मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. अपघातग्रस्त बस गुजरातची असल्याने मृत प्रवासी गुजरातचे असल्याची शक्यता आहे. रात्री उशीरापर्यंत त्यांची नावे कळू शकलेली नव्हती.
कन्याकुमारीची सहल आटोपून मुंबईकडे जाणार्‍या गुजरातच्या पोरबंदरमधील प्रवासी बसने सोमवारी रात्री खंबाटकी बोगदा पार केला. त्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने एस आकाराच्या धोकादायक वळणाच्या बाजूच्या दरीत बस कोसळली. प्रवाशी जीवाच्या आकांताने ओरडू लागले. त्यामुळे अनेकांनी त्यांची वाहने रस्त्यावरच थांबविली. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन एक कंटेनर रस्त्यावर उभ्या असलेला टेम्पो व जीपला धडकला. कंटेनर बाजूच्याच एका कारवर आदळला. त्यात कारचा चेंदामेंदा झाला. कारमधील दोघा प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदश्रींचे म्हणणे आहे, मात्र त्यास अधिकृत दुजोरा मिळालेला नव्हता. स्थानिकांनी कारमधील जखमींना खंडाळा ग्रामीण रुग्णालयात हलविले. अंधारामुळे बसमध्ये नेमके किती प्रवासी दगावले आहेत. याची माहिती रात्री उशीरापर्यंत मिळालेली नव्हती.
१२ फेबु्वारीला चिमूरात घोडारथ यात्रा

१२ फेबु्वारीला चिमूरात घोडारथ यात्रा

१५ फेबु्रवारीला गोपालकाला

उत्सवाचे आकर्षण साक्षात जगन्नाथ पुरी मंदिर

चिमूर- श्रीहरी बालाजी देवस्थान बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या वतीने ३८७ वर्ष पुरातन काळापासून सुरु असलेल्या श्रीहरी बालाजी महाराजांची घोडारथ यात्रा उत्सव संपन्न होत आहे. यंदा उत्सवसाचे आकर्षण साक्षात जगन्नाथ पुरी मंदीर ठरणार असून १२ फेबु्रवारीला घोडारथ यात्रा तर १५ फेबु्रवारीला गोपालकाला होणार आहे.
IMG_0001.JPG प्रदर्शित करत आहे
मिती माघ शुध्द पंचमी वसंत पंचमी मंगळवार दिनांक ४ फेबु्रवारीला नवरात्र प्रारंभ, मिती माघ शुध्द नवमी शनिवार दिनांक ८ फेबु्रवारीला गरुड वाहन, मिती माघ शुध्द एकादशी सोमवार दिनांक १० फेबु्रवारीला मारुती वहन, मिती माघ शुध्द त्रयोदशी बुधवार दिनांक १२ फेबु्रवारीला रात्रौ १० ते ५ वाजेपावेतो श्रीहरी बालाजी महाराज यांचे प्रतिमेची घोडा रथयात्रा होणार असून मिती माघ वद्य प्रतिपदा शनिवार दिनांक १५ फेबु्रवारीला दुपारी १२ वाजता गोपालकाला व बारारात्री समाप्ती, मिती वद्य चतुर्दशी शनिवार दिनांक २७ फेबु्रवारीला महाशिवरात्रीचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ४ ते १५ फेबु्रवारीला रात्रौ ८.३० ते १०.३० वाजता नागपूरचे ह. भ. प. भास्करबुवा इंदुरकर यांचे नारदिय किर्तन होणार आहे.

या यात्रेदरम्यान संपुर्ण चिमूर शहरात रंगीबिरेंगी आकर्षण इलेक्ट्रीक लाईटींग लावण्यात आले असून यावर्षी सामान्य नागरिकांना जगन्नाथपुरी मंदिराचे साक्षात दर्शन होणार असून शहरात मंनोरंजनात्मक दुकाने, खेळणीची दुकाने, मिठाईची दुकाने, झुले, आकाशपाळणे, फुग्याची दुकाने लावण्यात आली आहे. युवाशक्ती संघटनेचे संस्थापक किर्तीकुमार भांगडीया यांच्या कल्पक नेतृत्वातुन सतत चौथ्याही वर्षी जगन्नाथपुरी मंदिराची उभारणी होत असल्याने यात्रेकरुंसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

या यात्रेला उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीहरी बालाजी देवस्थान बोर्ड ऑफ ट्रस्टीजचे राज पुरोहीत अ‍ॅड. चंद्रकांत भोपे, अध्यक्ष डॉ. दिपक यावले, अ‍ॅड. बबनराव बोथले, सुरेश डाहुले, निलम राचलवार, डॉ. मंगेश भलमे आदीने केले आहे.

Monday, February 03, 2014

नितीन पोहाणे

नितीन पोहाणे

आम आदमी ते उद्योगपती 
समाजसुधारक ते राजकारण 

हिंदीत नितीनचा अर्थ शांत असा होतो. अगदी अशाच स्वभावाचा नितीन आम आदमी ते उद्योगपती असा प्रवास करून समाजकारणातून राजकारणाकडे  वळत आहे. चंद्रपुरातील पठाणपुरा येथे सामान्य परिवारात जन्मलेले नितीनचे वडील किराणा दुकान चालवीत असत. नितीनने शिक्षणानंतर संगणक प्रशिक्षण केंद्र सुरु केले. त्यानन्तर निप्पो कंपनीची स्थापना केली. या कंपनीतून अनेकांना शुद्ध पाणी मिळू लागले. गेली अनेक वर्षे हा उद्योग विस्तारल्यानंतर मिळणा-या  वेळेतुन सामाजिक उपक्रम सुरु केले. आपल्या वाढदिवसानिमित्त स्थानिक चांदा क्बल मैदानावर सर्व क्षेत्रातील समाजसुधारक आदर्श व्यक्तींचा सत्कार केला. मुंबई, दिल्ली, नागपूर, नासिक, नांदेड, हैदराबाद येथेही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
समाज सुधारक अशी उपाधी लावून संघटण स्थापन केल्यानंतर
 अनेकांनी नितीनला वेडा ठरविले. पण नितीनने टीकेकडे दुर्लक्ष करीत आपले काम सुरूच ठेवले. नितीन पोहाणे यांच्या नेतृत्त्वात इ मीटर विरोधात ऑटोचालकांचा मोर्चा काढत सरकारच्या आदेशाचा विरोध व्यक्त केला. मात्र वृत्त वाहिन्याचा पसारा असतानांही कुणी दखल घेतली नाही. मोर्च्याचा प्रतिसाद बघता अनेक राजकीय पुढारी आणि सामाजिक संघटना अचंबित झाल्या. नितीन ने मध्यंतरी कांजी' ला लघुचित्रपट साकारला होता. प्रत्येक वेळी काहीतरी वेगळे करण्याचा नितीन चा प्रयत्न असतो. मोठी स्वप्ने बघून ती साकारण्याचा प्रयत्न नितीन करीत असतो.
कुठल्याही पक्षात किंवा संघटनेत कार्यकारी मंडळ वा कार्यकारीणी असा एक मोजक्या महत्वाच्या सदस्यांचा गट असतो. पदाधिकारी वा नेत्यांच्या नावाने वा नेतृत्वाखाली चाललेल्या कारभाराला वेळोवेळी सल्लामसलत करायला किंवा आढावा घेण्यात मदत करायला असा गट सज्ज असतो. झालेल्या कामाचे अवलोकन करून त्यातल्या त्रुटी दाखवणे, त्याची चाचणी वा छाननी करणे, सुधारणा सुचवणे; यासाठी ही समिती मदत करत असते. अशी समिती नितीन ने   स्थापन केली नाही. मात्र जाणकाराचे सल्ले घ्यायला ते विसरत नाहीत. शांत स्वभाव असला तरी प्रसंगी चुकीच्या बाबींना कडाडून विरोध करतो. अनेकदा त्याच्या स्मार्ट राहनीमानावर टीका होते. सूट बुटाचा तरुण समाज सेवा करेल काय, असा प्रश्न उपस्थित करतात. पण, नितीन ला नीट नेटकेपणा आवडतो. वक्तशीरपणा आणि दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती कायम आहे.  समाजकारणातून राजकारणाक डे वळत असताना अनेकजण वेगळ्या नजरेने बघू लागले आहेत. पण नितीन सारख्या तरुणाने आता राजकारणाकडे वळण्याची गरज आहे. समाजकारणातून राजकारणाकडे वळत असताना अनेकजण वेगळ्या नजरेने बघू लागले आहेत. पण नितीन सारख्या तरुणाने आता राजकारणाकडे वळण्याची गरज आहे.
आंदोलनाच्या निमित्ताने त्यांनी फ़ेसबुक व मोबाईल माध्यमातून लोकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळवला होता. मग त्याचे प्रतिबिंब माध्यमातून पडत गेले. आंदोलनात मिळणारा प्रतिसाद मिळाल्यानंतर राजकीय आखाड्यात उतरण्याचा पवित्रा घेतल्याने जुन्या प्रस्थापित नेत्यांची घाबरगुंडी उडाली आहे.  राजकारण म्हणजे घाण, उकिरडा, भ्रष्टाचार असे म्हटले जाते. पण, तरुण नेते  नितीन आता हि घाण नक्कीच साफ करतील यात शंका नाही.
-  

Saturday, February 01, 2014

मराठी नाट्य संमेलनाचे थाटात उद्‌घाटन

मराठी नाट्य संमेलनाचे थाटात उद्‌घाटन

पंढरपूर, १ फेबु्रवारी
पंढरपूर येथील शं. ना. नवरे नाट्यनगरीत आज अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याहस्ते थाटात उद्‌घाटन झाले. ‘मी जर राजकारणात गेलो नसतो, तर रंगभूमी निश्‍चितच गाजवली असती,’ असे मनोगत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.
येथील टिळक स्मारक मैदानावरून या संमेलनाचे मुख्य आकर्षण असलेली नाट्यदिंडी आज सकाळी निघाली. शहरातील विविध मार्गावरून निघालेल्या या नाट्यदिंडीने पंढरपूरवासीयांची मने जिंकली. दिंडीनंतर नाट्यसंमेलनाचा उद्‌घाटन सोहळा प्रारंभ झाला. नाट्यसंमेलनाचे उद्‌घाटक गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, संमेलनाचे मावळते अध्यक्ष मोहन आगाशे, संमेलनाचे अध्यक्ष अरुण काकडे, नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, रिपाइं नेते खासदार रामदास आठवले, राज्याचे सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आदी मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
सोलापुरातील अनेक कलावंतांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर या जिल्ह्याचे नाव मोठे केले आहे. येथे होत असलेले हे तिसरे नाट्यसंमेलन आहे, याकडे लक्ष वेधत, ‘मी जर राजकारणात आलो नसतो, तर नक्कीच मराठी रंगभूमी गाजवली असती आणि मोहन जोशी यांच्याविरोधात नाट्यपरिषदेची निवडणूक लढविली असती. मोहन जोशी हे कामगार रंगभूमीवरून आले आहेत आणि मीदेखील आयुष्यातील पहिले नाटक कामगार रंगभूमीवरच केले होते,’ असे सांगताना, कामगारांच्या यातना काय असतात, याची जोशी यांना चांगली माहिती आहे. त्यामुळे कदाचित त्यांच्याविरोधात निवडणूक लढण्याचे धाडस मी केलेही नसते, असे शिंदे यांनी हसतच सांगितले. भागवत धर्माचे पीठ असलेल्या या नाट्यसंमेलनात रंग देवतेची पूजा करण्याची संधी मला दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे, असेही शिंदे म्हणाले.
‘मुंबईची माणसे’ या नाटकात स्त्रीची भूमिका करण्याची संधी मला मिळाली होती, अशी आठवण करताना, त्या काळात मी अनेक नाटके केलीत. त्या दिवसांच्या आठवणी आज या व्यासपीठावर पुन्हा एकदा ताज्या झाल्या, असे शिंदे म्हणाले. शिंदे यांनी आपल्या भाषणात मराठी रंगभूमीच्या देदिप्यमान इतिहासाचा आढावा घेताना प्रायोगिक, व्यावसायिक आणि दलित रंगभूमीचा उल्लेख केला. पडद्यामागे काम करणार्‍यांची भूमिकाही तितकीच मोठी असते, असे सांगण्यासही ते विसरले नाही. नाटकाने करमणूक करायलाच हवी. पण, त्याचवेळी संस्कृतीचे सोनेही लुटायला हवे. हे काम एकाच रात्रीत होणे शक्य नाही, असे सांगतानाच, नव्या प्रतिभेच्या कलावंतांना वाव देऊन त्यांची रुजवण करण्याच्या गरजेवरही शिंदे यांनी भर दिला.
शहरातील कुत्रे जंगलात सोडण्यामुळे चंद्रपूरचे वन्यजीव धोक्यात

शहरातील कुत्रे जंगलात सोडण्यामुळे चंद्रपूरचे वन्यजीव धोक्यात

चंद्रपूर शहरात गेल्या काही वर्षांपासून अनेक वार्डातील गावठी कुत्रे पकडून नजीकच्या जंगलात सोडण्याची महानगरपालिकेची भूमिका आता वन्यजीव प्रेमींच्या आक्षेपामुळे अडचणीत येताना दिसतेय.
गेल्या काही वर्षांपासून शहराबाहेर मुल रोड च्या जंगलात कुत्रे सोडण्याचे प्रकार येथील नगर पालिकेद्वारे सुरु होते. लोहारा या गावाजवळ सोडलेले बरेच कुत्रे ४-५ कि. मि. अंतर कापून बंगाली क्याम्प परिसरात परत येत होते. त्यामुळेच कि काय आता हे पकडलेले कुत्रे आणखी पुढे घनदाट जंगलात सोडणे सुरु झाले आहे.
चंद्रपूर जवळचे संपूर्ण जंगल संरक्षित वन्य प्रजातींसाठी ओळखल्या जाते. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या या जंगलाच्या बफर झोन मध्ये समाविष्ट केलेले हे जंगल वाघ व बिबट्या यांच्या सांचारासाठी प्रसिद्ध आहे. वारंवार वन्यजीवांचे दर्शन होण्यामुळे ताडोबा व लगतच्या जंगलात फिरण्यासाठी वर्षभर देशभरातून पर्यटक येतात. अश्यामध्ये स्थानिक महानगर पालिकेला या वन वैभवाची किंमत दिसत नाही असेच म्हणावे लागेल.

जंगलामध्ये कोणताही नवीन प्राणी किंवा प्रजाती सोडण्यासाठी केंद्रीय वन व पर्यावरण खात्याकडून मान्यता लागते. संपूर्ण अभ्यासा अंतीच असे निर्णय वन विभागातर्फे घेण्यात येतात. दुसरीकडे पकडलेले किंवा आजार व दुखापती मधून बरे झालेले वन्य प्राणी हे देखील जंगलात सोडताना वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांची तपासणी केली जाते. जंगलातील गावांमध्ये पाळीव जनावरांना देखील वन विभागातर्फे लसीकरण करण्यात येते. कुठलाही संसर्गजन्य आजार या प्राण्यांमुळे पसरू नये यासाठी वन विभाग इतकी खबरदारी घेत असताना महानगर पालिकेची यंत्रणा बिनबोभाट पकडलेले कुत्रे जंगलात सोडत आहे.
या संदर्भात येथील स्थानिक पर्यावरण संस्था ग्रीन प्ल्यानेट सोसायटीने विभागीय वन अधिकारी व ताडोबाचे क्षेत्र संचालक यांच्याकडे आज तक्रार केली. संस्थेचे पदाधिकारी डॉ सचिन वझलवार व डॉ योगेश्वर दुधपचारे यांनी चंद्रपूर वन विभागाचे विभागीय वनाधिकारी श्रि. चौधरी यांची भेट घेवून संबधित प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी दिलेल्या लेखी तक्रारीमध्ये शहरातील कुत्रे जंगलात सोडल्याने कुत्र्यांमधील संसर्ग जन्य आजार वन्य जीवांमध्ये पसरण्याची भीती व्यक्त केलेली आहे. सध्या जगभरात canine distemper virus (CDV) नावाचा विषाणू पाळीव प्राण्यांमुळे वन्य जीवांमध्ये पसरण्याची अनेक उदाहरणे व अभ्यास सुरु आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यास कुठलाही उपाय उपलब्ध नाही. शिवाय गावठी कुत्रे हे वन्य प्राण्यांचे नैसर्गिक खाद्य नसल्याने पुढे जाऊन हे बिबटे शहराच्या बाहेरील भागाकडे कुत्र्यांसाठी भक्ष्य म्हणून आकर्षिले जातात.
या तक्रारीवर कारवाई करताना विभागीय वन अधिकाऱ्यांनी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चा भंग होत असल्याने जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
 लोकसभेच्या तिकीटाची माळ कुणाच्या गळ्यात

लोकसभेच्या तिकीटाची माळ कुणाच्या गळ्यात

आम आदमी पार्टीने उमेदवारी घोषित करण्यापूर्वीच शेतकरी संघटनेने तिकीट मिळाल्यागत प्रचारच सुरू केला आहे. त्यामुळे आप च्या सामान्य कार्यकर्त्यात कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. नवरी एक, वर अनेक' अशी इचछुक  उमेदवार संख्या दिसून येत आहे. प्राप्त माहितीनुसार आप कडे ११-१३ जणांनी अर्ज केला आहे. याशिवाय प्रदेश कार्यकारणीच्या नेत्यांनी केलेली विनंती आणि मत परिवर्तन यामुळे उमेदवारीस तयार झालेले बंडू धोतरे आणि चटप यांच्या दावेदारीमुळे तूर्तास उमेदवारी संदर्भात संभ्रम  आहे. मात्र, येत्या काळात लोकसभेच्या तिकीटाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल, हे आताच सांगणे कठीण आहे। 


वामनराव चटप 
यांनी आपली राजकीय गाडी आता दिल्लीच्या वाटेने वळविली असून, येत्या लोकसभा निवडणुकीत ते दिल्लीचा किल्ला लढविणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. यातच त्यांनी आप सोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे मोठे चित्र बदलण्याची शक्यता आहे. जर चटप यांना आप ची तिकीट मिळाली नाही तर, ते कार्यकर्ता म्हणून आप च्या अन्य उमेदवाराचा  प्रचार करतील असे वाटत नाही. कारण त्यांनी केवळ लोकसभेच्या निवडणुकीसाठीच आजवर मोर्चे बांधणी केली आहे. त्यामुळे ती व्यर्थ जाईल. तिकीट  मिळाली नाही तर, ते शेतकरी संघटना किंवा अपक्ष उमेदवार म्हणून राहू शकतात. कारण ते मुळचे राजकारणी आहेत. राजकारणी हे खुर्ची आणि सत्तेशिवाय जगू शकत नाही.

‘शेतकऱ्यांना घामाचे दाम मिळावे’ पासून ‘त्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळावे’ यासाठी २५ वर्षापासून शेतकरी संघटनेचे काम करताना स्वतंत्र भारत पक्षाचे राज्याध्यक्ष अ‍ॅड. वामनराव चटप हे खासदार शरद जोशी यांचे खंदे समर्थक आहेत. मात्र  संघटनेची ताकद केवळ राजुरा विधानसभा मतदारसंघापुरती मर्यादित आहे. याची जाणीव असल्याने चटप यांनी आता आप हीच संधी साधून उमेदवारीचा प्रचार सुरू केला आहे. काही वर्षापूर्वी शेतकरी संघटना युतीसोबत होती. तेव्हा संघटनेचे आमदार वामनराव चटप यांनी चंद्रपूर लोकसभेची जागा मागितली. ती न मिळाल्यानेगत निवडनुकीत  स्वतंत्र लोकसभा लढली. यावेळी आप ची तिकीट मिळाल्यागत प्रचारच सुरू केल्याने या नव्या समीकरणाचा फायदा नेमका कुणाला होतो याविषयी कमालीची उत्सुकता आहे. खरे तर शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेने २००४ साली भाजपाशी युती केली होती. त्याच भरोशावर खासदार झाले. आता आप ची टोपी घालून गेलेली पत पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे.
८ नोव्हें, २०१३  ला  चंद्रपूर येथे  झालेल्या शेतकरी संघटनेचे 12वे संयुक्त अधिवेशनात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार ऍड. वामनराव चटप यांची उमेदवारी घोषित करण्यात आली. कट्टर विदर्भवादी चटप यांनी ६ डिसें, २०१३  रोजी प्रतिविधान सभेच्या  मुख्यमंत्रिपदावर बसविण्यात आले होते.
राजुरा विधानसभा मतदारसंघाचा संतुलित विकास करून एक प्रगतिशील मतदारसंघ म्हणून पुढे आणण्याचे बरेच श्रेय आमदार, शेतकरी संघटना समर्थित स्वतंत्र भारत पक्षाचे प्रश्नंताध्यक्ष अ‍ॅड. वामनराव चटप यांना आहे. १५ वर्षे विधानसभा सदस्य असलेले अ‍ॅड. वामनराव चटप यांची कारकीर्द उल्लेखनीय आहे.
आंध्र सीमेवरील या मतदारसंघाची स्थिती पूर्वी अत्यंत दयनीय होती. रस्ते, पूल, विद्युतीकरण, शासकीय व शैक्षणिक कार्यासाठी इमारती, सिंचन, वैयक्तिक लाभाच्या योजना यांचा मोठा अनुशेष होता. अ‍ॅड. वामनराव चटप १९८९ मध्ये निवडून आले आणि मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून गेला.
जिवती तालुक्यातील १२ गावे राज्य शासनाने आंध्रप्रदेशला देण्याच्या निर्णयाविरोधात आमदार चटप यांनी विधानसभेत आवाज उठवला व लोकांची चळवळ उभारली.  राजुरा मतदारसंघात मोठय़ा प्रमाणात औद्योगिकरण सुरू आहे. त्यामुळे वाढते प्रदूषण व कंत्राटी कामगारांच्या समस्या याबाबत चटप फारसे गंभीर राहिल्याचे दिसत नाही. राजुरा शहरात वनउद्यान वगळता सुशोभिकरणासाठी मोठा निधी दिला नाही. वर्धा नदीवरून सिंचनाचे छोटे प्रकल्प होण्याच्या शक्यतेबद्दल आमदार चटप यांच्याकडून फारसे प्रयत्न नाहीत. आरोग्याच्या सर्व सुविधा व निधी असतानाही माणिकगड पहाडावर कुपोषण सुरूच आहे.
-----------------------------
बंडू धोतरे 
हे कोणताही राजकीय गंघ नसलेला व्यक्ती आहे. त्यामुळे ते निवडनुकीत तग धरतील काय हा प्रश्नच आहे. पण, केजरीवाल यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवल्यास परिवर्तनासाठी सक्षम मन आणि ध्येयाची गरज आहे. समाज जागृतीत पुढे असलेले धोत्रे  परिवर्तनासाठी पुढे येत आहेत यात दुमत नाही मात्र त्यांना भाषण कौशल्य आणि राजकीय बांधणी करता येणे महत्वाचे आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून आप चा उमेदवार निवडण्यासाठी प्रदेश कार्यकारणीच्या नेत्यांनी चंद्रपुरातील काही समाज सेवि ची भेट घेतलि. त्यात बंडू धोतरे यांचे नाव होते. चंद्रपूरचे ख्यात  नाम व्यंग चित्रकार मनोहर सप्रे यांच्या मार्फतीने हि भेट झाली. प्रारंभी उमेदवारी ला नकार देणाऱ्या धोतरेनि परिवर्तनाची गरज बघून आप  कडे इचछुक  उमेदवार म्हणून अर्ज केला.
गेल्या १०-१२ वर्षात त्यांनी विविध उपक्रम राबविले. भविष्यात उद्भभवणाऱ्या समस्यांची जाणीव ठेवून वाघांच्या संरक्षणासाठी  उपोषण, जंगल वाचविण्यासाठी अदानी प्रकल्पाला विरोध केला. अदानी विरोधी आंदोलनामुळे ते देशपातळीवर पोहचले. त्याला शहरातील अन्य संघटना आणि नागरिकांनी दिलेली साथ महत्वाची होति. २५ जुलै, २००९ ला  बंडू धोतरे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले. तेव्हा मॅगसेसे पुरस्कार विजेते  राजेंद्रसिंग यांनी भेट दिली. गोंदियामधील १३२० मेगावॉट क्षमतेच्या तिरोडा औष्णिक वीज प्रकल्पासाठी अदानी पॉवरने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात दोन कोळसा खाणींचा प्रस्ताव पुढे आणला होता. प्रस्तावित खाणींतून दरवर्षी ४० लाख टन कोळशाचे उत्पादन केले जाणार होते, तर खाणींमुळे तब्बल १६०० हेक्टरमधील वनक्षेत्र नष्ट होणार होते. परंतु केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाच्या उच्चस्तरीय मूल्यमापन समितीने २४ नोव्हेंबर रोजीच्या बैठकीत सदर कंपन्यांकडून पर्यावरण मंजूरीसाठी सादर झालेला प्रस्ताव खारीज करण्याचा निर्णय घेतला. पर्यावरणीय मंजुरीशिवाय कंपन्यांना या क्षेत्रात खाणकाम करता येणार नाही. खाणींचे हे दोन्ही प्रस्ताव ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव क्षेत्रात मोडणारे होते. विदर्भातील पर्यावरणवादी संघटनांनी या प्रस्तावित खाणीच्या विरोधात आंदोलन सुरू केल्यानंतर राज्य व केंद्र शासनाला या विरोधाची दखल घेणे भाग पडले. येथील ‘इको-प्रो’ चे प्रमुख बंडू धोतरे यांनी वन्य जीवांच्या प्रश्नावर बेमुदत उपोषण केले होते. रेल्वे मालधक्का, धूळ प्रदूषण, बाबूपेठ उड्डाणपूल, यासारख्या प्रश्नांवर त्यांनी आंदोलन केले आहे. गेल्या वर्षी त्यांना 'संघर्ष सन्मान पुरस्कार' मिळाला. आप च्या विचारसरनीला पुढे नेइल, असा कार्यकर्ता आहे.